Anjeer Benefits : दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खा, होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

अंजीरमध्ये पोटॅशियम, सोडियम, फॉस्फोरिक अॅसिड, लोह आणि जीवनसत्त्वे असतात. अंजीरमध्ये बरेच अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हे पोटाची समस्या दूर करण्यात मदत करते.

Anjeer Benefits : दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खा, होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
अंजीर
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 10:20 AM

मुंबई : अंजीर खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीरमध्ये पोटॅशियम, सोडियम, फॉस्फोरिक अॅसिड, लोह आणि जीवनसत्त्वे असतात. अंजीरमध्ये बरेच अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हे पोटाची समस्या दूर करण्यात मदत करते. त्यात कॅलरी कमी असतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी अंजीरचा आहारात समावेश करा. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, दररोज भिजवलेले अंजीर खाण्याचे किती फायदे आहेत. (Eating soaked Anjeer every morning is beneficial for health)

अंजीरमधील पोषक घटक

अंजीरमध्ये झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह यासारखे पोषक घटक असतात. अंजीर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. यात प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि सल्फर सारखे गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच थकवा आणि अशक्तपणा दूर राहतो.

साखरेची पातळी नियंत्रणात राहते

अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या शरीरात साखरेची पातळी नियंत्रित करते. बर्‍याच अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, अंजीरमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. भिजवलेले अंजीर खाण्यामुळे टाइप -2 मधुमेहात रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण मिळते.

वजन कमी करण्यासाठी

जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशांनी देखील आपल्या आहारात अंजीराचा समावेश करावा यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. कोणत्याही प्रकारच्या तापात अंजीर सेवन करणे फायदेशीर मानले जाते, विशेषत: पोट खराब झाल्यास अंजीरचे सेवन लाभदायी ठरते.

त्वचेसाठी फायदेशीर

अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकुष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजीराचा नियमितपणाने आहार सेवन केल्यास फायदा होतो. पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.

हृदयरोग

अंजीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी कार्य करते. काही अभ्यासांमधून असेही दिसून आले आहे की, अंजीरामुळे शरीरातील ट्रायग्लिसरायड्सची पातळी कमी होण्यास मदत होते, जे हृदयाच्या समस्यांशी संबंधित आहेत.

हाडांसाठी फायदेशीर

अंजीरमध्ये कॅल्शियम असते. हे तुमची हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. आपले शरीर स्वतः कॅल्शियम तयार करीत नाही, म्हणून दूध, सोया, हिरव्या पालेभाज्या आणि अंजीर यासारखे पदार्थ खाल्ले पाहिजेत, यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

(Eating soaked Anjeer every morning is beneficial for health)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.