वीकऑफच्या दिवशी फिरण्याचा प्लॅन करताय, पण प्रवासाचा कंटाळा आलाय? मग ‘ही’ ठिकाणं ठरतील बेस्ट
Top 5 travel Destinations near Mumbai: तुम्ही मुंबई शहरात राहत असाल आणि एक दिवसाची सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल तर. मग हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला मुंबईजवळील काही ठिकाणे सांगत आहोत जिथे तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेऊ शकता.
Top 5 travel Destinations near Mumbai: गुलाबी थंडीच फिरण्याची मजाच काही वेगळी असते. तुम्ही देखील फिरण्याचा प्लॅन आखत आहात का? असं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही मुंबई शहरात राहत असाल आणि एक दिवसाची सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल तर. मग हा लेख तुमच्यासाठी आहे.
हिवाळा हा फिरण्यासाठी किंवा ट्रॅव्हल करण्यासाठी खूप चांगला ऋतू मानला जातो. या ऋतूत लोकांना सुट्टी साजरी करण्यासाठी हिल स्टेशनवर जाणे आवडते. हिवाळ्यात आपण काही हिल स्टेशन्सवर बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता. काही दिवस आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून फिरणंही गरजेचं असतं. अशावेळी जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही तुमच्या सभोवतालची ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
आज आम्ही तुम्हाला मुंबईच्या आजूबाजूच्या काही उत्तम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही एका दिवसाच्या सुट्टीत आनंद घेऊ शकता. त्यामुळे तुम्हीही मुंबईत राहत असाल तर एक दिवस या सुंदर ठिकाणी नक्की घालवा.
माथेरान
माथेरान हे मुंबईजवळील हिल स्टेशन आहे. हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशनपैकी एक आहे. हे ठिकाण सर्वात स्वच्छ ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्हाला कोणतेही प्रदूषण अजिबात आढळणार नाही. हिरवाईने नटलेले हे हिल स्टेशन तुम्हाला शांततेची अनुभूती देईल.
वेंगुर्ला
वेंगुर्ला हे महाराष्ट्रातील एक छोटेसे बीच आहे. इथे तुम्हाला झाडांनी सजवलेल्या टेकड्या, सुंदर समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स पाहायला मिळतील. इथे आल्यावर तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल. ज्यामुळे तुमची एक दिवसाची सुट्टी यशस्वी होईल.
भंडारदरा
भंडारदरा हे मुंबईजवळील सर्वात सुंदर हिल स्टेशन पैकी एक आहे. हिवाळ्यात फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे आपल्याला अनेक तलाव, किल्ले आणि हिरवळ पाहायला मिळेल. वाढत्या हिवाळ्यात येथील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत जातो.
महाबळेश्वर
मुंबईकरांसाठी महाबळेश्वर हे फिरण्यासाठी एक चांगली जागा आहे. हे हिल स्टेशन तुम्हाला या थंड हवामानात येथे फिरण्याचा एक वेगळा अनुभव देईल. येथे धबधबा, एलिफंट हेड पॉईंट, धोबी धबधबा, तापोळा लेक, विल्सन पॉईंट, शिवसागर तलाव यांचा आनंद घेता येतो.
पाचगणी
मुंबईजवळ असलेले पाचगणी हे देखील हिवाळ्यात चांगला पर्याय आहे. हे एक हिल स्टेशन आहे, जिथे हिवाळ्यात तापमान 12 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी असते. कास पठार, सिडनी पॉईंट, मैपट्रो गार्डन, केट पॉईंट, देवराई आर्ट व्हिलेज, राजपुरी लेणी इत्यादी येथे पाहण्यासारखे आहेत.