Skin Care : चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी ‘हे’ 4 फेसपॅक अत्यंत फायदेशीर!

या हंगामात त्वचेचा अनेक समस्या निर्माण होतात. विशेष करून त्वचा जास्त प्रमाणात टॅन होते. तुम्हीही त्वचेवरील टॅनमुळे त्रस्त असाल तर काही घरगुती उपाय करा.

Skin Care : चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी 'हे' 4 फेसपॅक अत्यंत फायदेशीर!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 11:51 AM

मुंबई : या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेष करून त्वचा जास्त प्रमाणात टॅन होते. तुम्हीही त्वचेवरील टॅनमुळे त्रस्त असाल तर काही घरगुती उपाय करा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन जाण्यास मदत होते. घरगुती फेसपॅक चेहऱ्याला लावले तर फक्त टॅनच नाही तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (This 4 face pack is beneficial for removing facial tan)

संत्री आणि लिंबाच्या सालीचा फेसपॅक – हा फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचा संत्री किंवा लिंबाच्या सालीची पावडर लागणार आहे. या पावडरमध्ये 1 चमचे कच्चे दूध घाला आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावा. यानंतर चेहरा पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे वापरू शकता. दूध आपली त्वचा मॉइश्चराइझ करते. लिंबाच्या सालामध्ये व्हिटॅमिन सी असते. हा फेसपॅक चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी फायदेशीर आहे.  

केळीचा फेसपॅक – आपण केळी, दूध आणि लिंबाचा फेसपॅक घरी तयार करू शकता. यासाठी 1 चमचे दूध, 1 चमचे लिंबाचा रस आणि अर्धी केळी लागेल. केळी चांगली मॅश करा. त्यात लिंबाचा रस आणि दूध मिसळा. हा पॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. सुमारे 10 ते 15 मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर राहूद्या. आपण आठवड्यातून 2 वेळा हा फेसपॅक चेहऱ्याला लावला पाहिजे.

बेसन पीठाचा फेसपॅक – बेसन पीठ त्वचा सुधारण्यासाठी कार्य करते. त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. बेसनचा वापर त्वचेचा टॅन काढून टाकण्यासाठी केला जाऊ शकतो. हे करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन पीठ, 1 चमचे ऑलिव्ह ऑईल, 1 चमचे लिंबाचा रस, एक चिमूटभर हळद आवश्यक आहे. हे सर्व साहित्य मिक्स करावे आणि पेस्ट बनवा. सुमारे 10 ते 15 मिनिटांसाठी ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. यानंतर ते कोमट पाण्याने चेहरा धुवा. आपण आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक वापरू शकता.

दही फेसपॅक – दहीमध्ये नैसर्गिक एंजाइम आणि अॅसिड असतात. जे टॅन काढून टाकतात आणि त्वचेला एक्सफोलिएट करतात. हे त्वचा स्वच्छ करते. हे सूर्यप्रकाशामुळे होणारी लालसरपणापासून संरक्षण करण्यास मदत करते. मधात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला 2 चमचे दही, 1 चमचे मध आवश्यक असेल. या दोन गोष्टी एकत्र करा. हा पॅक 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर ते कोमट पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(This 4 face pack is beneficial for removing facial tan)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.