Anil Gote Video : राजमाता पायलीला पन्नास पडल्यात, महाराण्या ऊसाच्या खुटाखुटावर उभ्या आहेत: अनिल गोटे

Anil Gote Video : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून चौंडीत जयंतीचा कार्यक्रम झाला होता. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

Anil Gote Video : राजमाता पायलीला पन्नास पडल्यात, महाराण्या ऊसाच्या खुटाखुटावर उभ्या आहेत: अनिल गोटे
राजमाता पायलीला पन्नास पडल्यात, महाराण्या ऊसाच्या खुटाखुटावर उभ्या आहेत: अनिल गोटेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 11:53 AM

अभिजीत पिसे, नगर: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 295वी जयंती (Ahilyabai Holkar Jayanti) सर्वत्र जल्लोषात साजरी होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांच्या एका विधानाने धनगर समाजात नाराजी पसरली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राजमाता किंवा महाराणी असा उल्लेख करू नका. राजमाता या पायलीच्या पन्नास पडल्या आहेत आणि महाराण्या या ऊसाच्या खुटाखुटावर उभ्या आहेत. पण जगामध्ये पुण्यश्लोक एकच आहे. त्यामुळे अहिल्यादेवींना पुण्यश्लोकच म्हणा, असं आवाहन अनिल गोटे यांनी केलं आहे. मात्र, गोटे यांच्या या विधानावर धनगर समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटत असून धनगर समाजाने (dhangar community) तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. तसेच या प्रकरणी गोटे यांच्याविरोदात धनगर समाजाकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीच गोटे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या संतापात भर पडली आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनासाठी आलेल्या गोपीचंद पडळकरांविरोधात तक्रारी दाखल केल्या जातात, तर भावना दुखावणारं विधान करणाऱ्या गोटेंवर कारवाई का केली जात नाही? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

अनिल गोटे यांच्या या विधानाच्या निषेधार्थ आज दुपारी जामखेड येथील खर्डा चौकात अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमींकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून चौंडीत जयंतीचा कार्यक्रम झाला होता. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात पवार यांच्या आधी अनिल गोटेंचे यांचे भाषण झाले. गोटे फक्त दोनच मिनिटं बोलले. त्यांनी सुरुवातीलाच अहिल्यादेवींचा उल्लेख राजमाता किंवा महाराणी असा न करता पुण्यश्लोक असा करावा, अशी सूचना मांडली. मात्र, ही सूचना करण्याची पद्धत धनगर समाजाला आवडली नसल्याने गोटेंविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

गोटे नेमकं काय बोलले?

“मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो, पवार साहेबांची क्षमा मागतो. धनगर समाजाच्यावतीने रोहित पवार यांचे आभार मानतो. मी दोनच शब्द बोलणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे. आयोजकांच्या आणि समस्त धनगर समाजाच्या ही गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. अण्णा डांगे इथे बसले आहेत. त्यांचं वय वर्ष 90 आहे. गेली 70 वर्ष ते सगळ्यांना सांगत आहेत की, अहिल्या देवींना फक्त पुण्यश्लोक म्हणा. त्यांना राजमाता म्हणू नका. त्यांना महाराणी म्हणून नका. असं म्हणून तुम्ही त्यांचा अपमान करत आहात. राजमाता या पायलीच्या पन्नास पडल्या आहेत. आणि महाराण्या या ऊसाच्या खुटाखुटावर उभ्या आहेत. पण जगामध्ये पुण्यश्लोक एकच आहे. अहिल्यादेवी होळकर. मला माफ करा. मी स्पष्टपणे बोललो म्हणून. पण या नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राजमाता म्हणून किंवा महाराणी कुणी अपमान करू नये एवढीच विनंती आहे.” असं गोटे म्हणाले.

पडळकर, खोत यांना रोखलं

दरम्यान, राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादीने केलं होतं. यावेळी अहिल्यादेवींचं दर्शन घेण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आले होते. मात्र, पवारांचा कार्यक्रम सुरू असल्याने कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना रोखलं होतं. त्यामुळे पडळकर, खोत हे सुद्धा आक्रमक झाले होते. त्यांचे समर्थकही आक्रमक होऊन जोरजोरात घोषणा देत होते. यावेळी पडळकर यांनी पवारांवर अत्यंत तिखट शब्दात टीका केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.