AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care : ‘हे’ 5 हेल्दी ड्रिंक्स तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर!

आपल्या शरीरातील बहुतेक विषारी घटक मूत्र आणि घामाद्वारे बाहेर पडतात. अशा परिस्थितीत शरीराला भरपूर पाणी आणि इतर द्रव आहाराची गरज असते. जर शरीराला पुरेसा द्रव आहार मिळत नसेल, तर अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.

Health care : 'हे' 5 हेल्दी ड्रिंक्स तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर!
आरोग्य
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 4:57 PM
Share

मुंबई : आपल्या शरीरातील बहुतेक विषारी घटक मूत्र आणि घामाद्वारे बाहेर पडतात. अशा परिस्थितीत शरीराला भरपूर पाणी आणि इतर द्रव आहाराची गरज असते. जर शरीराला पुरेसा द्रव आहार मिळत नसेल, तर अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे त्याचा आपल्या त्वचेवरही वाईट परिणाम होतो. यामुळे आपली त्वचा निर्जीव होते. (These 5 healthy drinks are beneficial for your health and skin)

गाजर बीट ज्यूस

गाजर आणि बीट दोन्ही पोषक तत्वांचे भांडार मानले जातात. त्यांचा रस नियमित प्यायल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. यामुळे अशक्तपणा, थकवा यासारखी कोणतीही समस्या होत नाही आणि भरपूर ऊर्जा मिळते. गाजर बीट ज्यूस पिल्यामुळे सुरकुत्या, पुरळ, पिग्मेंटेशन सारख्या समस्या दूर होतात.

आवळा-कोरफडीचा ज्यूस

आवळा आणि कोरफड दोन्ही आयुर्वेदात प्रभावी औषधी वनस्पती मानल्या जातात. त्याचा रस रोज सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होतो, मधुमेह नियंत्रित होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि नैसर्गिक चमक येते. केस मजबूत होण्यास देखील हा ज्यूस फायदेशीर आहे.

सफरचंद ज्यूस

सफरचंद सुपरफूड मानले जाते. त्यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. त्याचा ज्यूस नियमित प्यायल्याने दृष्टी सुधारते, पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. त्याचबरोबर सफरचंद त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. हे त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करते, तसेच वृद्धत्वाची अकाली चिन्हे, ऊतींचे नुकसान आणि सुरकुत्या टाळण्यास मदत करते.

काकडीचा ज्यूस

काकडीचा ज्यूस आरोग्यासाठी आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ए, बी 1, बी 6 सी, डी, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह इत्यादी यात आढळतात. हे शरीराला जास्त काळ हायड्रेटेड ठेवते. तसेच, ते बद्धकोष्ठतेसह पोटाच्या सर्व समस्या दूर करते. रोज त्याचा रस प्यायल्याने त्वचेला आतून मॉइश्चराइज होते आणि त्यावर नैसर्गिक चमक येते. काकडीचा ज्यूस शरीरातील पाणी टिकून राहण्यास प्रतिबंध करतो.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरात इलेक्ट्रोलाइट नियंत्रण राहते. बीपी नियंत्रित करते आणि शरीराला अधिक चांगल्या प्रकारे डिटॉक्स करते. हे व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट्स, सोडियम आणि पोटॅशियम समृध्द आहे. नारळ पाण्यामुळे त्वचा घट्ट होते आणि मुरुमाची समस्या दूर होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(These 5 healthy drinks are beneficial for your health and skin)

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.