Weight Loss : ‘या’ चुका करणे टाळा आणि वाढलेले वजन कमी करा!
कोरोनाच्या काळात आपल्यापैकी बहुतेकांचे वजन वाढले आहे. या काळात अनेकांनी व्यायाम करणे देखील बंद केले आहे. अन हेल्दी खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. ज्यामुळे दिवसेंदिवस वजन वाढण्याची समस्या निर्माण होत आहे. वजन कमी करणे सोप्पे काम नाही.
मुंबई : कोरोनाच्या काळात आपल्यापैकी बहुतेकांचे वजन वाढले आहे. या काळात अनेकांनी व्यायाम करणे देखील बंद केले आहे. अन हेल्दी खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. ज्यामुळे दिवसेंदिवस वजन वाढण्याची समस्या निर्माण होत आहे. वजन कमी करणे सोप्पे काम नाही. मात्र, आपण काही टिप्स फाॅलो केल्यातर नक्कीच आपले वजन कमी होण्यास मदत होते. (Avoid making these mistakes and lose weight)
पुरेसे अन्न न खाणे
बऱ्याच लोकांना असे वाटते की, कमी अन्न खाल्ल्याने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. तर हे चुकीचे आहे. कमी-कॅलरीयुक्त आहार घेतल्याने सुरुवातीला वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी चुकीचे आहे. उपाशी राहिल्यामुळे अनेक आजार निर्माण होण्याची शक्यता असते.
आहारात प्रथिन्यांचा समावेश
आपल्या आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असणे आवश्यक आहे. आहारात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असावे. जर आपण उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे घटक आपल्या शरीराला भेटणार नाहीत.
70 टक्के आणि 30 टक्के
जास्त व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होणार नाही. नियमित वर्कआउट्स तुमचे वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात, पण जादा व्यायाम कधीही मदत करणार नाही. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की व्यायाम (30 टक्के) वजन कमी करण्यात मदत करते. तर आहार (70 टक्के) वजन कमी करण्यासाठी मदत करते.
एकाच जागी बसणे
जेव्हा तुम्ही जास्त वेळ न हलता बसता तेव्हा तुमचे शरीर लिपेज, एक फॅट-ब्लॉकिंग एंजाइम तयार करणे थांबवते जे तुमचे वजन कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यात महत्वाची भूमिका बजावते. तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात झोप महत्वाची भूमिका बजावते. दररोज 6 ते 8 तास झोप न घेतल्याने वजन कमी होण्याच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो. यामुळे 6 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Skin Care | कोरड्या त्वचेने हैराण? क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’!#SkinCare | #skincareroutine | #homeremedies | #BeautySecrets https://t.co/2j7jbRm7bJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
(Avoid making these mistakes and lose weight)