Benefits of Hibiscus : जास्वंदाचे फुल केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी गुणकारी, वाचा!
बहुतेक लोकांच्या घराच्या अंगणामध्ये जास्वंदाच्या फुलाचे झाड असते. जास्वंदाच्या फुलामध्ये बरेच औषधी घटक असतात. जास्वंदाचे फूल आपल्या केसांच्या आरोग्याचे पोषण करू शकते.
मुंबई : बहुतेक लोकांच्या घराच्या अंगणामध्ये जास्वंदाच्या फुलाचे झाड असते. जास्वंदाच्या फुलामध्ये बरेच औषधी घटक असतात. जास्वंदाचे फुल आपल्या केसांच्या आरोग्याचे पोषण करू शकते. जास्वंदाच्या फुलाचे तेल आणि त्याची पाने केसांच्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्त करू शकतात. तसेच, त्यांना मजबूत आणि चमकदार देखील बनवू शकतात. (Extremely beneficial for Hibiscus flower hair)
1. जास्वंदाच्या फुलाचे तेल घरी तयार करण्यासाठी तीन जास्वंदाची फुले घ्या आणि खोबरेल तेल पाच चमचे घ्या. त्यानंतर खोबरेल तेलामध्ये हे फुले मिक्स करा आणि वीस मिनिटांसाठी गॅसवर गरम करा. एकदा तयार केलेले जास्वंदाचे तेल आपण आठ दिवस वापरू शकतो.
2. जास्वंदाच्या फुलामध्ये बरेच जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे मेलेनिन तयार होते. अर्धा कप नारळाच्या तेलात एक चमचे जास्वंदाचे तेल मिक्स करा आणि आपल्या केसांना रात्री लावा. त्यानंतर सकाळी आपले केस थंड पाण्याने धुवा. यामुळे केस चमकदार होण्यास मदत होते.
3. जास्वंद व्हिटॅमिन सीने समृद्ध असते. यात केसांच्या मुळांना बळकट करण्याची क्षमता असते. जर आपण या जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मालिश केली, तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात. तसेच नवीन केसही वाढतात.
4. जर तुमचे केस खूप कोरडे व निर्जीव दिसत असतील, तर मग जास्वंदाची फुले व पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवून केसांना सुमारे एक तासासाठी लावा. नंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे काही दिवसांतच केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील.
5. केस गळती रोखण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी आपण जास्वंदाचे तेल केसांना लावले पाहिजे. केस चमकदार होण्यासाठी या तेलामध्ये आपण दही मिक्स करून देखील लावू शकतो. हे आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
6. आपण जास्वंदाची फुले वाळवून त्याची पावडर तयार करू शकतो. ही पावडर आपण तेलामध्ये मिक्स करून तेल गरम करून केसांची मालिश केली पाहिजे. यामुळे आपल्या केसांची वाढ होण्यास मदत होते.
(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
किवी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा फायदे https://t.co/cUqNVdKB2R #Kiwi | #HealthCare | #healthtips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
(Extremely beneficial for Hibiscus flower hair)