औरंगाबादेतील कर्णपुऱ्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या, आमदार अंबादास दानवे यांची मागणी
औरंगाबाद: विजयादशमीच्या निमित्ताने कर्णपुरा येथील ग्रामदेवता कर्णिकामाता मंदिरासह (Karnika Mata Temple), हरसिद्धी मातेच्या मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. शहरात सातारा परिसरातील रेणुका माता मंदिर (Renuka Mata Temple), तसेच जळगाव रोडवरील रेणुका माता मंदिर व सिडकोतील दुर्गा मातेच्या मंदिरातही देवीच्या दर्शनासाठी आज भाविकांची पहाटेपासूनच गर्दी दिसून आली. मात्र गावाच्या बाहेर जाण्यासाठी म्हणून कर्णपुरा आणि […]

औरंगाबाद: विजयादशमीच्या निमित्ताने कर्णपुरा येथील ग्रामदेवता कर्णिकामाता मंदिरासह (Karnika Mata Temple), हरसिद्धी मातेच्या मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. शहरात सातारा परिसरातील रेणुका माता मंदिर (Renuka Mata Temple), तसेच जळगाव रोडवरील रेणुका माता मंदिर व सिडकोतील दुर्गा मातेच्या मंदिरातही देवीच्या दर्शनासाठी आज भाविकांची पहाटेपासूनच गर्दी दिसून आली. मात्र गावाच्या बाहेर जाण्यासाठी म्हणून कर्णपुरा आणि हरसिद्धी मातेच्या दर्शनासाठी जाऊन सीमोल्लंघन करण्याला शहरातील नागरिक पसंती देत असतात.
‘कर्णपुऱ्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या’
औरंगबााद शहराचे ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा देवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते, औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. दानवे म्हणाले की, कर्णपुरा येथील देवीचे मंदिर चारशे वर्ष जुने आहे. नवरात्रोत्सवात या ठिकाणी दहा दिवस यात्रा भरते. त्यामुळे भाविकांच्या सुविधेकरिता आता सरकारी मदतीची गरज आहे, असे दानवे म्हणाले.
कर्णपुराः बाजालीच्या रथाची मिरवणूक नाही
दरवर्षी कर्णपुऱ्यातील बाजाजीच्या रथाची मिरवणूक दसऱ्याच्या दिवशी काढली जाते. मात्र कोरोनामुळे ही मिरवणूक मागीलवर्षीपासून रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिराचे पूजारी आमदार अंबादास दानवे यांनी दिली. विजयादशमीच्या निमित्ताने पहाटे तीन वाजता कर्णिकामाता मंदिरात महापूजा सुरु झाली. महापूजेनंतर सकाळी सात वाजता महाआरती होऊन घट हलवले जागेले. आता संध्याकाळी सहा वाजता पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या हस्ते आरती होईल.
राजा कर्णसिंगाने उभारले मंदिर
छावणी परिसरातील कर्णपुरा देवी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शहराची ग्रामदेवता म्हणून कर्णिका माता देवीची ओळख आहे. नवरात्रोत्सवात या मंदिरात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. राजस्थानातून आलेल्या कर्णसिंग राजाने या मंदिराची उभारणी केली. दानवे कुटुंबांची सातवी पिढी या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत आहे. राजस्थानचा बिकानेर येथील राजा कर्णसिंग 1835 मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते. छावणी परिसरातील कर्णपुरा येथे त्याचे वास्तव्य होते. राजा कर्णसिंग राजस्थान येथील कर्णिका मातेचे भक्त होते. या ठिकाणी देखील कर्णिका मातेचे मंदिर बांधायचे त्याने ठरवले. त्यानंतर या मंदिराची उभारणी करण्यात आली.
सिडकोः रेणुकेच्या मंदिरात पहाटे पाचला महापूजा
दरम्यान, सिडको परिसरातील रेणुका माता मंदिरात पहाटे पाच वाजता महापूजा झाली. सकाळी साडेसात वाजता आरती, दुपारी देवीला गोड नैवेद्य दाखवण्यात आला. संध्याकाळी आरतीनंतर सीमोल्लंघनाला प्रारंभ होईल, अशी माहिती मंदिराचे पुजारी धनंजय पुराणिक यांनी दिली.
इतर बातम्या-
Chanakya Niti | देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे?, मग आजच करा ‘या’ गोष्टींचे त्याग