VIDEO: किरीट सोमय्या भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान

मंत्रालायात जाऊन नगरविकास खात्याच्या फाईली पाहणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे.

VIDEO: किरीट सोमय्या भाजपची 'आयटम गर्ल'; नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान
Kirit Somaiya is Item Girl of bjp, nawab malik attackes
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 6:47 PM

प्रशांत चालिंद्रवार, नांदेड: मंत्रालायात जाऊन नगरविकास खात्याच्या फाईली पाहणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी जोरदार टीका केली आहे. मलिक यांनी सोमय्यांची थेट बॉलिवूड (bollywood) सिनेमातील आयटम गर्लशीच तुलना केली आहे. किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रात भाजपच्या आयटम गर्ल सारखं काम करत आहेत. बातमी कशी होईल यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी खोचक आणि वादग्रस्त टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. मलिक यांच्या या वादग्रस्त टीकेचे राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. तर, मलिक यांनी ही टीका केल्याने आता त्यावर किरीट सोमय्या काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलं आहे. नांदेड येथे मीडियाशी संवाद साधताना मलिक यांनी ही टीका केली आहे.

बॉलिवूडमध्ये एखादा सिनेमा चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रात भाजपच्या आयटम गर्ल सारखं काम करत आहेत. बातमी कशी होईल यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणावर चर्चा

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. येत्या 28 तारखेला सर्वोच्च न्यायालयात OBC च्या राजकीय आरक्षणाबाबतची तारीख आहे. तसेच OBC आरक्षणा विषयी सरकार अनुकूल असून या विषयी महाविकास आघाडीच्या तिन्ही मंत्र्यांनी बसून अंतरिम अहवाल कसा सादर करायचा यावर चर्चा झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

देशात परिवर्तन निश्चित

देशात परिवर्तन निश्चित होणार आहे. पाच राज्यात भाजपच्या विरोधात वातावरण आहे. 2024 च्या आधी या देशात एक पर्याय निर्माण करण्याच काम सर्वलोक करतील. आम्ही काँग्रेसला घेऊन देशात पर्याय निर्माण करण्याच्या दिशेने काम करू, असंही त्यांनी सांगितलं.

बॅलेटपेपरवर निवडणुका घ्या

सर्वसामान्य लोकांना बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या असे वाटत असेल तर निवडणूक आयोगाने त्यावर विचार करायला हवा. तसेच 2024 मधल्या निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेऊन भाजपला पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

वर्ध्याच्या घटनेने मी दु:खी, पंतप्रधानांचं ट्विट; मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर

मुंबई महापालिकेत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करु, भाजपचा संकल्प; फडणवीसांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

“स्वत: ला समजतोस कोण, असे 100 सलमान खान गल्ली झाडायला उभे करेन”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.