Bhandara Rain | भंडारा शहरात घरात घुसले पावसाचे पाणी, आनंद मंगल कार्यालयात तलावाचे स्वरूप…
वैशाली नगर, रुक्मिणी नगर या परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते आहे. तर दूसरीकडे खात रोड परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात गुडघाभर पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले.
भंडारा : काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) भंडारा शहरातील काही भागांमध्ये पाणी शिरल्याने मोठी तारांबळ उडालीयं. भंडारा शहरामध्ये रात्री मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रोड निर्मितीच्या वेळेस उंच रोड बनवल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी (Water) लोकांच्या घरात जात आहे. रात्रीपासून घरात शिरलेले पाणी काढून नागरिकांना नाकीनऊ आल्याचे चित्र असून महापालिका प्रशासानाविरोधात (Municipal Administration) नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पावसाच्या पाण्याचा जोर सातत्याने वाढतांना दिसतोयं.
भंडाऱ्यात घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरले पावसाचे पाणी
वैशाली नगर, रुक्मिणी नगर या परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते आहे. तर दूसरीकडे खात रोड परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात गुडघाभर पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले. या नुकसानाची भरपाई शासनाने लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आता नागरिक करीत आहेत. रुक्मिणी नगरमध्ये असलेल्या किराणा दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने दुकान मालकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान
ही परिस्थिती दरवर्षी येत असल्याने यापुढे आमच्या घरात किंवा दुकानात पाणी शिरणार नाही अशी व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. राज्यात सध्या सर्वदूर पाऊस पडताना दिसतोयं. मुंबई, पुणे, अमरावतील, नागपूर, गडचिरोली आणि मराठवाड्यात पाऊस सुरू असल्याने अनेक धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलायं. इतकेच नाही तर अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट देखील देण्यात आलायं.