AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Tips : वजन कमी करायचे आहे? मग ‘या’ फक्त 6 टिप्स फाॅलो करा आणि स्लिम-ट्रिम व्हा…

आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल की, वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत. पहिले म्हणजे जेवण आणि दुसरे म्हणजे व्यायाम करणे. मात्र, वजन कमी करण्यासाठी फक्त हेच पुरेसे नसून आपल्याला जीवनशैलीमध्ये काही बदल करणे खूप आवश्यक आहे.

Weight Loss Tips : वजन कमी करायचे आहे? मग 'या' फक्त 6 टिप्स फाॅलो करा आणि स्लिम-ट्रिम व्हा...
वाढलेले वजन
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 9:58 AM
Share

मुंबई : आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल की, वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत. पहिले म्हणजे जेवण आणि दुसरे म्हणजे व्यायाम करणे. मात्र, वजन कमी करण्यासाठी फक्त हेच पुरेसे नसून आपल्याला जीवनशैलीमध्ये काही बदल करणे खूप आवश्यक आहे. कारण व्यायाम आणि जेवण व्यवस्थित करूनही अनेक वेळा वजन कमी होत नाही. कारण आपल्या काही वाईट सवयींमुळे वजन कमी होत नाही.

जेवण लवकर करा

रात्रीचे जेवण नेहमीच लवकर केले पाहिजे. तसेच आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. सात ते नऊ दरम्यान तुमचे रात्रीचे जेवण झाले पाहिजे.

हिरव्या भाज्या आणि फळे

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका फळे आणि भाज्या बजावतात. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खा. तसेच हंगामी फळांचा देखील आहारात समावेश करा.

रात्री लवकर झोपा

बऱ्याच वेळा आपण रात्री मोबाईल लॅपटाॅप आणि टिव्ही समोर वेळ घालवतो. यामुळे आपल्याला रात्री झोपायला उशीर होतो. मोबाईल लॅपटाॅप आपल्या पासून दूर लवकर ठेवल्याने रात्री लवकर झोप लागते.

30 मिनिटे चाला

रात्रीचे जेवण झाल्यानंतर हळूहळू किमान 30 मिनिटे चाला. यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते. यामुळे शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते.

सकाळी व्यायाम करा

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे व्यायाम आहे. वजन कमी करायचे असेल तर दररोज सकाळी न चुकता व्यायाम करा. यामुळ शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते.

हे फाॅलो करा!

सकाळचा नाश्ता ते दुपारच्या जेवणादरम्यान फळं, नारळाचे पाणी, रस, ताक असे काहीतरी सेवन करा. दुपारच्या जेवणात प्रथम सलाड खा. त्यानंतर डाळ, 2 विनातेल चपात्या आणि हिरव्या भाज्या खा. चपाती बार्ली, हरभरा आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाची असावी. चपातीसाठी मका, गहू, बाजरी हे त्या-त्या हंगामाप्रमाणे बदला. दुपारच्या जेवणानंतर चहा किंवा ग्रीन टी सोबत संध्याकाळच्या नाश्त्यात भाजलेले चणे खा.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.