Skin care | त्वचेच्या टोन नुसार घ्या त्वचेची काळजी आणि या समस्या कायमच्या दूर ठेवा!
ज्या लोकांची त्वचा ही संवेदनशील आहे, अशांनी आपल्या त्वचेची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. कोणतीही क्रिम वापरण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करायला हवा. कारण संवेदनशील त्वचा लगेचच खराब होण्यास सुरूवात होते. ज्यांची संवेदनशील त्वचा आहे, अशांनी त्वचेला काहीही लावण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
मुंबई : उन्हाळ्यामधील उष्णतेमुळे त्वचेच्या (Skin) आणि शरीराच्या अनेक समस्या निर्माण होण्यास आता सुरूवात झाली आहे. त्वचा कोरडी आणि निर्जीव होते आहे. यामुळे सर्वांचीच चिंता वाढले आहे. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी त्वचेला हायड्रेट करणे आवश्यक आणि तितकेच महत्वाचे (Important) देखील आहे. हंगाम कोणताही असो प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्येही उन्हाळ्याच्या हंगामात स्किन केअर रूटीनचे व्यवस्थित पालन करावे लागते. जर या हंगामात आपण त्वचेची काळजी घेतली नाही तर त्वचा खराब होते. खराब झालेली त्वचा दुरूस्त करण्यासाठी बाजारपेठेमधील महागड्या क्रीम (Cream) वगैरे वापरण्याची अजिबात आवश्यक नसून आपण काही घरगुती उपाय करूनही त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो.
संवेदनशील त्वचा
ज्या लोकांची त्वचा ही संवेदनशील आहे, अशांनी आपल्या त्वचेची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. कोणतीही क्रिम वापरण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करायला हवा. कारण संवेदनशील त्वचा लगेचच खराब होण्यास सुरूवात होते. ज्यांची संवेदनशील त्वचा आहे, अशांनी त्वचेला काहीही लावण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तसेच संवेदनशील त्वचा असलेल्यांनी मुरूमाचा त्रास अधिक असतो.
कोरडी त्वचा
उन्हाळा असो किंवा हिवाळा कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होते. हवेतील ओलावा कमी झाल्यामुळे कोरडी त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. तुमचीही त्वचा कोरडी असेल तर दिवसातून दोन ते तीनदा मॉइश्चरायझर वापरावे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. कोरड्या त्वचेची समस्या जर वाढतच गेली तर आपण साधे पावडर जरी चेहऱ्याला लावले तरीही ते व्यवस्थित दिसत नाही. यामुळे कोरडी त्वचा असलेल्यांनी त्वचेची अधिक काळजी घ्यावी.
तेलकट त्वचा
उन्हाळ्याच्या हंगामात तेलकट त्वचा असलेल्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी मॉइश्चरायझर लावू नये, असे अनेकदा सांगितले जाते. मॉइश्चरायझर न वापरल्याने त्वचा निस्तेज होऊन खराब होऊ शकते, उन्हाळ्यात चेहऱ्यावर अतिरिक्त तेल असले तरी ते धुवा आणि मॉइश्चरायझ लावा. तेलकट त्वचा असलेले लोक मॉइश्चरायझर लावू शकतात. ते त्वचेवर चिकटपणा येऊ देणार नाही आणि ते बराच काळ हायड्रेटेड देखील राहण्यास मदत करते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टारांचा सल्ला नक्की घ्या)