Skin Care : तुमची त्वचा सेन्सिटिव्ह आहे? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घ्यावी लागते. आपण जर त्वचेची काळजी घेतली नाही तर आपली त्वचा निस्तेज बनते. त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्या सुरू होतात.

Skin Care : तुमची त्वचा सेन्सिटिव्ह आहे? मग, 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 6:07 PM

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घ्यावी लागते. आपण जर त्वचेची काळजी घेतली नाही तर आपली त्वचा निस्तेज बनते. त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्या सुरू होतात. मात्र, काही लोक सुंदर त्वचा मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे साैदर्य उत्पादने वापरतात. पण हे साैदर्य उत्पादने सेन्सिटिव्ह त्वचा असलेल्या लोकांना वापरता येत नाहीत. यामुळे त्वचा चांगली होण्यापेक्षा जास्त खराब होण्याची शक्यता असते. (Skin Sensitive Then this face pack is beneficial)

ज्यालोकांची सेन्सिटिव्ह त्वचा आहे, अशांनी आपल्या त्वचेची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. यासाठी आपण घरच्या घरी कोरफडचा फेसपॅक तयार करून लावू शकतो. कोरफड ही सेन्सिटिव्ह त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडचा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे कोरफडीचा गर घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि संपूर्ण त्वचेला लावा. ही पेस्ट चेहऱ्यावरील 20-30 मिनिटे ठेवा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याची पोत वाढण्यास मदत होते.

संवेदनशील त्वचेला विशेष काळजी आवश्यक आहे. कारण, अशा त्वचेला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते, ते स्क्रबिंग टाळतात. आपल्या त्वचेवर मृत त्वचा असल्यास, ती काढून टाकण्यासाठी सौम्य स्क्रब करता येतो. सौम्य स्क्रबसाठी, पिठाच्या कोंड्यामध्ये कोरफड जेल आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावल्यानंतर हलक्या हाताने मालिश करा. थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा.

नाचणी फेस मास्क तयार करण्यासाठी प्रथम नाचणीची बारीक करून त्याची पावडर बनवा. नंतर या पावडरमध्ये दूध आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. त्यामध्ये उपस्थित असलेल्या फिनोलिक आम्ल आणि फ्लेव्होनॉइड चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि डीप पोर्स बंद करण्याचे काम करतात. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावल्यास तुमची त्वचा चमकदार व मऊ होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Skin Sensitive Then this face pack is beneficial)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.