Health Tips : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 7 टिप्स फाॅलो करा!

सध्याची बदलेली व्यस्त जीवनशैली आपल्या आरोग्यावर परिणाम करते. यामुळे उच्च रक्तदाब आणि तणावाशी संबंधित रोगांचा धोका वाढतो. या आजारांचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली अत्यंत महत्वाची आहे. आहारात हळद आणि पौष्टिक गोष्टींचा वापर करा.

Health Tips : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी 'या' 7 टिप्स फाॅलो करा!
निरोगी जीवनशैली
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 12:11 PM

मुंबई : सध्याची बदलेली व्यस्त जीवनशैली आपल्या आरोग्यावर परिणाम करते. यामुळे उच्च रक्तदाब आणि तणावाशी संबंधित रोगांचा धोका वाढतो. या आजारांचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली अत्यंत महत्वाची आहे. आहारात हळद आणि पौष्टिक गोष्टींचा वापर करा. ज्यामुळे आपण हेल्दी राहू शकतो. निरोगी राहण्यासाठी आपण काही टिप्स फाॅलो करणे अत्यंत आवश्यक आहे. (Follow these 7 tips to stay healthy and fit)

1. नियमित नाश्ता करा

बरेचजण सकाळच्या धावपळीमध्ये नाश्ता करणे टाळतात. मात्र, असे करू नका. आपल्या दिवसाची सुरूवात हेल्दी नाश्त्याने करा. तुम्ही सकाळी नाश्त्यात पोहे आणि ओट्स घेऊ शकता. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सकाळची सुरुवात निरोगी आणि पौष्टिक गोष्टींनी झाली पाहीजे.

2. पुरेसे पाणी प्या

दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. शरीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी नारळाचे पाणी, ताज्या फळांचा रस इत्यादी गोष्टींचे सेवन करा.

3. व्यायाम

तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही धावणे, चालणे, पोहणे आणि डान्स करणे असे व्यायाम करू शकता. हे व्यायाम करून तुम्ही तंदुरुस्त राहता. तसेच आजारांपासून दूर राहाल. या व्यतिरिक्त स्वतःला वेळोवेळी कामापासून विश्रांती द्या आणि आपल्या शेड्युलमध्ये स्वत: ची काळजी घ्या. शक्यतो बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने अंघोळ करा.

4. धूम्रपान आणि मद्यपान

निरोगी राहण्यासाठी धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळा. या सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की या गोष्टींचा जास्त वापर केल्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

5. मोबाईल आणि लॅपटाॅप

झोपेच्या दोन तास आधी फोनसह लॅपटाॅप आणि टिव्ही बंदर करा. यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि झोपही लवकर लागेल. नेहमी काहीतरी नवीन शिका जसे पेटिंग, नवीन रेसिपी किंवा व्यायाम यामुळे आपला ताण कमी होण्यास मदत होते.

6. पुरेशी झोप

तुमची झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ सेट करा आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. दररोज 7 ते 8 तास पुरेशी झोप घ्या. दररोज रात्री 10 वाजता झोप आणि सकाळी 6 ते 7 पर्यंत उठा.

7. त्वचेची काळजी

ब्रोकोलीमध्ये अनेक घटक असतात. जे त्वचेला अतिनील किरणांपासून वाचवण्यास मदत करतात. यात भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते शरीरातून विष काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे पुरळ आणि सुरकुत्याची समस्या कमी होण्यास मदत होते. ब्रोकोलीचे सेवन केल्यानेही त्वचा चमकदार होते. ब्रोकोलीमध्ये असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन-सी सारखे पोषक घटक केस मजबूत करण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these 7 tips to stay healthy and fit)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.