Weight Loss Mistakes : आपण ‘या’ चुका करतो, लठ्ठपणा वाढतो, जाणून घ्या कसे?
आपल्यापैकी बरेचजण वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. याचे मुख्य कारण कोरोना आणि खराब जीवनशैली आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक उपायांचा अवलंब करतो, पण अनेक वेळा आपण मेहनत करूनही वजन कमी होत नाही.
मुंबई : आपल्यापैकी बरेचजण वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. याचे मुख्य कारण कोरोना आणि खराब जीवनशैली आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक उपायांचा अवलंब करतो, पण अनेक वेळा आपण मेहनत करूनही वजन कमी होत नाही. आपली जीवनशैली हे यामागील मुख्य कारण आहे. वजन कमी करताना अनेक वेळा आपण काही सामान्य चुका करतो. या चुकांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे आपले वजन वाढू लागते. (Follow these 6 tips to lose weight)
पुरेसे अन्न न खाणे
बऱ्याच लोकांना असे वाटते की, कमी जेवन केल्याने आपले वजन कमी होते. मात्र, हे चुकीचे आहे. सुरुवातीला कमी कॅलरीज खाल्ल्याने वजन कमी होते. पण काही काळानंतर पोषक तत्वांच्या अभावामुळे आरोग्यावर परिणाम होतो. जर आपण आहारामध्ये पोषण घटक कमी घेतले तर आपण आजारीही पडू शकतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी अन्न कमी खाणे चुकीचे आहे.
प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स
आपल्या आहारात प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स आणि चरबीचे सेवन पूर्णपणे थांबवू नका. याशिवाय आहारात भरपूर जीवनसत्वे, खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स घ्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक देखील मिळतात.
मोनोटोन आहार
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो केले तर तोच आहार घेतल्याने वजन वाढते. अभ्यासानुसार, वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात वेळोवेळी बदल करा. एकच डाएट प्लॅन सतत ठेऊ नका.
70 टक्के आहार आणि 30 टक्के व्यायाम
जास्त व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होत नाही. नियमित व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर आहे. पण जास्त व्यायाम करणे हानिकारक आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, 70 टक्के आहार आणि 30 टक्के व्यायाम वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
एकाच जागी बसणे
बराच वेळ एकाच जागी बसून राहिल्याने वजनही वाढते. बराच वेळ बसून, शरीर लिपेज एंजाइमचे उत्पादन थांबवते जे चरबी एंजाइम जाळण्यास मदत करते. हे एंजाइम वजन कमी करण्यास मदत करते.
पुरेशी झोप महत्वाची
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यात झोप मोठी भूमिका बजावते. जर तुम्हाला 6 ते 9 तास झोप मिळाली नाही तर तुमचे वजन वाढवू शकते. खरं तर, पुरेशी झोप न घेतल्याने चयापचय क्रिया प्रभावित होते.
संबंधित बातम्या :
दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Follow these 6 tips to lose weight)