Mosambi Juice : मोसंबीचा रस त्वचेसाठी अत्यंत गुणकारी, वाचा याबद्दल अधिक!
आपल्या सर्वांना माहित आहे की, मोसंबी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडेंट पोषक असतात. मोसंबी केवळ आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की, मोसंबी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडेंट पोषक असतात. मोसंबी केवळ आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात मोसंबीचा समावेश केला पाहिजे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. त्याला एस्कॉर्बिक अॅसिड देखील म्हणतात. (Mosambi Juice is beneficial for the skin)
ब्लीचिंग एजंट म्हणून कार्य करते – मोसंबीचा रस नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून कार्य करते. मोसंबी लिंबूवर्गीय फळांमध्ये येते. लिंबाच्या रसाच्या तुलनेत हे सौम्य ब्लीचिंग एजंट म्हणून कार्य करते. आपण हायपरपिग्मेंटेशन त्वचेवर ताजे पिळून काढलेला मोसंबीचा रस लावू शकतो. याचा नियमित वापर केल्यास तुमची त्वचा चमकू शकते आणि मुरुमांचा त्रास देखील कमी होण्यास मदत होईल.
काळे डाग – ब्लॅकहेड्स आणि काळे डाग या सामान्य समस्या आहेत. यासाठी मोसंबीचा रस फायदेशीर आहे. मोसंबीचा रस पिऊन, आपण ब्लॅकहेड्स आणि काळ्या डागांची समस्या दूर करू शकतो. यामुळे तुमची त्वचा चमकदार बनते.
त्वचेशी संबंधित समस्यांसाठी – मोसंबीचा रस मान, कोपर आणि गुडघे साफ करण्यास मदत करते. मोसंबीच्या रसात उपस्थित अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटीबायोटिक्स जंतूपासून बचाव करण्यास मदत करतात.
सिस्टम डिटॉक्स करण्यासाठी – आपण सोडाऐवजी मोसंबीचा रस घेऊ शकता. त्यात जीवनसत्त्वे असतात. हे आपल्या शरीरास डिटॉक्सिफाई करण्यास मदत करते.
त्वचेसाठी मोसंबीचा रस वापरा
1. आपण त्वचेसाठी मोसंबीच्या सालांचा उपयोग करू शकतो.
2. मोसंबीच्या रसामध्ये मध मिक्स करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.
3. हरभरा पीठ, दही आणि मोसंबीचा रस एकत्र करुन तुम्ही फेसपॅक देखील तयार करू शकता.
4. उन्हात मोसंबीची साल वाळवा आणि बारीक वाटून घ्या. या पावडरला मोसंबीचा रसात मिसळून फेसपॅक बनवा.
5. आपल्या मुरुमांच्या चट्टे बरे होण्यास मदत करण्यासाठी हे एक उत्तम पॅक आहे.
संबंधित बातम्या :
Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Mosambi Juice is beneficial for the skin)