Summer Diet : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी या डाळींचा आहारात समावेश करा!

उन्हाळ्यात (Summer) पोटात जळजळ आणि उष्णतेची समस्या अनेकदा निर्माण होते. तळलेले भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात अपचन, गॅस आणि अॅसिडीटीचा त्रास सुरू होतो. पोटातील जळजळ शांत करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पदार्थांचे (Food) सेवन करतात.

Summer Diet : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी या डाळींचा आहारात समावेश करा!
उन्हाळ्याच्या हंगामात डाळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 11:34 AM

मुंबई : उन्हाळ्यात (Summer) पोटात जळजळ आणि उष्णतेची समस्या अनेकदा निर्माण होते. तळलेले भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात अपचन, गॅस आणि अॅसिडीटीचा त्रास सुरू होतो. पोटातील जळजळ शांत करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पदार्थांचे (Food) सेवन करतात. पोटातील उष्णता थंड करण्यासाठी लोक थंड पेय, ज्यूस आणि शरबत यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्ही फाॅलो करून पोटातील जळजळ कमी करू शकता. विशेष म्हणजे या पदार्थांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर (Beneficial) ठरेल.

मुगाची डाळ

मुगाची डाळ हा आरोग्याचा खजिना आहे. याचे सेवन केल्याने शरीरात ते सर्व पोषक तत्व पूर्ण होतात, जे निरोगी राहण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मूग डाळीमध्ये ए, बी, क आणि ई सारखी अनेक जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर पोटॅशियम, लोह, कॅल्शियम मॅग्नेशियम, कॉपर, फोलेट, फायबर यांसारखे इतर पोषक घटकही त्यात मुबलक प्रमाणात असतात. मूग डाळ खूप थंड असते. मुग डाळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये मुगाच्या डाळीचा समावेश करा.

उडदाची डाळ

उडदाची डाळ खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने, खनिजे आणि अनेक जीवनसत्त्वेही आढळतात. उडीद डाळ शरीरातील जळजळ कमी करू शकते असे म्हटले जाते आणि ताप कमी करण्यासाठी देखील ती फायदेशीर आहे. यामध्ये फायबर देखील योग्य प्रमाणात असते आणि त्यामुळे याचे सेवन पोटासाठी फायदेशीर मानले जाते. सांधेदुखी किंवा दम्याच्या रुग्णांसाठी उडीद डाळीचे सेवन फायदेशीर ठरते.

हरभऱ्याची डाळ

हरभऱ्याच्या डाळीमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. म्हणूनच उन्हाळ्यात लोक वेगवेगळ्या प्रकारे याचा आहारात समावेश करतात. विशेष म्हणजे हरभऱ्याच्या डाळीच्या मदतीने आपण अनेक छान आणि चकमकीत खाद्यपदार्थ देखील तयार करू शकतो. हरभऱ्याच्या डाळीच्या मदतीने दह्याची कढी तर अप्रतिमच होते. उन्हाळ्याच्या हंगामात दही देखील खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे दुपारच्या जेवणामध्ये आपण कढीचा देखील आहारात समावेश करू शकता.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Loss of Appetite : तुमचीही मुले जेवणासाठी कंटाळा करतात? मग जाणून घ्या भूक न लागण्याची कारणे!

Health : नियमित व्यायामामुळे वजन तर कमी होतेच शिवाय नैराश्य दूर होण्यासही मदत होते, वाचा महत्वाचे!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.