Health care: वजन कमी करून स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे आहे? कॅलरीजनुसार हा डाएट प्लॅन फाॅलो करा आणि वजन कमी करा!

आजकाल बहुतेक लोक वाढलेल्या वजनामुळे (Weight) त्रस्त आहेत. वाढलेल्या वजनामुळे शरीराच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेकांचा भर आहे. वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचालींसोबतच (Physical movement) आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Health care: वजन कमी करून स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे आहे? कॅलरीजनुसार हा डाएट प्लॅन फाॅलो करा आणि वजन कमी करा!
वजन कमी करण्यासाठाी आहारामध्ये कमी कॅलरी घेणे आवश्यक आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 10:53 AM

मुंबई : आजकाल बहुतेक लोक वाढलेल्या वजनामुळे (Weight) त्रस्त आहेत. वाढलेल्या वजनामुळे शरीराच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेकांचा भर आहे. वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचालींसोबतच (Physical movement) आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी तुम्ही कमी कॅलरीयुक्त आहार घेतला पाहिजे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील कॅलरीजचे (Calories) प्रमाण संतुलित करून वजन वाढण्याची समस्या बर्‍याच प्रमाणात टाळता येते. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी 1500 कॅलरी डाएटबद्दल सांगणार आहोत. हा डाएट फाॅलो करून तुम्ही वाढलेले वजन झटपट कमी करू शकता.

हिरव्या भाज्या

निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर आहे. त्यांचे सेवन केल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता तर पूर्ण होतेच, त्याचबरोबर वजनही वाढत नाही. तज्ञांच्या मते, तुम्ही 1500 कॅलरी डाएटमध्ये ब्रोकोली, फ्लॉवर, शिमला मिरची, मशरूम, टोमॅटो आणि इतर भाज्या समाविष्ट करू शकता. लोहाची कमतरता पूर्ण करण्यासोबतच डोळ्यांची दृष्टीही वाढवण्यासाठी आहारामध्ये पालकाचा समावेश असणे महत्वाचे आहे.

कडधान्य

वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारामध्ये ब्राऊन राइस, बार्ली, बाजरी आणि इतर कडधान्याचा समावेश करू शकता. दररोज सकाळी काळ्या मिरीचे पाणी घेतल्याने पोटावरील चरबी कमी होण्यासही मदत होते. निरोगी चरबीसाठी अॅव्होकॅडो तेल, ऑलिव्ह तेल आणि खोबरेल तेलाचा आहारात समावेश करा.

फळे

फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. विशेष म्हणजे फळांच्या मदतीने आपण वाढलेले वजन देखील कमी करू शकतो. मात्र, वजन कमी करण्यासाठी केळी, सफरचंद, बेरी आणि आंबट फळांचाच आपल्या आहारामध्ये समावेश करा. नेहमीच कधीही फळांचा रस करण्यापेक्षा फळे कापून खा.

अंडी

तज्ज्ञांच्या मते, रोज एक किंवा दोन अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अंडी खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे ते उकळल्यानंतरच खा. अंडी वजन कमी करण्यासाठी देखील मदत करते. शक्यतो सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडीचा समावेश करा. यामुळे आपल्या शरीराला दिसभर ऊर्जा मिळते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

या गोष्टींपासून चार हात दूरच राहा!

मुळात फास्ट फूड खाणेच आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. विशेष: जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी तर अजिबात फास्ट फूड खाऊ नये. फास्ट फूडमध्ये कॅलरी अत्यंत जास्त असतात. ज्यामुळे वजन झटपट वाढते.

संबंधित बातम्या : 

Hemorrhoids : मूळव्याधाच्या त्रासामुळे त्रस्त आहात? मग जाणून मूळव्याध म्हणजे नेमके काय आणि मूळव्याधाचे प्रकार!

Recipe tips: वाढलेले वजन झटपट कमी करायचे आहे? मग आपल्या आहारामध्ये आजच मूगडाळीच्या चिला घ्या, वाचा फायदे! 

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....