Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी मेथी आणि काळी मिरीचे ‘हे’ खास पेय प्या!

वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. मात्र, अनेक उपाय करूनही अनेकांचे वजन कमी होत नाहीये.

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी मेथी आणि काळी मिरीचे 'हे' खास पेय प्या!
मेथीचा चहा
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 4:11 PM

मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. मात्र, अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाहीये. वजन वाढल्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रणच देत असतो. त्यामध्ये कोरोनामुळे लोक घराच्या बाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे सतत घरातमध्ये बसल्यामुळे आणि हलचाली कमी होत असल्यामुळे वाढलेले वजन मोठी समस्या बनले आहे. (Fenugreek and black pepper are beneficial for weight loss)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आज आम्ही खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. यासाठी आपल्याला मेथी आणि काळीमिरी लागणार आहे. हे पेय घरी तयार करण्यासाठी दोन चमचे मेथी आणि दोन चमचे काळी मिरी लागणार आहे. हे दोन्ही रात्री एकत्र मिक्स करून पाण्यात भिजू घाला आणि सकाळी एक ग्लास गरम पाण्यात मिक्स करून गॅसवर मंद आचेवर दहा मिनिटे ठेवा. त्यानंतर गरम असतानाच हे पाणी प्या.

यामुळे शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. हे खास पेय आपण रिकाम्या पोटी पिल्ले पाहिजे. काळी मिरीमध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. अपचनाची समस्या निर्माण होत असेल तर, लिंबाचा अर्धा तुकडा घेऊन त्यातील बिया काढून टाका. त्यात काळे मीठ आणि मिरपूड भरून गरम करा आणि चोखा. याने अपचनाची समस्या दूर होईल. फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये संसर्ग झाल्यास आपण काळीमिरी आणि पुदीना युक्त चहा पिऊ शकता.

सात ते आठ काळी मिरी घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवा. साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. हे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. हे चयापचय वाढविण्यास तसेच चरबी कमी करण्यासाठी मदत करते. त्यातील पोषकद्रव्ये आपली भूक शांत ठेवतात आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Fenugreek and black pepper are beneficial for weight loss)

'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.