AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Homemade Scrub : चमकदार त्वचेसाठी ‘हे’ घरगुती स्क्रब वापरा आणि सुंदर त्वचा मिळवा!

चमकदार त्वचेसाठी एक्सफोलिएशन (Exfoliation) आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमची त्वचा एक्सफोलिएट करता तेव्हा ते त्वचेच्या मृत पेशी आणि त्वचेवर (Skin) साचलेली घाण काढून टाकते. एक्सफोलिएशनमुळे आपल्या त्वचेची चमक परत येण्यास मदत होते. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही होममेड स्क्रब (Scrub) देखील वापरू शकता.

Homemade Scrub : चमकदार त्वचेसाठी 'हे' घरगुती स्क्रब वापरा आणि सुंदर त्वचा मिळवा!
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 3:29 PM
Share

मुंबई : चमकदार त्वचेसाठी एक्सफोलिएशन (Exfoliation) आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमची त्वचा एक्सफोलिएट करता तेव्हा ते त्वचेच्या मृत पेशी आणि त्वचेवर (Skin) साचलेली घाण काढून टाकते. एक्सफोलिएशनमुळे आपल्या त्वचेची चमक परत येण्यास मदत होते. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही होममेड स्क्रब (Scrub) देखील वापरू शकता. होममेड स्क्रब हे आपली त्वचा एक्सफोलिएट करण्याचा उत्तम मार्ग आहे. चला तर होममेड स्क्रब कसे तयार करायचे याबद्दल जाणून घेऊयात.

  1. कॉफी आणि कोरफड हा स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा कोरफड आणि कॉफी पावडर एकत्र मिसळा. हा घरगुती स्क्रब चेहरा आणि मानेवर लावा. 5 ते 8 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता.
  2. साखर आणि दही दही एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जे सुरकुत्या आणि पुरळ कमी करण्यास देखील मदत करते. यासाठी एक चमचा दही घ्या आणि त्यात एक चमचा साखर मिसळा. त्यात थोडे मध घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी होऊ द्या. थोड्या वेळाने पाण्याने धुवा.
  3. लाल मसूर डाळ आणि कच्चे दूध हा स्क्रब बनवण्यासाठी मसूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर ते ब्लेंडरमध्ये ठेवा आणि थोडे कच्चे दूध घाला. त्यानंतर ते मिसळा. ही पेस्ट मानेवर आणि चेहऱ्यावर लावा. 5 ते 10 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.
  4. साखर आणि लिंबू लिंबू त्वचेमध्ये ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. हे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते. साखरेचा वापर नैसर्गिक एक्सफोलीएटर म्हणून काम करतो. जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. यासाठी लिंबाच्या रसामध्ये साखर आणि थोडे मध घाला. या गोष्टी नीट मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.
  5. ओट्स आणि गुलाब पाणी हा स्क्रब बनवण्यासाठी 2 चमचे ओट्सचे बारीक करून पावडर बनवा. त्यात थोडे गुलाबजल टाका. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. त्वचेवर काही मिनिटे मसाज करा. 5 ते 8 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

संबंधित बातम्या : 

Fennel Seeds : वजन कमी करताय? पण काही केल्या होत नाही, मग बडीशेपचे ‘हे’ 6 फायदे एकदा नक्कीच वाचा!

Skin Care for Men : पुरुषांनी त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यावी? फॉलो करा ‘या’ टिप्स

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.