Skin care उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी हे फ्रूट मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक !

उन्हाळ्यात (Summer) त्वचेला घामामुळे चिकटपणा निर्माण होतो. चेहऱ्यावर साचलेली घाण छिद्रांमध्ये जमा होते आणि मग पिंपल्सची समस्या निर्माण होते. यामध्ये त्वचेला थंडावा देऊन ताजेतवाने ठेवावे लागते. उन्हाळ्यात स्किन केअर रूटीन व्यतिरिक्त फेसपॅक (Facepack) किंवा फेस मास्कच्या टिप्स आपण फाॅलो केल्या पाहिजेत.

Skin care उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी हे फ्रूट मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक !
त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो कराImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 3:17 PM

मुंबई : उन्हाळ्यात (Summer) त्वचेला घामामुळे चिकटपणा निर्माण होतो. चेहऱ्यावर साचलेली घाण छिद्रांमध्ये जमा होते आणि मग पिंपल्सची समस्या निर्माण होते. यामध्ये त्वचेला थंडावा देऊन ताजेतवाने ठेवावे लागते. उन्हाळ्यात स्किन केअर रूटीन व्यतिरिक्त फेसपॅक (Facepack) किंवा फेस मास्कच्या टिप्स आपण फाॅलो केल्या पाहिजेत. तज्ज्ञांच्या मते, हे मास्क केवळ त्वचा निरोगी बनवत नाहीत, तर ती दिवसभर ताजेतवाने राहण्यासही मदत करते. तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे फेस मास्क (Face mask) मिळतील पण उन्हाळ्यात फळांपासून बनवलेले मास्क वापरणे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. फळांचे मास्क त्वचेला हायड्रेट ठेवतात. तसेच त्यांचे इतर गुणधर्म त्वचेला अनेक समस्यांपासून वाचवतात.

केळी आणि दूध

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, केळी ही आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपली त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण केळीचा मास्क चेहऱ्याला लावायला हवा. यामुळे त्वचेवरील टॅन जाण्यास मदत होते. यासाठी आपण एक केळी मॅश करून त्यामध्ये दूध मिक्स करायला हवे. मग त्याची चांगली पेस्ट झाल्यानंतर हा मास्क संपूर्ण चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी आपला चेहऱा थंड पाण्याने धुवा.

पपई आणि मध

पपई हे असेच एक फळ आहे, जे आरोग्य आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. तज्ञ आणि डॉक्टर देखील त्वचेच्या काळजीमध्ये वापरण्याची शिफारस करतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि पपेन नावाचे एन्झाईम्स आढळतात, जे त्वचेला आतून दुरुस्त करू शकतात आणि चमकदार बनवू शकतात. असे म्हणतात की पपई चेहऱ्यावर नियमितपणे लावली तर ती एकसमान टोनही देऊ शकते, मॅश केलेली पपई एका भांड्यात ठेवा आणि त्यात दोन चमचे मध टाका, हा मास्क चेहऱ्यावर लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

किवी आणि एवोकॅडो

किवी आणि एवोकॅडो ही दोन्ही फळे व्हिटॅमिन सीने समृद्ध मानली जातात. उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वाचे महत्त्व अधिकच वाढते. व्हिटॅमिन सी त्वचेला आतून निरोगी ठेवते आणि चांगली चमक आणण्यासाठी देखील उपयुक्त आहे. ओमेगा -3 फॅटी ऍसिड देखील निर्जीव त्वचेला जीवन देऊ शकतात. त्याचा मास्त तयार करण्यासाठी, किवी आणि एवोकॅडो मॅश करा आणि त्वचेवर लावा. कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Watermelon : निरोगी राहून वजन कमी करण्यासाठी कलिंगड अत्यंत फायदेशीर, वाचा!

Health : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा महत्वाचे!

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.