Raisin Water : मनुक्याचे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल अधिक!  

मनुका हे सर्वात लोकप्रिय ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे. याचा सर्वाधिक वापर मिठाई बनवण्यासाठी केला जातो. हे ड्रायफ्रूट केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तुम्ही मनुक्याच्या पाण्याचेही सेवन करू शकता. तुम्हाला ऊर्जा देण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

Raisin Water : मनुक्याचे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल अधिक!  
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 11:04 AM

मुंबई : मनुका हे सर्वात लोकप्रिय ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे. याचा सर्वाधिक वापर मिठाई बनवण्यासाठी केला जातो. हे ड्रायफ्रूट केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तुम्ही मनुक्याच्या पाण्याचेही सेवन करू शकता. तुम्हाला ऊर्जा देण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. हृदयाचे आरोग्य सुधारण्यापासून ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मनुका पाणी फायदेशीर आहे.

मनुक्याचे पाणी कसे बनवायचे

यासाठी पाणी, मनुका आणि लिंबू लागेल. 2 कप पाणी आणि 150 ग्रॅम मनुका घ्या. एका पातेल्यात पाणी टाकून उकळी आणा. मनुके घालून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून मंद आचेवर गरम करा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. जर तुम्हाला त्याची चव वाढवायची असेल तर पाण्यात लिंबू घाला.

यकृत डिटॉक्सिफाय करते

मनुका पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल. हे पेय यकृताची जैवरासायनिक प्रक्रिया सुधारते आणि तुम्हाला रक्त शुद्ध करण्यास मदत करते. हे तुमचे यकृत सहजपणे डिटॉक्स करते.

अॅसिडिटीचा त्रास

जर तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर मनुका पाणी पिणे तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे. हे पाणी तुमच्या पोटातील अॅसिड नियंत्रित करते.

प्रतिकारशक्ती वाढवते

मनुका पाण्यात अँटिऑक्सिडंट असतात. जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मनुक्याच्या पाण्याचा आहारात समावेश करा.

हृदयाचे आरोग्य राखते

मनुका पाणी तुमचे रक्त शुद्ध करण्याचे काम करते आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते आणि तुमचे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

कर्करोग प्रतिबंधित करते

मनुक्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स देखील तुमच्या शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 

सकाळी मनुका पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मनुका फ्रुक्टोज आणि ग्लुकोजमध्ये भरपूर असतात. ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते. त्यामध्ये फायबर देखील असते ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.