Skin | चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी हे 4 घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर, वाचा!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ओट्स आपल्या आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर असतात. ओट्स स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे ओट्स, 2 चमचे दूध आणि १ चमचा मध लागेल. हे सर्व घटक एकत्र करून पेस्ट बनवा, चेहऱ्यावर तसेच मानेला लावा. काही वेळ त्वचेला मसाज करा. 10 ते 15 मिनिटे असेच राहू द्या.

Skin | चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी हे 4 घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर, वाचा!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 11:06 AM

मुंबई : त्वचेवरील (Skin) काळे डाग ही एक मोठी समस्या असते. त्वचेवरील हे डाग काढणे सोपे काम नाहीये. मात्र, घरगुती स्क्रबच्या मदतीने आपण चेहऱ्यावरील हे डाग नक्कीच काढू शकतो. हे काळे डाग त्वचेवर मेलॅनिनच्या जास्त उत्पादनामुळे होतात. हे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही घरगुती स्क्रब (Scrub) देखील वापरू शकता. यामुळे डाग दूर होण्यास मदत होईल. हे स्क्रब नैसर्गिक घटक वापरून बनवले जातात. विशेष म्हणजे घरगुती स्क्रब तयार करण्यासाठी आपल्याला जास्त खर्चही अजिबात लागत नाही. या स्क्रबचे कोणते ही वाईट परिणाम (Bad results) आपल्या त्वचेवर होत नाहीत. चला तर जाणून घेऊयात हे घरगुती स्क्रब घरच्या-घरी कसे तयार करायचे.

ओट्स आणि दूध

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ओट्स आपल्या आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर असतात. ओट्स स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे ओट्स, 2 चमचे दूध आणि १ चमचा मध लागेल. हे सर्व घटक एकत्र करून पेस्ट बनवा, चेहऱ्यावर तसेच मानेला लावा. काही वेळ त्वचेला मसाज करा. 10 ते 15 मिनिटे असेच राहू द्या. मग मसाज करा. या खास स्क्रबमुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होईल.

काॅफी आणि मध

चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठी काॅफी पावडर देखील खूप जास्त फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला दोन चमचे काॅफी पावडर आणि चार चमचे मध लागणार आहे. काॅफी आणि मध एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

तांदळाचे पीठ आणि दूध

हे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा तांदळाचे पीठ आणि थोडे दूध लागेल. हे दोन्ही चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेला लावा. बोटांनी त्वचेला मसाज करा, 10 मिनिटे त्वचेवर राहू द्या, त्यानंतर ते साध्या पाण्याने धुवा. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. तांदळाचे पीठ पिगमेंटेड आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते.

स्ट्रॉबेरी त्वचेसाठी फायदेशीर

5 स्ट्रॉबेरी घ्या आणि त्या मॅश करा आणि पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि त्वचेला काही मिनिटे मसाज करा. हे तुम्ही आठवड्यातून 3 वेळा वापरू शकता. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ते त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. ते त्वचेला एक्सफोलिएट करते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्यान अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.