Health Care Tips : उन्हाळ्यात हे ड्रायफ्रूट्स भिजवलेले खा आणि निरोगी राहा!
उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची (Health) विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात काही पदार्थांचा आहारात समावेश करून आपण आपले शरीर हे थंड ठेवले पाहिजे. बहुतेक ड्रायफ्रुट्सची (Driedfruits) चव गरम असते. त्यांचे योग्य प्रकारे सेवन केल्याने शरीराला खूप फायदा होतो. बऱ्याच लोकांना वाटते की, उन्हाळ्याच्या हंगामात ड्रायफ्रुट्स खाणे टाळले पाहिजे. मा
मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची (Health) विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात काही पदार्थांचा आहारात समावेश करून आपण आपले शरीर हे थंड ठेवले पाहिजे. बहुतेक ड्रायफ्रुट्सची (Dry fruits) चव गरम असते. त्यांचे योग्य प्रकारे सेवन केल्याने शरीराला खूप फायदा होतो. बऱ्याच लोकांना वाटते की, उन्हाळ्याच्या हंगामात ड्रायफ्रुट्स खाणे टाळले पाहिजे. मात्र, असे अजिबात नसून उन्हाळ्यामध्येही (Summer) ड्रायफ्रुट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यासोबतच ते पचायलाही खूप सोपे होते.
अक्रोड, बदाम आणि मनुका
अक्रोड, बदाम आणि मनुका यांसारखी सुकी फळे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यांचे सेवन करा, त्यांना पाण्यात भिजवल्याने त्यांची सर्व उष्णता दूर होते. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, बदाम मेंदूला तीक्ष्ण करतात. अक्रोड बद्धकोष्ठता आणि खोकल्यासारख्या समस्या दूर करते. अक्रोडमध्ये लोह, कॅल्शियम, तांबे आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारखे पोषक तत्व असतात. मनुका रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. उन्हाळ्यात मनुके भिजवून खा, मनुके आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात.
सब्जाचा समावेश करा
सब्जा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो. सब्जामुळे आरोग्याच्या अनके समस्या दूर होतात. पोटातील उष्णता दूर करण्यासाठी आपण रात्रभर सब्जा पाण्यामध्ये ठेवावा आणि सकाळी त्याचे सेवन करावे. उन्हाळ्यात सब्जा खाणे खूप जास्त फायदेशीर आहे. एक चमचा सब्जा पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर, तुम्ही त्यांना फालूदा, आइस्क्रीम आणि शरबत यांसारख्या गोष्टींमध्ये मिक्स करून खा.
अंजीरचा समावेश करा
अंजीर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. अंजीर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा. यामुळे रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते. तसेच पचनसंस्थाही निरोगी राहते. यामध्ये झिंक, मॅरिओनिन, आयरन आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात. मात्र, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नकोच व्हायला प्रमाणामध्ये अंजीरचे सेवन करा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Health : आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि रोगांना दूर ठेवा!