जगातील सर्वात शक्तिशाली 5 पासपोर्ट कोणते? भारताचा नंबर कितवा?

Henley Passport Index: आम्ही तुम्हाला विचारलं की, जगातील सर्वात शक्तिशाली पार्सपोर्ट कोणते? तर लगेच तुमच्या तोंडी महासत्ता अमेरिकेचं पहिलं नाव येईल. पण, आम्ही तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की, जगातील सर्वात शक्तिशाली पार्सपोर्ट असलेल्या देशांच्या यादीत महासत्ता नाही. आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांची नावे आणि याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

जगातील सर्वात शक्तिशाली 5 पासपोर्ट कोणते? भारताचा नंबर कितवा?
PassportsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 12:59 PM

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट नाही, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर याविषयीची सखोल माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. जगातील सर्वात शक्तिशाली 5 पासपोर्ट कोणते आहेत? शक्तिशाली पासपोर्ट म्हणजे काय? याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

पासपोर्टची रँकिंग कशी ठरते?

हेन्ली पासपोर्ट निर्देशांक जगातील 199 पासपोर्टची क्रमवारी म्हणजेच रँकिंग अशा देशांच्या संख्येच्या आधारे करतो जिथे आपण पासपोर्टसह व्हिसामुक्त प्रवास करू शकता.

सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणता?

हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, सिंगापूरमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. तुमच्याकडे सिंगापूरचा पासपोर्ट असेल तर तुम्ही 195 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकता.

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट क्रमांक 2 कोणता?

हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार,पाच देश दुसऱ्या स्थानावर आहेत. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि स्पेन हे देश आहेत. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार या देशांच्या पासपोर्टमुळे 227 पैकी 192 पर्यटनस्थळांना व्हिसामुक्त प्रवेश मिळतो.

तिसऱ्या स्थानावर कोणते देश?

हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, फिनलँड, आयर्लंड, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, दक्षिण कोरिया आणि स्वीडन हे जगातील सर्वात मजबूत पासपोर्टच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. या देशांच्या पासपोर्टमध्ये 191 ठिकाणी व्हिसामुक्त प्रवेश दिला जातो.

चौथ्या क्रमांकावर कोणते देश?

हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत बेल्जियम, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंग्डम चौथ्या क्रमांकावर आहेत. या पासपोर्टमुळे 190 ठिकाणी व्हिसामुक्त प्रवास करता येतो.

पाचव्या स्थानावर कोण?

ऑक्टोबर 2024 च्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगालचे पासपोर्ट जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट रँक आहेत. या पासपोर्टधारकांना व्हिसाशिवाय 189 ठिकाणी प्रवास करता येणार आहे.

भारतीय पासपोर्ट किती शक्तिशाली?

ऑक्टोबर 2024 मधील जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत 83 व्या स्थानावर असून मॉरिटानिया, सेनेगल आणि ताजिकिस्तानसह संयुक्तपणे स्थानावर आहे. भारतीय पासपोर्टधारकांना 58 ठिकाणी विनाव्हिसा प्रवास करता येतो.

2024 च्या पहिल्या तिमाहीचा पासपोर्ट इंडेक्स

नागरिकता वित्तीय सल्लागार फर्म आर्टन कॅपिटलने 2024 च्या पहिल्या तिमाहीसाठी पासपोर्ट इंडेक्स जारी केला होता. या इंडेक्समध्ये युएईच्या पासपोर्टला सर्वात शक्तीशाली पासपोर्ट म्हटले होते. पासपोर्टचा मोबिलिटी स्कोर 180 होता म्हणजे या पासपोर्टवर 180 देशात व्हीसा फ्रि एन्ट्री होती. या यादीत भारताची रॅंकींग 66 वी होती. भारताच्या पासपोर्टचा मोबिलिटी स्कोर 77 आहे. या यादीत पाकिस्तान 47 मोबिलीटी स्कोरसोबत सर्वात कमी श्रेणीवाल्या देशांमध्ये होता.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....