Skin care : उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेवरील तेज टिकवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!
उन्हाळ्यात (Summer) त्वचेवर टॅनिंग, घाम येणे, चिकटपणा, मुरुम, पुरळ या समस्यांमध्ये मोठी वाढ होते. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही कितीही महाग उत्पादने वापरत असाल तरीही म्हणावा तसा काही फायदा होत नाही. या समस्या टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घेणे.
मुंबई : उन्हाळ्यात (Summer) त्वचेवर टॅनिंग, घाम येणे, चिकटपणा, मुरुम, पुरळ या समस्यांमध्ये मोठी वाढ होते. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही कितीही महाग उत्पादने वापरत असाल तरीही म्हणावा तसा काही फायदा होत नाही. या समस्या टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घेणे. जेणेकरून तुमच्या त्वचेची (Skin) चमक कायम राहते. जाणून घ्या उन्हाळ्यात त्वचा तजेलदार राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. विशेष म्हणजे बाहेरील क्रिम किंवा उत्पादने (Production) वापरण्यापेक्षा आपण नेहमीच त्वचेची चमक ठेवण्यासाठी घरगुती उपाय वापरावेत.
1. सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे त्वचेवर काळेपणा तर येतो. अशा परिस्थितीत उन्हात जाण्यापूर्वी अर्धा तास आधी त्वचेवर सनस्क्रीन लावावे. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचे अंतर ठेवा. हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून 97 टक्के त्वचेचे संरक्षण करते. सध्याच्या हंगामामध्ये चुकूनही सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहरे अजिबात जाऊ नका.
2.दररोज सकाळी झोपीतून उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर कोरफड जेल लावा. वीस मिनिटे कोरफड जेल त्वचेवर तसेच राहूद्या. त्यानंतर फेसवाॅशने आपला चेहरा धुवा. यामुळे आपला चेहरा कोमल राहण्यास मदत होते. दिवसातून तीन वेळा कोरफड जेल आपल्या त्वचेला लावायला हवेच.
3.त्वचेची टॅनिंग दूर करण्यासाठी आणि त्वचा सुधारण्यासाठी घरगुती फेसपॅक लावा. यासाठी दोन चमचे ओटचे पीठ आणि दोन चमचे टोमॅटोचा रस एक चतुर्थांश कप दुधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा कोमल होऊन त्वचेवरील टॅन दूर होण्यास मदत होते.
4.आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, गुलाब पाणी आपल्या त्वचेसाठी खूप जास्त महत्वाचे आहे. गुलाब पाण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. गुलाब पाणी त्वचेवरील टॅन कमी करण्यासोबतच त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासही मदत करते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या)
संबंधित बातम्या :
आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी सत्तू फायदेशीर, जाणून घ्या त्याचे 5 फायदे!
Skin care : त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी कच्च्या हळदीचा एक तुकडाच फायदेशीर!