Skin Care : फेस वॅक्सिंग ट्राय करत आहात? तर ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!
प्रत्येक स्त्रीला स्वतःला सुंदर ठेवण्याची इच्छा असते. त्वचेच्या सर्व समस्यांसाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने आहेत. परंतु चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी फेस वॅक्सिंग हा एकमेव मार्ग आहे. कारण थ्रेडिंगमुळे फक्त वरच्या भागावरून केस काढून टाकले जातात.
मुंबई : प्रत्येक स्त्रीला स्वतःला सुंदर ठेवण्याची इच्छा असते. त्वचेच्या सर्व समस्यांसाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने आहेत. परंतु चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी फेस वॅक्सिंग हा एकमेव मार्ग आहे. कारण थ्रेडिंगमुळे फक्त वरच्या भागावरून केस काढून टाकले जातात. त्यामध्येही थ्रेडिंग दोऱ्याने हे केस काढले जातात. ज्यामध्ये वेदना प्रचंड होतात. (Follow these tips when waxing your face)
वॅक्सिंग केस पूर्णपणे काढून टाकते. परंतु यामुळे काही समस्यांचा धोका देखील असतो. कारण चेहऱ्याची त्वचा अतिशय संवेदनशील असते. या कारणासाठी वॅक्सिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
फेस वॅक्सिंग दरम्यान या गोष्टी लक्षात ठेवा
1. स्वत: चे फेस वॅक्सिंग करण्याचा कधीही प्रयत्न करू नका. यासाठी एखाद्या तज्ञाची मदत घ्या नाहीतर तुमची त्वचा जळू शकते. त्वचेवर पुरळ, सुरकुत्या इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.
2. फेस वॅक्ससाठी ब्राझिलियन वॅक्स वापरा. हे चॉकलेट फोम आणि पांढरे दोन्ही रंगात येते. वॅक्सचे तापमान, पट्टी वगैरे सर्व काही बरोबर असावे. याशिवाय स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
3. चेहऱ्याचा वॅक्स खूप लवकर लावल्याने तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकते. म्हणून, असे वॅक्स निवडा जे बर्याच काळासाठी केसांची वाढ थांबवते.
4. वॅक्सनंतर त्वचेवर पुरळ, लाल पुरळ येऊ शकते किंवा त्वचा देखील लाल होऊ शकते. म्हणून, वॅक्सनंतर वॅक्सिंग लोशन लावा आणि जर तुम्हाला जास्त चिडचिड वाटत असेल तर कोरफड जेल किंवा मुलतानी मातीचा पॅक लावा. यामुळे त्वचा थंड होईल. बर्फाचे तुकडे जळजळ शांत करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात.
5. वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेचे एक्सफोलिएशन खूप महत्वाचे आहे. यामुळे त्वचेमध्ये असलेली घाण दूर होते आणि केस काढणे थोडे सोपे होते. पण वॅक्सपूर्वी किमान 12 तास आधी स्क्रब केले पाहिजे. आपण एक दिवस अगोदर केले तर अधिक चांगसे.
6. वॅक्सनंतर 24 तास सूर्यप्रकाशाचा संपर्क टाळा. नाहीतर यामुळे आपली त्वचा लाल होण्यास सुरूवात होईल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Follow these tips when waxing your face)