‘भारत बंद’ला राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा, बंदमध्ये सामील व्हा; जयंत पाटील यांचं आवाहन

देशातील विविध संघटनांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिला आहे. (Bharat Bandh on 27 September 2021: Nearly 100 groups to join shutdown; ncp's support)

'भारत बंद'ला राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा, बंदमध्ये सामील व्हा; जयंत पाटील यांचं आवाहन
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 4:10 PM

परभणी: देशातील विविध संघटनांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा असणार असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे. (Bharat Bandh on 27 September 2021: Nearly 100 groups to join shutdown; ncp’s support)

जयंत पाटील यांनी परभणीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. देशभरातील 100 पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे. या बंदला आमचा पाठिंबा असून आम्ही बंदमध्ये सहभागी होऊ, असं पाटील यांनी सांगितलं. यावेळी पत्रकार परिषदेला खासदार फौजिया खान उपस्थित होत्या.

जमिनींचे तात्काळ पंचनामे करा

जयंत पाटील यांनी आज परभणीत जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची आढावा बैठकही घेतली. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त प्रकल्पांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे व शेतकऱ्यांच्या जमिनींचे तात्काळ पंचनामे करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.

विविध प्रकल्पांचा आढावा

या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. अनेक प्रकल्पांची दुरुस्ती, कालव्यांची दुरुस्ती व इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ममदापूर, जोड परळी, कोटा आणि पिंपळगाव कुटे हे नवे बंधारे पाणी उपलब्धतेअभावी प्रलंबित होते मात्र आता हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रस्तावित बंधारे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे ते म्हणाले.

कालवे अत्याधुनिक करणार

जायकवाडी डावा आणि उजवा कालव्याची वाहन क्षमता कमी झाली आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेत या कालव्यांची सुधारणा केली जाईल व आधुनिकीकरण केले जाईल. उच्च दर्जाचे काम करत हे कालवे अत्याधुनिक केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वडपूरकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (Bharat Bandh on 27 September 2021: Nearly 100 groups to join shutdown; ncp’s support)

संबंधित बातम्या:

गडकरींची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा, 2215 कोटी रुपये प्रोजेक्टची घोषणा, 22 राजमार्गांची संपूर्ण माहिती

सोमय्यांना इशारा देत सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना फुल सपोर्ट, म्हणाले, ‘बदनामीचा कट हाणून पाडू’

ओशोंच्या आश्रमात भूखंड घोटाळा?, केंद्राने गैरकारभाराची चौकशी करावी; ओशोंच्या अनुयायांचे आठवलेंना साकडे

(Bharat Bandh on 27 September 2021: Nearly 100 groups to join shutdown; ncp’s support)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.