Skin | तेलकट त्वचा आणि टॅनची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा!
तेलकट त्वचेसाठी बेसन खूप जास्त फायदेशीर आहे. बेसन आणि हळद स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा बेसन, एक चिमूटभर हळद आणि थोडे पाणी घ्या. ते मिक्स केल्याने गुळगुळीत पेस्ट तयार होईल. ते त्वचेवर हळूवारपणे लावा आणि कोरडे झाल्यावर हलके स्क्रब करा.
मुंबई : उन्हाळ्यात (Summer) सनटन ही सर्वात मोठी समस्या असते. सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्वाचे होते, अथवा त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. तापमान जास्त असो वा कमी, पाऊस असो वा गरमी, सनस्क्रीनशिवाय घराबाहेर पडू नये. सनस्क्रीन (Sunscreen) वापरल्याने त्वचा चांगली दिसते. काही घरगुती टॅन स्क्रबच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेवरील टॅनची समस्या दूर करू शकता. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार स्क्रबचा वापर करावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषत: जर तुमची त्वचा तेलकट (Oily skin) असेल, तर तुम्हाला टॅन रिमूव्हल स्क्रब आवश्यक आहे.
त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा
- तेलकट त्वचेचा टॅन दूर करण्यासाठी लिंबू आणि साखर फायदेशीर मानली जाते. गरजेनुसार साखर घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. आता ज्या भागात टॅन आहे त्या भागावर मसाज करा. 15 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा. यामुळे तुमची टॅन हळूहळू दूर होईल.
- मध आणि तांदळाची पावडर मिसळून स्क्रब बनवा. आता ज्या भागात टॅन आहे त्या भागावर मसाज करा. ते कोरडे होऊ द्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे आपल्या त्वचेवरील टॅनची समस्या दूर होण्यास मदत होते.
- तेलकट त्वचेसाठी बेसन खूप जास्त फायदेशीर आहे. बेसन आणि हळद स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा बेसन, एक चिमूटभर हळद आणि थोडे पाणी घ्या. ते मिक्स केल्याने गुळगुळीत पेस्ट तयार होईल. ते त्वचेवर हळूवारपणे लावा आणि कोरडे झाल्यावर हलके स्क्रब करा.
- संत्र्याच्या सालीची पावडर आणि मिल्क स्क्रब देखील टॅनिंग दूर करण्यासाठी उत्तम काम करतात. संत्री सोलून घ्या, किसून घ्या आणि रस पिळून घ्या. हे मिश्रणाने टॅन झालेल्या भागावर लावा. त्वचेवर लावल्यानंतर ते कोरडे होऊ द्या आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
Non Stop LIVE Update