Maharashtra News LIVE Update | पुण्यात दिवसभरात 304 नवे कोरोनाबाधित, 10 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 29, 2021 | 8:35 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पुण्यात दिवसभरात 304 नवे कोरोनाबाधित, 10 जणांचा मृत्यू
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Jul 2021 06:49 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 304 नवे कोरोनाबाधित, 10 जणांचा मृत्यू

    पुणे :  दिवसभरात ३०४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात १९६ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत १० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. -२२६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८६६६९. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५८९. – एकूण मृत्यू -८७५६. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७५३२४. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७७७५

  • 29 Jul 2021 06:48 PM (IST)

    नागपुरात आज 10 नवे कोरोना रुग्णांनाची नोंद

    नागपूर :

    नागपुरात आज 10 नवे कोरोना रुग्णांनाची नोंद

    23 जणांनी केली कोरोनावर मात

    तर आज शून्य मृत्यूची नोंद

    एकूण रुग्ण संख्या – 492852

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482541

    एकूण मृत्यू संख्या – 10116

  • 29 Jul 2021 05:05 PM (IST)

    राज्यातील 25 जिल्ह्यांत निर्बंधामध्ये शिथिलता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

    25 जिल्ह्यांत निर्बंधामध्ये शिथिलता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

    राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :  11 जिल्हे लेव्हल 3 मध्येच, पश्चिम महाराष्ट्र पुणे, सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर ५, कोकण रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर ४, मराठवाडा १ बीड, उत्तर महाराष्ट्र 1 आरोग्य विभागाच्या शिफारशी, टास्क फोर्सच्या शिफारशीसह फाईल मुख्यमंत्र्यांकडे रेल्वे विभागाशी चर्चा करुन मुख्यमंत्री निर्णय घेतील. लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता

    पुणे आणि सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर,बीड आणि अहमदनगर या ११ जिल्ह्यात कोणतेही नियम शिथील करत नाही

  • 29 Jul 2021 04:50 PM (IST)

    ओबीसी समाज नुसता कालवा करतोय, पण तुमची लोकसभेत प्रतिनिधीत्व करणारी माणसं पाहिजेत : महादेव जानकर

    बारामती : महादेव जानकर यांची प्रतिक्रिया – जोपर्यंत ओबीसी समाज लॅडर बनेल तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत – या देशांमध्ये कॉँग्रेसचे प्रमुख सोनिया आणि राहुल गांधी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे, भाजपचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा, शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव आणि आदित्य ठाकरे आहेत. त्यामध्ये इतर ओबीसीची काय आवस्था आहे यांचा आज विचार करायची गरज आहे. – जिस समाज का दल है, उस समाज का बल है या धोरणानुसार आमची वाटचाल. जोपर्यंत वाढप्याच्या भूमिकेत येणार नाही, तोपर्यंत तुम्ही मागतकऱ्यांच्या भूमिकेतच राहणार. त्यातून तुम्हाला न्याय मिळणार नाही. – ओबीसी समाज नुसता कालवा करतोय, रडतोय. तुमच्याजवळ लोकसभेत प्रतिनिधीत्व करणारी माणसं पाहिजेत. ती माणसं मुकी पाठवून चालणार नाही.. अभ्यासू आणि विषयावर मत मांडणारी हवीत.. – राज्यातील सर्व पक्षांनी जातनिहाय जनगणनेचा ठराव करावा – नेहरूंपासून ओबीसी समाजावर अन्याय का झाला..? आता कोणी ओबीसी समाजातले तरुण उच्चपदस्थ अधिकारी होतात तर तेही बघवत नाही अशी अवस्था आहे.. – दोन्ही सभागृहात ठराव होवूनही हा प्रश्न नेमका अडतोय कुठे..? यात कोणीतरी झारीतला शुक्राचार्य आहे ना..? कोण नेमकं यात आडकाठी घालतय याकडे लक्ष देऊन त्याचा शोध घ्यावा – ओबीसीनी स्वाभिमानाने स्वत:च्या पायावर उभा राहावं, कोणत्याही पक्षावर टीका करण्यात अर्थ नाही.. तुम्ही ठाम नसल्यामुळे बेदखल आहात – ओबीसीचे कार्यकर्ते बनल्यामुळे वाटोळे झाले आहे.. – आज उच्चपदांवर ओबीसीना जागा नाहीत; आम्ही कोणत्या जाती धर्माचं घ्या म्हणत नाही.. – मी पशुसंवर्धन मंत्री असताना दोन महिन्यात जनावरांची आकडेवारी काढली होती.. मग तुम्ही पंतप्रधान असाल, मुख्यमंत्री असाल, तुमची इच्छा असेल तर ओबीसीची जातनिहाय गणना होवू शकते.. – जाईल तिथे ओबीसीवर अन्याय झालाय.. धड मुलगा नाही अन मुळगीही नाही अशी अवस्था का आली..? याचं चिंतन करण्याची गरज – आम्ही सत्तेत होतो.. त्यामुळे कायदा कोण बनवतं आणि अंमलात कोण आणतं हे आम्हालाही माहीत आहे.. – राज्यानं केंद्रांवर ढकलायचं, केंद्रांनं राज्यावर ढकलायचं हे नाटक नकोय.. कसं द्यायचं ते ओबीसीना द्या – खासदार, आमदारकीलाही ओबीसीना आरक्षण द्या – ओबीसीचे गुप्ता नावाचे सचिव बदला.. त्यांच्या जागी कर्तबगार ओबीसी अधिकारी द्या.. उद्धव ठाकरे आणि अजितदादा पवार यांना विनंती.. – दोन्ही सभागृहात ठराव होतोय मग नेमकं आडतय कुठे..? मागास आयोगाने योग्य पद्धतीने काम केलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं अध्यक्षपद घेतलं तर हा विषय मार्गी लागेल. – आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून ७०-७२ वर्षे झाली.. आपल्याला जनवारांचा डाटा मिळतोय.. पण माणसांचा डाटा मिळत नाही ही खंत.. फक्त सांगितलं जातं महिला एवढ्या, पुरुष एवढे.. त्याची आम्हाला गरज नाही.. – राज्य आणि केंद्र सरकारला विनंती तुम्ही या गोष्टींचा पाठपुरावा करावा – अजितदादा या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आहेत.. त्यांनीही या विषयात लक्ष द्यावं.. बांधकामापेक्षा या विषयात अधिक लक्ष दिलं तर समाजाचं भलं होईल.. – ऑन पंतप्रधान भेट : त्या भेटीत छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार किंवा नाना पटोले यांच्यासारखे ओबीसी नेते सोबत न्यायला हवं होतं.. ती आमची खंत नाही, राज्यातल्या लोकांचं म्हणणं.. – ऑन पुरस्थिती : आमच्याही सत्तेच्या काळात पूर आला होता.. कोरोंनाच्या संकटामुळे राज्य सारकारलाही काही अडचणी आहेत, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.. काही जनावरं, माणसं पूरात गाडली गेलीत.. आपत्ती व्यवस्थापनात सरकार थोडं कमी पडलं.. परंतु परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे..

  • 29 Jul 2021 04:22 PM (IST)

    आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांवर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल

    सोलापूर  :

    आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांवर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल

    कोरोना काळात लग्न सोहळ्यास गर्दी जमविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राऊत यांचे मुलांचे नाव देखील आरोप म्हणून वाढविले

    आयोजक म्हणून केवळ योगेश पवार यांच्या विरोधात पोलिसांनी दाखल केला होता गुन्हा

    मात्र आता या प्रकरणात रणजित राऊत आणि रणवीर राऊत या दोघांच्या नावाचा देखील आरोपी म्हणून समावेश

    पोलीस सुत्रांची माहिती

  • 29 Jul 2021 03:16 PM (IST)

    खाजगी शाळांचे 25 टक्के शुल्क कपात करण्याची मागणी, पुणे जिल्हा परिषदेकडून ठराव मंजूर

    पुणे :

    – खाजगी शाळांचे 25 टक्के शुल्क कपात करण्याची मागणी,

    – पुणे जिल्हा परिषदेकडून ठराव मंजूर,

    – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खासगी शाळांनी शैक्षणिक शुल्क २५ टक्क्यांनी कमी करावे,

    – पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत एकमताने ठराव मंजूर,

    – राज्य सरकारकडे ठराव पाठविण्यात येणार असल्याची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांची माहिती.

  • 29 Jul 2021 03:16 PM (IST)

    मी कधीही झारखंडला गेलो नाही, रांची पाहिली नाही, संपूर्ण प्रकरण हास्यास्पद : चंद्रशेखर बावनकुळे

    बारामती : चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया :

    झारखंडच्या सत्तांतरावर प्रतिक्रिया :

    – मी कधीही झारखंडला गेलो नाही.. – हे संपूर्ण प्रकरण हास्यास्पद आहे.. – झारखंडची रांची पाहिली नाही.. – झारखंडच्या १८१ आमदारांपैकी माझ्याकडे कुणाचाही नंबर नाही.. – मी काही राष्ट्रीय नेता नाहीये.. – मी भाजपचा महाराष्ट्रातला एक छोटा कार्यकर्ता आहे.. सचिव म्हणून काम करतो.. – हे सगळं कल्पोकल्पित आहे.. – काल नाना पटोलेंनी आरोप केला.. आज झारखंड कॉंग्रेस अध्यक्षांनी कबुल केलं.. हे सगळं खोटं असून आमचा एकही आमदार भाजपच्या संपर्कात नाही.. आणि कोणत्याही आमदाराने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.. – या पद्धतीने राजकारणात अफवा निर्माण करुन जाणीवपूर्वक मला आणि भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय.. बारामती ओबीसी मोर्चावर प्रतिक्रिया – बारामतीतून ओबीसींचा एल्गार पुकारला गेला.. तो महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचेल.. – राजकारण न करता आम्ही भाजप नेते सरकारच्या मदतीला तयार.. – सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ओबीसींचा डेटा तयार करावा.. – ओबीसी आयोग तयार झाला आहे.. डेटा तयार करायला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागत नाही.. – सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण थांबवलं नाही, केवळ डेटा तयार करण्याची सुचना केलीय.. – पण ओबीसींना आरक्षण द्यायचं मनात नसेल म्हणून ओबीसींचा फुटबॉल केला जातोय.. – केंद्राकडून डेटा घेण्याचा चुकीचा ठराव विधीमंडळात आणला गेला.. विधीमंडळाचा वापर राजकारणासाठी केला गेला.. – केंद्राच्या डेटामध्ये ६९ लाख चुका झाल्यात.. त्यावरुन तुम्ही आरक्षण कसा देणार..? – २०२१ चा डेटा तयार करा आणि ओबीसींचं आरक्षण द्यावं.. – डिसेंबरपर्यंत डेटा तयार करा भाजप सरकारचं जाहिरपणे अभिनंदन करेल.. – डिसेंबरपर्यंत डेटा तयार केला नाही, त्याचा अर्थ सरकारच्या मनात काहीतरी काळंबेरं आहे.. – ओबीसी आरक्षण न देता धनदांडग्यांना ओबीसींच्या जागांवर उभं करायचं असं सरकारचं षडयंत्र आहे असं आम्हाला वाटेल.. – मग मात्र गावागावात, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.. – आम्ही सध्या वाटेल ती मदत करायला तयार आहोत, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे काम करा, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत.. – डिसेंबरपर्यंत डेटा द्यावा आणि ओबीसींना न्याय द्यावा..

  • 29 Jul 2021 03:13 PM (IST)

    चंद्रपूर महापालिकेत सभेदरम्यान राडा, काँग्रेस-भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले

    चंद्रपूर : महापालिकेत सभेदरम्यान राडा, काँग्रेस-भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले, मनपाच्या 200 कोटी अंकेक्षण अहवाल आक्षेप व अन्य विषयावर सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न, दोन्ही गटांमध्ये महापौर टेबल समोर झाली धक्काबुक्की, काँग्रेस नगरसेवक नागरकर यांनी महापौर यांच्यासमोरील टेबल ठोकल्याने वाढला वाद, महापौरांनी नामफलकाची पट्टी फेकून मारल्याचा काँग्रेसचा आरोप, महापौरांनी विरोधी सदस्यांनी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाला दिले कारवाईचे निर्देश

  • 29 Jul 2021 11:58 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौऱ्याचा दुसरा दिवस

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौऱ्याचा दुसरा दिवस

    बाबासाहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा नवा खजिना मिळाला

    आपण कसं सावध असलं पाहिजे हे ते इतिहासातून सांगतात

    ते जे सांगतात ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे

  • 29 Jul 2021 11:49 AM (IST)

    पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, समाज बांधव आणि कार्यकर्त्यांचा दबाव

    जळगाव – पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, समाज बांधव आणि कार्यकर्त्यांचा दबाव

    सोशल माध्यमांवर कार्यकर्ते चालवताय मोहीम

    भाजपमध्ये खडसेंसारखी वागणूक मिळत असल्याचे मत

    शिवसेनेत प्रवेश केल्यास मंत्रीपद मिळेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा

  • 29 Jul 2021 11:26 AM (IST)

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

    वसई –

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

    वर्सोवा ब्रिज फाउंटन पासून मुंबई आणि वसई च्या दिशेला 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा

    फाउंटन सिग्नल वर मोठं मोठे कंटेनर, ट्रक, च्या ओहरटेक करण्यावरून झाली वाहतूक कोंडी

    महामार्ग पोलीस, वालीव, काश्मीरा पोलीस वाहतूक काढण्यासाठी महामार्गावर तैनात

    मागच्या 4 तासापासून वाहनधारक करत आहेत वाहतूक कोंडीचा सामना

    फाउंटन पासून वसईच्या मालाजीपाडा आणि मुंबईच्या दिशेला दहिसर टोल नाक्यापर्यंत लागल्या आहेत वाहनांच्या रांगा

  • 29 Jul 2021 11:23 AM (IST)

    अमित ठाकरेंकडून नाशकातील ट्रॅफिक पार्कची पाहणी

    नाशिक – अमित ठाकरेंकडून ट्रॅफिक पार्क ची पाहणी

    मनसे काळात उभारण्यात आला होता पार्क

  • 29 Jul 2021 10:45 AM (IST)

    नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी बंद पुकारला

    गडचिरोली जिल्ह्यात काल 28 जुलै पासून सुरू झालेल्या नक्षल सप्ताहामुळे नक्षलवाद्यांकडून 28 ते 3 ऑगस्टपर्यंत सहित क्रांतिकारी सप्ताह साजरा करण्यात येतो

    या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी बंद पुकारलेला आहे

    काही छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांचे ब्यानर पत्रके आढळली

    गडचिरोली परिवहन विभागाचे चार बसफेऱ्या रद्द

    शेतकऱ्यांचे पेरणीचे काम ठप्प

  • 29 Jul 2021 10:44 AM (IST)

    बारामतीत आज ओबीसी एल्गार मोर्चा

    बारामती –

    – बारामतीत आज ओबीसी एल्गार मोर्चा

    – ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ मोर्चाच आयोजन

    – पोलिसांनी नाकारलीय मोर्चाला परवानगी

    – परवानगी नसल्यानं प्रशासकीय भवनासमोर होणार छोटेखानी सभा

    – सभेनंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार

    – नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, महादेव जानकर, चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर यांना देण्यात आलं होतं मोर्चाचं निमंत्रण

  • 29 Jul 2021 10:41 AM (IST)

    नागपूर-सुरत महामार्गावर सीएनजी गॅस टँकर लीक

    धुळे –

    नागपूर-सुरत महामार्गावर सीएनजी गॅस टँकर लीक

    नेर गाव जवळ झाला गॅस टँकर लीक,

    महामार्ग वाहतूक खोळंबली, आजू बाजूला भीती च वातावरण…

    अग्निशमन दल चे बंब घटना स्थळी दाखल

  • 29 Jul 2021 09:14 AM (IST)

    पुणे जिल्ह्याला प्रथमच 2 लाखांहून अधिक लसींचा पुरवठा

    पुणे –

    – जिल्ह्याला प्रथमच २ लाखांहून अधिक लसींचा पुरवठा,

    – यामध्ये १,७९,५०० कोविशिल्ड आणि ३३,००० कोव्हॅक्सिन लसींचा समावेश,

    – यापूर्वी एप्रिल महिन्यात एकाच दिवशी दीड लाख लसींचा पुरवठा झाला होता,

    – जिल्ह्यात सध्या दररोज ५० ते ६० हजार लसीकरण केले जात आहे,

    – पुण्यातील १८६ लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसींचे डोस आज मिळणार आहेत,

    – पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत ५८,४२,२४५ नागरिकांचे लसीकरण.

  • 29 Jul 2021 08:49 AM (IST)

    औरंगाबाद शहरात आज पुन्हा 14 हजार नागरिकांना दिले जाणार लसींचे डोस

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरात आज पुन्हा 14 हजार नागरिकांना दिले जाणार लसींचे डोस

    औरंगाबाद शहरात आज 45 लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण

    प्रत्येक केंद्रावर दिले जाणार 200 नागरिकांना लसींचे डोस

    दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद शहरात लसीकरनाला सुरुवात

    औरंगाबाद शहरात लाखो नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

  • 29 Jul 2021 07:50 AM (IST)

    नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या ॲानलाईन परिक्षेत गोंधळ

    – नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या ॲानलाईन परिक्षेत गोंधळ

    – मराठीच्या परिक्षेत प्रश्नपत्रिकेत प्रश्नंच नव्हते

    – १६ प्रश्नांचे केवळ क्रमांक आणि पर्याय, प्रश्न नाही

    – प्रश्नपत्रिकेत प्रश्नंच लिहायला विसरले का पेपर सेट करणारे प्राध्यापक?

    – संतप्त विद्यार्थ्यांनी उपस्थित केला सवाल

    – प्रश्नाअभावी विद्यार्थ्यांना पेपर सोडवता आला नाही

    – प्रश्नपत्रिकेत प्रश्न नसल्याची होणार चौकशी

  • 29 Jul 2021 07:48 AM (IST)

    आष्टी, पाटोदा, शिरूर आणि गेवराईत आजपासून कडक निर्बंध

    बीड :

    आजपासून चार तालुक्यात कडक निर्बंध

    आष्टी, पाटोदा, शिरूर आणि गेवराईत कडक निर्बंध

    कोरोना रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासन सतर्क

    चार तालुक्यात सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत मार्केट सुरू

    अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच कडकडीत बंद

    जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

  • 29 Jul 2021 07:21 AM (IST)

    तिसऱ्या लाटेची घंटा वाजतेय, बीड आरोग्य विभागाची यंत्रणा लढायला सज्ज

    बीड :

    तिसऱ्या लाटेची घंटा वाजतेय

    आरोग्य विभागाची यंत्रणा लढायला सज्ज

    100 आयसीयूसह 660 खाटा तयार

    जिल्ह्यात 7 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट

  • 29 Jul 2021 07:14 AM (IST)

    लघूसिंचन विभागाच्या ५१ कामांच्या फाईलमधून ‘एफडी’ गायब

    नागपूर –

    – लघूसिंचन विभागाच्या ५१ कामांच्या फाईलमधून ‘एफडी’ गायब

    – कामं पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदार ‘एफडी’ घेऊन पळाले

    – जिल्हा परिषदेचे काही कंत्राटदार ‘एफडी’ घेऊन पळाले

    – सात सदस्यीय समितीकडून प्रकरणाची चौकशी सुरु

    – संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई होण्याची शक्यता

  • 29 Jul 2021 07:09 AM (IST)

    नागपूरकरांना डेंग्यूचा धोका वाढण्याची शक्यता

    – नागपूरकरांना डेंग्यूचा धोका वाढण्याची शक्यता

    – मनपाच्या सर्वेक्षणात ३७८ ठिकाणी आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

    – नागपूर महानगरपालिकेनं केली ८०४० घरांची पाहणी

    – मनपाने विशेष मोहिम राबवून केलं घरांचं सर्वेक्षण

    – तपासणी केलेल्या २७३२ कुलर्सपैकी ३१८ कुलर्समध्ये डास अळ्या

  • 29 Jul 2021 07:05 AM (IST)

    मूर्तिजापूर तालुक्यातल्या हेंडज फाट्यावर अपघात होऊन दोघांचा मृत्यू

    अकोला –

    अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या हेंडज फाट्यावर अपघात होऊन दोघांचा मृत्यू

    राष्ट्रीय महामार्गावरील हेंडज फाट्याजवळ टैंकर व दुचाकीची धडक

    या धडकीत दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू

    अकोला वरून अमरावती जातांना झाला अपघात

    दोघांची ओळख पटली नसून,मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल

Published On - Jul 29,2021 6:36 AM

Follow us
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.