Massage oils : नेहमी मसाज करता?, मग ‘हे’ 5 मसाज तेल वापरुन बघा!
मसाज केल्याने स्नायू, हाडे, शरीराला टोन, पोटाच्या समस्या टाळण्यास मदत होते. विषेश म्हणजे मसाज केल्याने झोपेची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते.
मुंबई : मानसिक आणि शारीरिक तणाव कमी करण्यासाठी मसाज करणे फायदेशीर आहे. मसाज केल्याने स्नायू, हाडे, शरीराला टोन, पोटाच्या समस्या टाळण्यास मदत होते. विशेष म्हणजे मसाज केल्याने झोपेची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते. मात्र, मसाज करताना आपण कोणते तेल वापरतो हे अत्यंत महत्वाचे आहे. मसाज करण्यासाठी नेमके कोणते तेल चांगले आहे. हे आज आम्ही सांगणार आहोत. (These are the best oils for massage)
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे तेल आपल्या स्नायूंना आराम देण्याचे काम करते. यामुळे रक्त परिसंचरण, वेदना कमी करणे, स्नायूंचा त्रास कमी आणि शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, या तेलाचा नियमित वापर केल्यामुळे त्वचेला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण मिळू शकते.
तिळाचे तेल
मजबूत हाडे असणे खूप महत्वाचे आहे. आपली हाडे मजबूत करण्यासाठी तिळाच्या तेलापेक्षा दुसरे काहीही चांगले नाही. तिळाच्या तेलात तांबे, मॅग्नेशियम, कॅल्शियम, निरोगी ओमेगा -3 चरबी आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत आहे. तिळाच्या तेलाने मालिश केल्याने तुमची हाडे मजबूत होतात आणि मन शांत होते. हे आपल्या त्वचेला मॉइश्चरायझेशन करण्यास देखील मदत करते.
नारळाचे तेल
नारळाचे तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. प्राचीन काळापासून, लोक चमकदार केसांसाठी हे तेल वापरत आहेत. यात अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत. यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत, जे आपली त्वचा साफ करण्यास मदत करतात. तिळाचे तेल क्लीन्सर म्हणून त्वचेवर काम करते.
बदाम तेल
बदाम तेलाने शरीराचा मसाज करणे अत्यंत फायदेशीर आहे. बदाम तेलात व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करून, रंग उजळण्यास मदत करते. दररोज बदामाच्या तेलाने मसाज केल्याने आपली त्वचा चांगली होते आणि शरीराचा थकवा दूर होण्यास मदत होते.
मोहरीचे तेल
मोहरीचे तेल थोडेसे चिकट असते. मात्र, मोहरीच्या तेलाने मालिक करणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते. त्वचेवर, विशेषत: हिवाळ्यामध्ये कोमट मोहरीचे तेल लावल्याने कोरडी त्वचा टाळता येते. त्यातील संयुगे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंधित करतात.
संबंधित बातम्या :
Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(These are the best oils for massage)