Skin Care Tips : हातावरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा, वाचा!
या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपली त्वचा देखील निस्तेज आणि निर्जीव दिसते. याशिवाय सनबर्नची समस्या देखील वाढते.
मुंबई : या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपली त्वचा देखील निस्तेज आणि निर्जीव दिसते. याशिवाय सनबर्नची समस्या देखील वाढते. टॅनिंगमुळे, वृद्धत्वाची चिन्हे वाढतात. टॅन फक्त चेहऱ्यावरच होत नाही तर टॅन आपल्या हातांवर देखील होतो. टॅनची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे टॅनची समस्या दूर होण्यास मदत होते. (Do this special remedy to remove the tanning on the hands)
दही आणि हळद पॅक
दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे त्वचेचा रंग आणि आर्द्रता सुधारण्याचे काम करते. हळद त्वचेचा रंग सुधारण्याचे कार्य करते. यासाठी तुम्हाला एका भांड्यात एक चमचा दही आणि एक चमचा हळद मिक्स करावी लागेल. या दोन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि हातावर लावा. सुमारे 20 मिनिटांनंतर पाण्याने हात धुवा.
लिंबाचा रस
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्याचे कार्य करते. एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि लिंबाचा रस मिसळा. सुमारे 15 मिनिटे आपले हात यामध्ये भिजवा. त्यानंतर हात मॉइश्चराइझ करा. लिंबू अम्लीय आहे ज्यामुळे त्वचेचा टॅन निघून जातो.
बदाम पेस्ट
बदामांमध्ये जीवनसत्त्वे भरपूर असतात. जे त्वचेचा रंग चांगला करते आणि सुर्यापासून त्वचेचे संरक्षण करते. यासाठी रात्री सात ते आठ बदाम भिजू घाला. त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि हातांवर लावा. यामुळे हातावरील टॅन निघून जाण्यास मदत होते.
चंदन आणि हळद
2 चमचे चंदन पावडर आणि 2 चमचे हळद घ्या. या दोन गोष्टी मिसळून जाड पेस्ट बनवा. त्यात थोडे गुलाब पाणी घाला. ही पेस्ट अर्धा तास आपल्या हातावर ठेवा. ही पेस्ट पौष्टिक आणि त्वचेची रंगत सुधारण्यास मदत करते.
कोरफड जेल
कोरफड जेल जसे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. तसेच ते आपल्या हातावरील टॅन काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला गुलाब पाण्यात कोरफड जेल मिक्स करावे लागेल. ही पेस्ट आपल्या संपूर्ण हाताला लावा. यामुळे टॅन कमी होण्यास मदत होईल.
काकडीची पेस्ट
काकडीमध्ये जीवनसत्त्वे भरपूर असतात जे त्वचेला ताजेतवाने करण्यास मदत करतात. हे त्वचेवर चमक आणण्याचे देखील काम करते. यासाठी आपल्याला काकडीचा रस आणि लिंबाचा रस मिक्स करून चांगली पेस्ट तयार करावी लागेल. ही पेस्ट हातावर लावा आणि सुमारे 30 मिनिटांनंतर पाण्याने धुवा.
खोबरेल तेल
हातांवरील टॅनिंग काढण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. यासाठी आपण रात्री झोपताना हातांना खोबरेल तेल लावले पाहिजे. हातावरचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण दुधावरची साय हाताला लावली पाहिजे. यामुळे हातावरील कोरडेपणा निघून जाण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Weight Loss | ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!
Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Do this special remedy to remove the tanning on the hands)