Dilip Kumar Passes Away LIVE Update | दिलीप कुमार अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

| Updated on: Jul 07, 2021 | 8:35 PM

अभिनयाचं विद्यापीठ, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे.

Dilip Kumar Passes Away LIVE Update | दिलीप कुमार अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दिलीप कुमार

अभिनयाचं विद्यापीठ, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Jul 2021 08:33 PM (IST)

    दिलीप कुमार अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज आले होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे

  • 07 Jul 2021 03:08 PM (IST)

    दिलीपकुमार यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं : रवी किशन

    जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच आज निधन झाले. ते इंडस्ट्रीजमधील सर्वात जेष्ठ व्यक्ती होते. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते.
    नवीन अभिनेत्यांसाठी ते एक लिजेंड होते, अशी प्रतिक्रिया अभिनेते रवी किशन यांनी दिली.
  • 07 Jul 2021 03:04 PM (IST)

    हास्य अभिनेते सुनिल पाल यांच्याकडून शोक व्यक्त

    “ट्रेजेडी किंगने आज आपली साथ सोडली. ते एक विद्यापीठ होते. एक काळ एक महान व्यक्ती आज आपल्यातून निघून गेली. फिल्म इंडस्ट्रीजमधील जेष्ठ नेत्याचं आज निधन झाले. ते लिजेंड होते. लिजेंड कधी मरत नाहीत. फिल्म इंडस्ट्रीजमधील एक तारा निखळला”, अशा शब्दात हास्य अभिनेते सुनिल पाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
  • 07 Jul 2021 02:04 PM (IST)

    अनुपम खेर यांच्याकडून व्हिडीओ ट्वीट

  • 07 Jul 2021 02:00 PM (IST)

    हेमा मालिनींनी दिलीपकुमारांना स्मरण करत केलं ट्वीट

  • 07 Jul 2021 01:55 PM (IST)

    शरद पवारांनी दिलीपकुमारांना श्रद्धांजली वाहिली

    शरद पवारांनी दिलीपकुमारांना श्रद्धांजली वाहिली

  • 07 Jul 2021 01:54 PM (IST)

    अभिनेता शाहरुख खान आणि अनिल  कपूर यांच्याकडून दिलीपकुमारांना श्रद्धांजली 

  • 07 Jul 2021 01:52 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलीपकुमारांना श्रद्धांजली वाहिली

  • 07 Jul 2021 01:29 PM (IST)

    शाहरुख खान श्रद्धांजली वाहण्यासाठी दिलीपकुमारांच्या घरी पोहोचले

    शाहरुख खान श्रद्धांजली वाहण्यासाठी दिलीपकुमारांच्या घरी पोहोचले

    Shahrukh-at-dilip-kumar-house

    Shahrukh-at-dilip-kumar-house

  • 07 Jul 2021 01:05 PM (IST)

    सलमान खानने ट्वीट करत दिलीपकुमारांना श्रद्धांजली वाहिली

    सलमान खानने ट्वीट करत दिलीपकुमारांना श्रद्धांजली वाहिली

  • 07 Jul 2021 12:49 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलीपकुमारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलीपकुमारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही पोहोचले

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि नवाब मालिकही पोहोचले

  • 07 Jul 2021 12:45 PM (IST)

    20 पेक्षा जास्त लोकांना आत परवानगी नाही, दिलीप साहब यांना घरुनच श्रद्धांजली अर्पण करा – समिती

    चित्रपट अभिनेता दिलीपकुमार यांचे पार्थिव दुपारी 3 ते 4 दरम्यान जुहूच्या  कब्रस्तानात आणले जाईल आणि अंतिम विधी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण होईल. तसेच, 20 पेक्षा जास्त लोकांना आत जाऊ दिले जाणार नाही, असे कब्रिस्तानच्या समितीच्या सदस्यानी सांगितले आहे.

    लोकांनी दिलीप साहब यांना त्यांच्या घरातूनच अखेरचा निरोप द्यावा, असे आवाहन समितीने केले आहे. मधुबाला, मोहम्मद रफी, जिया खान या कलाकारांचे पार्थिव येथेच पुरण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 07 Jul 2021 12:40 PM (IST)

    लता मंगेशकरांनी वाहिली दिलीपकुमारांना श्रद्धांजली, ट्वीट केले राखी बांधतानाचे फोटो

    लता मंगेशकरांनी वाहिली दिलीपकुमारांना श्रद्धांजली, ट्वीट केले राखी बांधतानाचे फोटो

  • 07 Jul 2021 12:37 PM (IST)

    ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र दिलीपकुमारांच्या घरी पोहोचले

    ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र दिलीपकुमारांच्या घरी पोहोचले

    Dharmendra-at-dilip-house

    Dharmendra-at-dilip-house

  • 07 Jul 2021 12:35 PM (IST)

    अभिनेत्री विद्या बालन अपल्या पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत दिलीप कुमारांच्या घरी पोहोचली

    अभिनेत्री विद्या बालन अपल्या पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत दिलीप कुमारांच्या घरी पोहोचली

    Vidya-Balan-at-dilip-kumar-house

    Vidya-Balan-at-dilip-kumar-house

  • 07 Jul 2021 10:59 AM (IST)

    अमिताभ बच्चन अंत्यसंस्कारात सहभागी होतील

    अमिताभ बच्चन अंत्यसंस्कारात सहभागी होतील, अभिषेक बच्चन आता दिलीपकुमार यांच्या घरी जात आहेत, परत येऊन ते वडिलांना कोविड प्रोटोकॉल अंतर्गत अंत्यसंस्काराला जाण्याची माहिती देतील.

  • 07 Jul 2021 10:55 AM (IST)

    न्यूयॉर्क टाईम्सने दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहिली

    न्यूयॉर्क टाईम्सने दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लीड स्टोरी छापली आहे. एका युगाचा अंत असं या लेखात लिहिलं आहे

    Dilip-Kumar-new-york-times

    न्यूयॉर्क टाईम्सचा लेख

  • 07 Jul 2021 10:31 AM (IST)

    दिलीप कुमार यांचे जाणे म्हणजे युग संपला असं आहे – संजय राऊत

    संजय राऊत –

    दिलीप कुमार यांचे जाणे म्हणजे युग संपला असं आहे

    तीन पिढ्या दिलीप कुमार यांच्या सोबत होत्या

    ते खरे किंग होते

  • 07 Jul 2021 10:18 AM (IST)

    शबाना आझमी श्रद्धांजली वाहण्यासाठी घरी पोहोचल्या

    अभिनेत्री शबाना आझमी श्रद्धांजली वाहण्यासाठी दिलीपकुमारांच्या वांद्रे येथील घरी पोहोचल्या

  • 07 Jul 2021 10:16 AM (IST)

    दिलीपकुमारांचं पार्थिक वांद्रेच्या पाली हिल येथील घरी पोहोचले

    दिलीपकुमारांचं पार्थिक मुंबईतील वांद्रेच्या पाली हिल येथील घरी पोहोचले आहे. पोलिसांच्या मते अंतिम दर्शनासाठी फक्त सेलिब्रिटींना आत येण्याची परवानगी असेल.

  • 07 Jul 2021 10:08 AM (IST)

    मुंबईच्या सांताक्रूझमध्ये सायंकाळी 5 वाजता दिलीपकुमार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार

  • 07 Jul 2021 10:05 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिलीपकुमारांना श्रद्धांजली

  • 07 Jul 2021 10:04 AM (IST)

    अजय देवगनची दिलीपकुमारांनी श्रद्धांजली

  • 07 Jul 2021 10:03 AM (IST)

    गृहमंत्री अमित शाहांकडून दिलीपकुमारांचे स्मरण

  • 07 Jul 2021 10:02 AM (IST)

    राहुल गांधींचं ट्वीट

  • 07 Jul 2021 10:00 AM (IST)

    रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

  • 07 Jul 2021 09:56 AM (IST)

    अभिनेता दिलीपकुमार याचं निधन, पत्नी सायरा बानो पार्थिवासह रुग्णवाहिकेने निवासस्थानी रवाना

    अभिनेता दिलीपकुमार याचं निधन, पत्नी सायरा बानो पार्थिवासह रुग्णवाहिकेने निवासस्थानी रवाना

    दिलीपकुमार यांचं निधन

    दिलीपकुमार यांचं निधन

  • 07 Jul 2021 09:50 AM (IST)

    अमिताभ बच्चन यांच्याकडून शोक व्यक्त

  • 07 Jul 2021 09:49 AM (IST)

    प्रियांका गांधी वाड्राकडून दिलीपकुमारांना श्रद्धांजली

  • 07 Jul 2021 09:14 AM (IST)

    नाशकात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

    – नाशकात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

    – विविध मार्गाने नागरिकांना जाळ्यात अडकवून केली जातीय पैशांची मागणी

    – नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी संतोष नागरगोजे यांचं ही बनावट फेसबुक अकाउंट तयार करत त्यांच्या नावाखाली करण्यात आली पैशाची मागणी

    – ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या तक्रारी बघता सायबर सेल अलर्ट

    – नागरिकांनी मात्र अफवांवर विश्वास न ठेवता कोणालाही आपल्या बँकेच्या डिटेल्स देऊ नये, पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचं आवाहन

  • 07 Jul 2021 07:58 AM (IST)

    ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

    ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन झालंय. ते 98 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी. दिलीपकुमार यांच्या जाण्यानं फक्त बॉलीवूडच नाही तर जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरलीय. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जातेय.

  • 07 Jul 2021 07:36 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं तर शहरावर पाणी कपातीचे संकट

    नाशिक –

    नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं तर शहरावर पाणी कपातीचे संकट

    पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी पातळी खालावली

    गंगापूर धरण समूहात सरासरी 36 टक्के इतका पाणीसाठा

    धरण समूहातील काही बंधारे कोरडेठाक

    पुढच्या 15 दिवसात पाऊस न झाल्यास शहरावर पाणी कपातीचं संकट..

    वरुणराजा प्रसन्न न झाल्यास नाशिककरांवर पाणीबाणी

  • 07 Jul 2021 07:35 AM (IST)

    गोकुळ दूध संघाच्या स्वीकृत आणि शासन नियुक्त संचालक पदासाठी शिवसेनेच्या मुरलीधर जाधव यांची वर्णी

    कोल्हापूर

    गोकुळ दूध संघाच्या स्वीकृत आणि शासन नियुक्त संचालक पदासाठी शिवसेनेच्या मुरलीधर जाधव यांची वर्णी

    मुरलीधर जाधव शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष

    जाधव यांना मिळाले वीस वर्षाच्या निष्ठेचे फळ

    आता स्वीकृत संचालक पदाच्या 2 जागांसाठी चुरस

    ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील निर्णय घेणार

    दोन स्वीकृत जागांसाठी अनेकांची नेत्यांकडे फिल्डिंग

  • 07 Jul 2021 07:21 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

    नागपूर जिल्ह्यात वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू,

    रामटेक तालुक्यातील चोरखुमारी शिवारातील घटना,

    शेतात मशागतीची कामं सुरू असताना पाऊस सुरू झाल्यावर शेतात काम करणारे मजूर झोपडीत गेले,

    मात्र झोपडीवर वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यु,

    तर दोन मजुर जखमी, जखमींमध्ये 12 वर्षाच्या मुलाचा समावेश,

    जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

  • 07 Jul 2021 06:55 AM (IST)

    राज्यातील डिजीटल सातबारा उताराचा सोमवारी नवा उच्चांक नोंदला गेला

    पुणे :

    राज्यातील डिजिटल सातबारा उताराचा सोमवारी नवा उच्चांक नोंदला गेला

    एकाच दिवसात १ लाख सातबारा उतारे डाउनलोड झाल्याचा हा नवा विक्रम

    यामुळे एका दिवसात सर्वाधिक ३१ लाख ५० हजार रुपयांचा महसूल जमा

    शेतकऱ्यांना घरबसल्या आॅनलाइन सातबारा उतारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महसूल विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारा ही सुविधा सुरु

    याच्या जोडीलाच महसूल विभागाच्या अनेक सेवा ऑनलाइन

    या सुविधांमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जमीनविषयक आणि सातबाराबाबतच्या अनेक समस्या दूर

  • 07 Jul 2021 06:43 AM (IST)

    यवतमाळात पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यूचा आरोप, संतप्त नातेवाईकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक

    पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी दारव्हा पोलीस ठाण्यात धाव घेत दगडफेक केली. ही खळबळजनक घटना रात्रीच्या सुमारास दारव्हा शहरात घडली. शेख इरफान शेख शब्बीर वय 27 वर्ष तरोडा असे मृत युवकाचे नावं आहे

  • 07 Jul 2021 06:41 AM (IST)

    अंबरनाथमध्ये २१ वर्षीय तरुणाची हत्या

    अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर परिसरातील शाळेजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. भाविक हा मित्रांसोबत तिथे आला असताना वाद होऊन धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. भाविक हा उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील ब्राम्हणपाडा भागात राहणारा होता. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तर पुढील तपास आणि आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.
  • 07 Jul 2021 06:36 AM (IST)

    जळगाव महापालिकेत खळबळ, फुटलेल्या 29 नगरसेवकांनी भाजपचे गटनेते, उपगटनेत्यांची हकालपट्टी केली

    जळगाव महापालिकेत खळबळ उडाली, भारतीय जनता पक्षातील फुटलेल्या 29 नगरसेवकांनी बैठक घेऊन भाजपचे गटनेते, उपगटनेते यांची हकालपट्टी करुन नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहेत. जळगाव महापालिकेत गेल्या काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या 29 नगरसेवकांनी फुटून शिवसेनेला पाठिंबा दिला.

Published On - Jul 07,2021 6:17 AM

Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.