Weight Loss Tips : वजन कमी करायचे आहे? मग फक्त या 5 टिप्स फाॅलो करा!

धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे (Health) विशेष लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे वजनही झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. वजन कमी करण्यासाठी सर्वांत महत्वाचे आहे, डाएट (Diet) आणि व्यायाम. विशेष म्हणजे सध्याचा उन्हाळ्याचा हंगाम वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला आहे.

Weight Loss Tips : वजन कमी करायचे आहे? मग फक्त या 5 टिप्स फाॅलो करा!
वजन कमी करण्यासाठी या टिप्स फायदेशीर आहेत. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 10:26 AM

मुंबई : धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे (Health) विशेष लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे वजनही झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. वजन कमी करण्यासाठी सर्वांत महत्वाचे आहे, डाएट (Diet) आणि व्यायाम. विशेष म्हणजे सध्याचा उन्हाळ्याचा हंगाम वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला आहे. कारण या काळात उष्णता अधिक असल्यामुळे आपण पाणी (Water) जास्त प्रमाणात पितो आणि वजन कमी करण्यासाठी पाणीही फायदेशीर आहे. दिवसभर अधिक पाणी पिल्यामुळे आपण अन्न कमी खातो आणि आपले पोटही बऱ्याच वेळ भरलेले राहते.

पाणी आणि फळांचे ज्यूस

निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी आपल्याला हायड्रेटेड राहण्यास मदत करते आणि शरीरातील अतिरिक्त विष काढून टाकते. जास्त पाणी प्यायल्यास अन्न खाण्याची इच्छाही निघून जाते. त्वचाही चांगली असते. तसेच उष्ण हवामानात तुम्ही शरबत, नारळपाणी यांचाही आहारामध्ये समावेश करू शकता. मात्र, ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी शरबतमध्ये साखर कमी प्रमाणात टाकावी.

साखर कमी आणि मीठ कमी खा-

जास्त साखर किंवा मीठ खाल्ल्याने कॅलरीज वाढतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये साखर आणि मीठ दोन्ही कमी खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

वेळेवर खाणे फायदेशीर-

आपल्यापैकी अनेकांना वेळेवर जेवणाची सवय नसते. जेंव्हा भूक लागते त्यावेळी खाण्याची सवय अनेकांना आहे. मात्र, वजन कमी करण्यासाठी आपली ही सवय सर्वांत अगोदर चेंज करा. तसेच बाहेरील पदार्थ खाणे टाळून घरी शिजवलेले अन्न खाण्याचा प्रयत्न करा.

झोप अत्यंत महत्वाची-

झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. म्हणून पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. अन्यथा हार्मोन्स नीट काम करत नाहीत, चयापचय कमी होतो. यामुळे वजन कमी करण्यास समस्या निर्माण होऊ शकतात.

फळे आणि भाज्या खा-

तुमच्या रोजच्या आहारात फळे आणि भाज्या जास्त घ्या. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर पोषक, फायबर, प्रथिने, खनिजे असतात. फळे आणि भाज्या खाल्ल्याने देखील काउंटर फूडचे प्रमाण कमी होते, जे वजन कमी करण्यास फायदेशीर आहे.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Salt intake tips : जेवणात मीठ कमी केल्याने आरोग्याला हे फायदे होतात, वाचा सविस्तरपणे! 

Weight Loss : जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी ओट्सची खास रेसिपी, वाचा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.