काळे तीळ आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
मुंबई : काळे तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळे तीळ स्वयंपाकघरात मसाल्याच्या रूपात वापरले जातात. काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहेत. काळ्या तिळाचा आहारात समावेश केल्याने कोण-कोणते फायदे होतात. हे आज आपण बघणार आहोत. (Black sesame is beneficial for health)
1. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी : सकाळी रिकाम्या पोटी आपण काळे तीळ आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. मात्र, तीळ आणि मध एकत्र खाल्ल्यावर एक तास दुसरे काहीही खाणे टाळा.
2. हृदयासाठी फायदेशीर : काळे तीळ हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. जर दररोज सुमारे 10 ते 12 काळे तीळ गाईच्या किंवा बकरीच्या दुधासह घेतल्यास हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो आणि बीपी नियंत्रित राहतो.
3. दृष्टी वाढवते : काळ्या तिळाचे नियमितपणे सेवन केल्याने आपली दृष्टी चांगली होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त ज्यांना डोळ्यांची समस्या किंवा वारंवार डोळे लाल होण्याची समस्या असते त्यांनाही आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केला पाहिजेत.
4. वजन कमी करण्यास उपयुक्त : काळे तीळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी आपल्याला काळ्या तिळात लिंबू मिक्स करून उन्हात ठेवावे लागेल. त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे तीळ खा. यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
5. केसांसाठी : काळ्या तिळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना तेल लावायला आवडत नाही, ते काळ्या तिळाचा वापर करू शकतात. या तीळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम आणि ओमेगा-3चे पोषक घटक असतात.
6. चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते : दोन ते तीन ग्रॅम काळे तीळ दररोज खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढतात. याशिवाय दमा आणि खोकल्याच्या समस्या कमी करण्यासाठी काळे तीळ फायदेशीर आहेत.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!
Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!
Beauty Tips | काजळ लावताना ते पसरण्याची भीती वाटतेय? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!#MakeupTips | #Makeup | #Kajal | #beautytips https://t.co/Pvb6jGdwwB
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021
(Black sesame is beneficial for health)