Skin Care Tips : उन्हाळ्यातील या चुकांमुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते, वाचा महत्वाचे!

उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंगची (Tanning) समस्या सामान्य आहे. असे म्हटले जाते की उन्हाळ्याच्या हंगामात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला तारेवरची कसरत करावी लागते. त्वचा हायड्रेट (Hydrate) ठेवणे, सनस्क्रीन लावणे आणि आठवड्यातून एकदा चेहऱ्याला फेसपॅक लावणे सध्या आवश्यक आहे.

Skin Care Tips : उन्हाळ्यातील या चुकांमुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते, वाचा महत्वाचे!
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 9:51 AM

मुंबई : उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंगची (Tanning) समस्या सामान्य आहे. असे म्हटले जाते की उन्हाळ्याच्या हंगामात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला तारेवरची कसरत करावी लागते. त्वचा हायड्रेट (Hydrate) ठेवणे, सनस्क्रीन लावणे आणि आठवड्यातून एकदा चेहऱ्याला फेसपॅक लावणे सध्या आवश्यक आहे. बर्‍याच वेळा लोकांकडून स्किन केअर (Skin care) रूटीन न पाळण्याची चूक होते आणि उन्हाळ्यातही त्यांची त्वचा कोरडी होऊ लागते. त्वचेची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. नाही तर आपली त्वचा कोरडी होते आणि त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.

मॉइश्चरायझिंग

त्वचेची निगा राखण्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी त्यावर दोनदा मॉइश्चरायझिंग क्रीम लावा. अनेक वेळा लोक आळस करतात आणि त्वचेवरला मॉइश्चरायझिंग करणे टाळतात. पण ही चूक जर तुमची सवय झाली असेल तर उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला जास्त नुकसान होऊ शकते.

कोमट पाण्याने चेहरा धुणे

बरेच लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोमट पाण्याने चेहरा धुणे. उन्हाळ्यामध्ये कोमट पाण्याने चेहरा धुणे अतिशय चुकीचे आहे. कारण या सवयीमुळे त्वचा कोरडी पडण्यास सुरूवात होते. या चुकीमुळे त्वचेवर मुरुम येण्याची समस्या देखील होऊ शकते.

सतत चेहरा धुणे

उन्हाळा असो किंवा हिवाळा कोणत्याही ऋतूत चेहरा स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी चेहरा धुणे उत्तम मानले जाते, तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात चेहरा दोनदा धुवावा. अनेकदा लोकांना असे वाटते की उन्हाळ्यात चेहऱ्यावर जितके जास्त पाणी वापरले जाईल तितके ते अधिक ताजे आणि हायड्रेटेड राहील. अशा प्रकारे तुमची त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. यामुळे उन्हाळ्यामध्ये फक्त दोनदाच चेहरा धुवा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Weight Loss : तुम्हाला वजन कमी करायचे मग या 4 चुका टाळा आणि झटपट वजन कमी करा!

Skin care उन्हाळ्यात त्वचेवरील टॅन काढण्यासाठी हे घरगुती उपाय एकदा नक्कीच करून पाहा!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.