AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips: उन्हाळ्यातही त्वचा, केस चमकदार ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

उन्हाळ्यात केस आणि त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तीव्र सूर्यप्रकाश आणि धुळीचा केस आणि त्वचेवरही वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुम्ही निरोगी केस आणि त्वचेसाठी काही टिप्स (Beauty Tips) देखील फॉलो करू शकता.

Beauty Tips: उन्हाळ्यातही त्वचा, केस चमकदार ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!
उन्हाळ्यातही त्वचा, केस चमकदार ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!Image Credit source: SkinKraft
| Edited By: | Updated on: Apr 29, 2022 | 12:12 PM
Share

कडक उन्हात खूप थकवा आणि आळस येतो. उन्हाळ्याच्या (Summer) दिवसात, बहुतेक लोक थंड पदार्थांचे सेवन करतात, जेणेकरून उष्णतेपासून थोडा आराम मिळतो. आरोग्यासोबतच या ऋतूत त्वचेची आणि केसांची काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. कडक सूर्यप्रकाश आणि धुळीमुळे टॅन, सनबर्न, पिगमेंटेशन, काळे डाग आणि कोरडे केस (Dry Hair and Skin) इत्यादींचा सामना करावा लागतो. एप्रिल आणि मे महिन्यातील कडक उन्हामुळे खूप घाम येतो. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक आणि खनिजे नष्ट होतात. शरीरातील पोषक घटकांची कमी भरून काढण्यासाठी भरपूर पाणी पिणे उपयोगी ठरते. अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणे (Beauty Tips) खूप गरजेचे आहे. केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही अनेक टिप्स देखील फॉलो करू शकता. या गोष्टींचा तुम्हाला खूप उपयोग होईल.

हायड्रेटेड राहा – उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. त्यामुळे, तुमच्या शरीराचे तापमान थंड ठेवतेच शिवाय शरीराला स्वच्छ देखील करते. पुरेसे पाणी प्यायल्याने तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येते. तुम्ही भरपूर पाणी असलेले पदार्थही घेऊ शकता. यामध्ये टरबूज आणि काकडीसारख्या पदार्थांचा समावेश आहे.

बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा – उन्हाळ्यात, तुमच्या हँडबॅगमध्ये सनस्क्रीन असणे आवश्यक आहे. बाहेर पडण्यापूर्वी किमान ३० मिनिटे सनस्क्रीन लावा, जेणेकरून तुमची त्वचा ते शोषून घेईल. हे तुमच्या त्वचेला टॅन होण्यापासून वाचवते. ते थेट सूर्यप्रकाशामुळे सनबर्न, पिगमेंटेशन आणि त्वचेवर काळे डाग टाळते.

त्वचेला नियमितपणे टोन आणि मॉइश्चरायझ करा – घाम आणि घाण आपल्या त्वचेची छिद्रे बंद करतात. यामुळे ब्लॅकहेड्स आणि ब्रेकआउट्स होतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी नियमितपणे त्वचा स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासोबतच त्वचेला टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे देखील तुमच्या ब्युटी रुटीनचा एक भाग असायला हवे.

तुम्ही त्वचेसाठी सौम्य क्लीन्झर वापरा – मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा त्वचेला एक्सफोलिएट करा. बॅगमध्ये फेसवॉश ठेवा. यामुळे त्वचेवर साचलेली घाण दूर होण्यास मदत होईल.

हेअर मास्क वापरा – उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे केसांचेही खूप नुकसान होते. टाळूला घाम आल्याने खाज येण्याची समस्या सुरू होते. अशावेळी तुम्ही होममेड हेअर मास्क वापरू शकता. आठवड्यातून एकदा तरी हेअर मास्क वापरण्याची खात्री करा.

उन्हाळ्यात हलके कपडे घाला – सुती आणि खादीचे हलके कपडे घाला जे तुमच्या त्वचेला श्वास घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यात हलक्या रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य दिले जाते. कारण, फीक्या रंगाचे कपडे शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.