Skin Care : सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी ‘या’ होममेड नाईट क्रिम त्वचेला लावा! 

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रदूषणामुळे आपली त्वचा खराब होत आहे. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळेडाग, पुरळ आणि कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होत आहे. याशिवाय चेहऱ्यावरील ओलावा कमी झाल्यामुळे त्वचा देखील निर्जीव होते.

Skin Care : सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी 'या' होममेड नाईट क्रिम त्वचेला लावा! 
त्वचेची काळजी
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 4:59 PM

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रदूषणामुळे आपली त्वचा खराब होत आहे. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळेडाग, पुरळ आणि कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होत आहे. याशिवाय चेहऱ्यावरील ओलावा कमी झाल्यामुळे त्वचा देखील निर्जीव होते. त्वचेच्या या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण होममेड नाईट क्रिम आपल्या चेहऱ्याला लावू शकता. ज्यामुळे चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.

होममेड नाईट क्रिम तयार करण्यासाठी आपल्याला चार चमचे कोरफड जेल, गुलाब पाणी, हळद, दही आणि खोबरेल तेल लागणार आहे. होममेड नाईट क्रिम तयार करण्यासाठी वरील सर्व साहित्य एकत्र करा. त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर अगोदर चेहरा धुवा आणि नंतर ही क्रिम चेहऱ्याला लावा. सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

दोन चमचे गुलाब पाणी, एक चिमूटभर केशर, दोन चमचे कोरफड जेल, व्हिटॅमिन ई चे दोन कॅप्सूल घ्या. गुलाब पाण्यात केशर टाकून दहा मिनिटे सोडा. त्यानंतर उर्वरित गोष्टी नीट मिक्स करा. त्यानंतर ते एका डब्यात साठवा. तुम्ही हे क्रीम एका महिन्यासाठी साठवून फ्रिजमध्ये ठेवू शकता. रात्री आपले तोंड नीट धुतल्यानंतर हे क्रीम लावा. सकाळी तोंड धुवा.

एक चमचा मलई, एक चमचा ग्लिसरीन, एक चमचा गुलाबपाणी, एक चमचा ऑलिव तेल घ्या. सर्व गोष्टी नीट मिक्स करा. क्रीम खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या. यानंतर, रोज रात्री हे क्रीम त्वचेवर लावा. हिवाळ्यात हे खूप चांगले कार्य करते आणि कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हे खूप उपयुक्त आहे. ते लावल्याने त्वचा हायड्रेट होते आणि त्वचा खोल मॉइस्चराइज होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This homemade night cream is beneficial for getting radiant skin)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.