Herbal Tea Benefits : हे 5 हर्बल टी ताण कमी करण्यासाठी मदत करतात, वाचा!

तुळशीचा चहा तयार करण्यासाठी तुळशीची पाने महत्वाची आहेत. एका अभ्यासानुसार, तुळस ताण आणि चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी तुळशीची पाने, चिरलेली आले आणि वेलची पावडर उकळत्या पाण्यात टाकून पाच मिनिटे उकळू द्या. त्यानंतर तुम्ही चहा गाळून त्यात चवीनुसार मध किंवा लिंबाचा रस घालू शकता.

Herbal Tea Benefits : हे 5 हर्बल टी ताण कमी करण्यासाठी मदत करतात, वाचा!
हर्बल टी
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 4:24 PM

मुंबई : बहुतेक लोकांना चहा पिणे आवडते. चहामध्ये कॅफीन असते जे तुमची ऊर्जा वाढवते. या व्यतिरिक्त कामाचा ताण दूर करण्यासाठी आपण चहा घेऊ शकता. यामुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते. आपण आहारामध्ये नेमक्या कोणत्या हर्बल टी घेतल्या पाहिजेत. हे आपण बघणार आहोत. (These 5 Herbal Teas are extremely beneficial for health)

तुळशीचा चहा

तुळशीचा चहा तयार करण्यासाठी तुळशीची पाने महत्वाची आहेत. एका अभ्यासानुसार, तुळस ताण आणि चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी तुळशीची पाने, चिरलेली आले आणि वेलची पावडर उकळत्या पाण्यात टाकून पाच मिनिटे उकळू द्या. त्यानंतर तुम्ही चहा गाळून त्यात चवीनुसार मध किंवा लिंबाचा रस घालू शकता.

ग्रीन टी

ग्रीन टी हे सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पेयांपैकी एक आहे, कारण हे विविध प्रकारचे आरोग्य फायदे देते. जर तुम्हाला दिवसाची सुरूवात चांगली करायची असेल तर आपण ग्रीन टी घेतली पाहिजे. ग्रीन टी चिंता कमी होण्यास मदत करते आणि तणाव टाळते. एक कप पाणी घ्या आणि ते उकळेपर्यंत गरम करा आणि त्यात एक चमचा हिरव्या ग्रीन टी घाला आणि गरमा-गरम प्या.

कॅमोमाइल चहा

वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा सर्वोत्तम पेय मानला जातो. आपल्यालाही आपले वाढते वजन नियंत्रित करायचे असेल, तर रात्री झोपेच्या आधी कॅमोमाइल चहा पिणे विसरू नका. असे केल्याने केवळ तुमचे वजनच नियंत्रित होणार नाही, तर तुम्हाला झोपही चांगली मिळेल. विशेष म्हणजे कॅमोमाइल चहा ताण कमी करण्यास देखील मदत करते.

पुदिना चहा

पुदिना चहा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे आपले मूड सुधारण्यासाठी कार्य करते. हा चहा तयार करण्यासाठी पुदिन्याच्या झाडाची पाने गरम पाण्यात पाच ते दहा मिनिटे ठेवा त्यानंतर हे पाणी प्या. उलट्यांची समस्या टाळण्यासाठी पुदीना वापरणे खूप फायदेशीर मानले गेले आहे. यासाठी पुदीनाच्या पानात दोन थेंब मध मिसळून सेवन करावेत.

ब्लॅक टी

एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, जे लोक दररोज ब्लॅक टी पितात त्यांच्या तणावाच्या पातळीत घट दिसून येते. हा चहा तणाव संप्रेरकांची पातळी सामान्य करण्यास मदत करतो. उकळत्या पाण्यात चहा पावडर आणि साखर मिक्स करा आणि उकळू द्या. त्यानंतर तुम्ही चहा गाळून, आणि चवीनुसार लिंबू मिक्स करा आणि प्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(These 5 Herbal Teas are extremely beneficial for health)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.