Weight Loss: वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना दूध पिणे टाळावे? वाचा महत्वाची माहीती!
वाढलेले वजन कमी करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वच लोक प्रयत्न करत आहेत. मात्र, वजन कमी करताना नेमके आहारामध्ये काय घ्यावे याबाबत अनेकांच्या मनात नेहमीच शंका असते. दूध आरोग्यदायी आहे, यात शंका नाही. परंतु त्यात चरबी देखील असते.
मुंबई : वाढलेले वजन कमी करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वच लोक प्रयत्न करत आहेत. मात्र, वजन कमी करताना नेमके आहारामध्ये काय घ्यावे याबाबत अनेकांच्या मनात नेहमीच शंका असते. दूध आरोग्यदायी आहे, यात शंका नाही. परंतु त्यात चरबी देखील असते.
जी वजन वाढण्याशी संबंधित मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना दूध घ्यावे किंवा नाही याबाबत अनेकांना नेहमीच शंका असते. दुधामध्ये सॅच्युरेटेड फॅट असते आणि त्यात कॅलरीज जास्त असतात. वजन कमी करण्यासाठी दोन या घटकांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. 1 कप दुधात सुमारे 5 ग्रॅम चरबी आणि 152 कॅलरीज असतात.
दुधामुळे वजन वाढू शकते का?
दूध वजन वाढवू शकत नाही. खरं तर ते वजन कमी करण्यास मदत करू शकते. दूध हे निरोगी आणि उच्च दर्जाच्या प्रथिनांचा स्त्रोत आहे. स्नायू तयार करण्यासाठी आणि स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक पोषक जसे की झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी यांसारख्या पोषक तत्वांमध्ये देखील ते समृद्ध आहे. हे पोषक घटक तुमची हाडे मजबूत करण्यास, प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि चयापचय वाढविण्यात मदत करतात. 250 मिली दुधामध्ये 8 ग्रॅम प्रथिने आणि 125 मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे तुम्ही डाएट करत असलात तरी रोज मर्यादित प्रमाणात दूध पिले तरीही काही हरकत नाही.
अभ्यास काय सुचवतो?
2004 च्या अभ्यासानुसार कमी कॅलरी डाएट फाॅलो करणारे लोक डेअरी उत्पादने टाळतात. मात्र, दिवसातून तीन वेळा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करून जास्त वजन कमी करता येते. इतर अनेक अभ्यास हे सांगतात की जे लोक दुग्धजन्य पदार्थांचा उच्च आहार घेतात ते वजन कमी केल्यानंतर त्यांचे वजन अधिक काळ वाढत नाही आणि कंबरेचा घेर कमी होतो. याव्यतिरिक्त कॅल्शियममुळे लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम, टाइप-2 मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो.
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Drinking milk while losing weight is beneficial for health)