Homemade Packs : मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 7 घरगुती फेसपॅक नक्की वापरा!

आजच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये चेहऱ्यावर मुरूम येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र, चेहऱ्यावरील मुरूम आणि त्यानंतर त्याचे डाग यामुळे आपल्या चेहऱ्याचे तीनतेरा वाजतात. चेहऱ्यावरील मुरूम आणि त्याचे डाग काढण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे उत्पादने उपलब्ध आहेत.

Homemade Packs : मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी 'हे' 7 घरगुती फेसपॅक नक्की वापरा!
त्वचा
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 11:51 AM

मुंबई : आजच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये चेहऱ्यावर मुरूम येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र, चेहऱ्यावरील मुरूम आणि त्यानंतर त्याचे डाग यामुळे आपल्या चेहऱ्याचे तीनतेरा वाजतात. चेहऱ्यावरील मुरूम आणि त्याचे डाग काढण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे उत्पादने उपलब्ध आहेत. मात्र, याचा वापर करूनही म्हणावा तसा काही परिणाम होत नाही. जर खरोखरच तुम्हाला चेहऱ्यावरील मुरूम आणि त्याचे डाग दूर करायचे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय हे केले पाहिजेत. (These 7 homemade face packs are beneficial to get rid of acne problem)

कडुलिंब आणि गुलाबपाणी – कडुलिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. कडुलिंबाचा वापर सामान्यतः त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी केला जातो. मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. या पेस्टमध्ये थोडे गुलाब पाणी मिक्स करा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

मध आणि लसूण – मध आणि लसूण दोन्हीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. लसणामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म देखील आहे. मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी मध आणि लसूण फायदेशीर आहे. हे त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करते. लसूण बारीक करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि या पेस्टमध्ये मध मिक्स करा. ही पेस्ट 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर ही पेस्ट धुवा.

हळद आणि कोरफड – कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हळदीला सर्व मसाल्यांचा राजा म्हणून ओळखले जाते. कारण ते अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. एक चमचा कोरफडचा गर आणि हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते.

जायफळ आणि दूध – यासाठी एक चमचा जायफळ आणि एक चमचा कच्चे दूध एकत्र करून पेस्ट लावा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा धुवा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे.

मुलतानी माती आणि गुलाब पाणी – मुलतानी माती आणि गुलाब पाणी हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. एक चमचा गुलाब पाणी, एक चमचा मुलतानी माती आणि चार ते पाच थेंब लिंबाचा रस मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटांनी आपला चेहऱ्या थंड पाण्याने धुवा.

मध आणि पुदीना – काही पुदिन्याची पाने बारीक करून त्यात थोडा मध घालून पेस्ट बनवा. संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

दालचिनी आणि मध – बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी दालचिनी आणि मध फायदेशीर आहे. म्हणून दोन्ही एकत्र मिसळा आणि त्वचेवर लावा. ते सुकेपर्यंत सोडा. यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Broccoli To Lettuce : पाच अँटीऑक्सिडंटयुक्त भाज्या ज्यांचा तुमच्या आहारात जरुर करा समावेश, मिळतील अनेक फायदे

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायामाशी संबंधित या 5 सामान्य मिथकांवर कधीही विश्वास ठेवू नका!

(These 7 homemade face packs are beneficial to get rid of acne problem)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.