उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहून वजन कमी करायचे आहे? मग हे काकडीचे पराठे नक्की ट्राय करा!

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात आपल्या आहारामध्ये काकडीचा समावेश करणे अधिक फायदेशीर आहे. काकडीत 90 टक्के पाणी असते. हे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड (Hydrated) ठेवते. उन्हाळ्याच्या दिवसातही ते तुम्हाला थंड ठेवते.

उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहून वजन कमी करायचे आहे? मग हे काकडीचे पराठे नक्की ट्राय करा!
काकडीचा पराठा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 2:57 PM

मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात आपल्या आहारामध्ये काकडीचा समावेश करणे अधिक फायदेशीर आहे. काकडीत 90 टक्के पाणी असते. हे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड (Hydrated) ठेवते. उन्हाळ्याच्या दिवसातही ते तुम्हाला थंड ठेवते. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. काकडी (Cucumber) सलाड म्हणून, काकडीचा रस आणि काकडीचे पराठे देखील तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. काकडीचे पराठे घरच्या-घरी करण्यासाठी देखील खूप जास्त सोपे आहेत. काही मिनिटांमध्ये एकदम झटपट आपण काकडीचे पराठे तयार करू शकतो. चला तर जाणून घेऊयात काकडीच्या पराठ्यांची रेसिपी.

काकडीचे पराठे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप किसलेली काकडी, 2 कप गव्हाचे पीठ, तूप, मीठ,1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिंग हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे.

काकडीचे पराठे कसे बनवायचे जाणून घ्या

सर्वात अगोदर काकडी सोलून किसून घ्या. एका मोठ्या भांड्यात थोडे गव्हाचे पीठ आणि किसलेली काकडी मिक्स करून घ्या. मीठ, हिंग, जिरे, लाल तिखट, आले लसूण पेस्ट आणि कोथिंबीर देखील त्यामध्ये आता मिक्स करा. हे पीठ 15 मिनिटे बाजूला ठेवा. आता पराठे लाटण्यास सुरूवात करा. गरम तव्यावर पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या. आवश्यकतेनुसार तूप लावा. दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.

वाचा काकडीमधील पोषक घटक

काकडीत अनेक पोषक घटक असतात. त्यात क जीवनसत्त्वे असते. पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, फ्लेव्होनॉइड्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फॅ न्यूट्रिएंट्स असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी तर या काकडीच्या पराठ्यांचे दररोज सेवन करायला हवेच.

संबंधित बातम्या : 

Health care : या 5 पदार्थांमुळे आतड्यातील अल्सरचा धोका वाढतो, जाणून घ्या या पदार्थांबद्दल!

Health Care : निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि पाहा बदल!

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.