त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील हे पाच पदार्थ, चेहरा होईल काही वेळातच चमकदार
सध्याच्या काळात चेहऱ्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. प्रदूषण, धूळ आणि माती यामुळे त्वचा खूप खराब होते. जे स्वच्छ करण्यासाठी एक्सफोलिएशनची आवश्यकता असते. खरंतर त्वचेसाठी अनेक उत्पादन उपलब्ध आहेत पण तुम्ही घरगुती गोष्टींचा आहे वापर करून त्वचा एक्सफोलिएट करू शकता.

त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी ती एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. यासाठी बाजारात अनेक प्रकारचे उत्पादने उपलब्ध आहेत. जी बरीच महागडी आहेत. त्वचेला हानी पोहोचवणाऱ्या अनेक उत्पादनांमध्ये रसायने देखील आढळतात. पण सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्क्रब आणि फेसवॉश वापरावे ससे काही नाही. आपल्या स्वयंपाक घरात असलेल्या काही नैसर्गिक गोष्टी वापरून सुद्धा तुम्ही तुमची त्वचा निरोगी आणि सुंदर बनवू शकता.
एक्सफोलिएट म्हणजे त्वचेच्या पृष्ठभागावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यात त्वचा स्वच्छ आणि मऊ बनवण्यास मदत करते. तुम्हाला केमिकल युक्त स्किन केअर उत्पादने वापरायचे नसतील तर तुमच्या स्वयंपाक घरात असलेल्या पाच नैसर्गिक गोष्टींसह एक्सफोलिएशन करा. यामुळे तुमची त्वचा पूर्वीपेक्षा निरोगी आणि चमकदार होईल.
साखर आणि मध
साखर एक उत्तम नैसर्गिक स्क्रब आहे जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. तर मृत त्वचेला मॉइश्चराईज करते. एक चमचा साखरेत थोडे मध मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा त्यामुळे तुम्हाला लगेच बदल जाणवेल.
कॉफी
कॉफी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कॉफी ने त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात यापैकी एक महत्त्वाचा एक्सपोलेशन आहे कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. कॉफी पावडर मध्ये थोडं खोबरेल तेल मिसळा आणि त्वचेवर वर्तुळाकार हालचाली करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि त्वचा मुलायम होईल.
ओट्स
प्रत्येक उत्पादन संवेदनशील त्वचेच्या लोकांसाठी फायदेशीर नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी हरभरा आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे चांगले आहे. संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी ओट्स चे जाडे भरडे पीठ सर्वोत्तम एक्सफोलिएटर आहे. ओट्स बारीक करून त्यात दही किंवा दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा तर स्वच्छ होतेच पण हायड्रेटतही होते.
बेसन पीठ
बेसन हे वर्षानुवर्ष भारतीय स्किन केअरचा भाग आहे. हे त्वचा खोल स्वच्छ करते आणि एक्सपोलिएट करते. यासाठी तुम्ही एक पॅक तयार करू शकता. बेसन, हळद आणि दूध एकत्र करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यानंतर चेहरा धुवा यामुळे चेहऱ्याला खूप चांगला ग्लो येतो.
लिंबू आणि दही
लिंबू मध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचा उजळ होते तर दही त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवते. थोडा लिंबाचा रस आणि दही मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. त्यामुळे तुमची त्वचा ही चमकदार होईल.
