Maharashtra News live Updates : अहमदनगर जिल्ह्यात 61 गावांमध्ये उद्यापासून लॉकडाऊन
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
अहमदनगर जिल्ह्यात 61 गावांमध्ये उद्यापासून लॉकडाऊन
अहमदनगर :
अहमदनगर जिल्ह्यात 61 गावांमध्ये उद्यापासून लॉकडाऊन
यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 11 तालुक्यातील 61 गावांचा समावेश
यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश
दैनंदिन 500 ते 800 च्या दरम्यान कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत.
तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे.
यामुळे ज्या गावांमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित आहेत अशा गावांमध्ये जिल्हाधिकारी यांनी केला लॉकडाऊन जाहीर
-
शिवसेनेमध्ये अंतर्गत खदखद : देवेंद्र फडणवीस
शिवसेनेमध्ये अंतर्गत खदखद, रामदास कदम यांची कथित ऑडिओल क्लिप खरी का खोटी माहिती नाही, शिवेसेनेसोबत अनेक वर्षांपासूनचे संबंध, अनेक लोकं भेटतात, खदखद व्यक्त करतात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे बोल
-
-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांचा बीड जिल्हा दौरा रद्द
बीड: विरोधीपक्ष नेत्यांचा बीड जिल्हा दौरा रद्द
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांचा दौरा रद्द
बीड जिल्ह्यातील नुकसान पाहणी दौरा रद्द
दौरा रद्द होण्याचे कारण अस्पष्ट
भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती
-
नाशिक शहरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
नाशिक : – नाशिक शहरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट 1 ने केला पर्दाफाश – तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकत 9 दुचाकी केल्या जप्त – रात्रीच्या सुमारास ही टोळी शहरात सक्रिय होत दुचाकी करायचे लंपास – नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यात यावे, नुकसानीची भीषण दृश्य पाहा : आमदार नमिता मुंदडा
बीड:
केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची प्रतिक्रिया
मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असतानाही सरकार मदतीसाठी पुढे येत नाही. मदत जाहीर केलेली नाही. शेती उद्ध्वस्त झाली. घरांची पडझड झालीय, केज-अंबाजोगाईच्या आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केली खंत.
पंकजाताई मुंडे देखील पालकमंत्री पालकमंत्री होत्या तेंव्हा अशी परिस्थिती नव्हती. विद्यमान पालकमंत्री यांनी आणखीन कसलीच मदत जाहीर केली नाही. ओला दुष्काळ का जाहीर नाही केला? हा माझा राज्य सरकारला सवाल आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यात यावे. नुकसानीची भीषण दृश्य पाहावे. पालकमंत्री काय करतात आम्हाला माहीत नाहीये मात्र लोकांना मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर निदान 50 हजारांची तरी मदत करावी. सरकारने पूरपरिस्थिती गांभीर्याने घेतले नाही. नमिता मुंदडा यांची खंत.
-
-
नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांना भरधाव कारची धडक
नागपूर :
नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांना भरधाव कारची धडक
धडकेत चार प्रवासी गंभीर जखमी
दोघांची स्थिती नाजूक असल्याची माहिती
बाजारगाव जवळच्या सातनवरी गावाजवळची घटना
-
नांदेडचे शिवसैनिक, पदाधिकारी शिवसेना भवनात दाखल
शिवसेनेचे नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार सुभाष साबणे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिक, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांना भेटण्यासाठी शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.
शिवसेना भवन इथ नांदेड जिल्हाप्रमुख उमेश मुंडे , शिवसेना तालुकाप्रमुख देगलूर महेश पाटील आणि शहर प्रमुख सह पंचवीस ते तीस शिवसैनिक शिवसेना भवनात अनिल देसाई खासदार शिवसेना सचिव यांची भेट घेऊन शिवसेनेचे निवडणुकीत शिवसेनेचे काय भूमिका असेल सध्या महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार आहे शिवसेनेचे देगलूर माजी आमदार सुभाष साबणे हे उद्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार त्यासंदर्भात नांदेडचे पदाधिकारी शिवसेना खासदार सचिव अनिल देसाई यांची भेट घेऊन पक्षाची आणि पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका तीच आमची भूमिका आहे सुभाष साबळे हा गद्दार आहे अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केलीय
-
श्रीगोंद्यात ३० वर्षीय अज्ञात महिलेची हत्या
श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव शिवारात ३० वर्षीय अज्ञात महिलेची हत्या
डोक्यावर हत्याराने मारुन अंगावरील साडीच्या पदराने तिचा गळा आवळला
महिलेची ओळख पटू नये म्हणून महिलेच्या चेहऱ्यावर केमिकल टाकले
अज्ञात व्यक्तिविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
NCB कडून क्रूज ड्रग्ज पार्टीच्या आयोजकांना समन्स, 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
NCB ने क्रूजवर ड्रग्ज पार्टीच्या आयोजकांना पाठवले समन्स…
– NCB च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रग्ज पार्टीचे आयोजन 6 लोकांनी एकत्र केले होते.
– सर्वांना सकाळी 11 वाजता एनसीबीसमोर हजर राहण्यास सांगितले
-
चंद्रपूर जिल्ह्यात ‘समस्यामुक्त गाव’ अभियानाची सुरुवात
चंद्रपूर जिल्ह्यात ‘समस्यामुक्त गाव’ अभियानाची सुरुवात,
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह संपूर्ण प्रशासन पोहचले दुर्गम पालेबारसा गावात,
राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाची मोठी मोहीम,
चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक गावात थेट प्रशासन पोचावे यासाठी राबविणार विशेष मोहीम,
थेट जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय योजना व समस्या या दोन्ही समजणार नसल्याचे वडेट्टीवार यांचे वक्तव्य,
मुसळधार पाऊस व अनंत अडचणींचा सामना करत चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने यशस्वी करणार ‘समस्या मुक्त गाव’ अभियान
-
‘गांधींना अशा सिनेमांनी फरक पडणार नाही’, ज्येष्ठ विधिज्ज्ञ असीम सरोदे यांची महेश मांजरेकरांवर खोचक टीका
महेश मांजरेकरांच्या आगामी नथूराम गोडसे चित्रपटासाठी शुभेच्छा
मात्र कलम 19 ( 2 ) नुसार वाजवी बंधनासह नथुरामाचे उदात्तीकरण न करता अभिव्यक्तीचा वापर करणार असाल तर,
वकील म्हणून त्यांच्यासोबत असेल,
गांधींना अशा सिनेमांनी फरक पडणार नाही,
वकील असीम सरोदेंची महेश मांजरेकरांवर खोचक टीका!
-
ड्रग्ज केस प्रकरण – आतापर्यंत 8 जणांना अटक, बॉलिवूड सेलिब्रेटीचा मुलगा म्हणतो, माझ्या चेहऱ्याचा वापर झाला!
आत्ता पर्यंत दहा ते १३ जणांना ताब्यात घेतलंय – ८ जणांना अटक झालीये… – बाॅलीवूड सेलिब्रिटीच्या मुलाने आपल्या चेहऱ्याचा वापर झाल्याचं म्हटलंय… – त्याला रेव पार्टीची, ड्रग्ज पार्टीची माहिती नव्हती असं त्याने म्हटलंय
-
नारंगी सारंगी धरण ओव्हरफ्लो
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नारंगी सारंगी हे धरण ओव्हरफलो झाल्यामुळे या धारणाचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत. नारंगी सारंगी धरणाचे सर्व दरवाजे उघडून नदी पत्रात विसर्ग करण्यात येत आहे. वैजापूर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आणि नारंगी सारंगी नदीला पूर आल्यामुळे हे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
-
ठाण्यात एकाच दिवशी 10 हजार जणांचं लसीकरण, मुख्यमंत्र्यांकडून महापौर आणि आयुक्तांचं अभिनंदन
एकाच दिवशी एकाच केंद्रावर तब्बल १० हजार १० कोरोना प्रतिबंधक लसीकरण मुख्यमंत्री महोदयांनी केले महापौर व महापालिका आयुक्तांचे अभिनंदन ..दिव्यातील लस दिव्यातील महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
-
विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत 100 टक्के पाऊस
विदर्भात पावसाने पूर्ण केला कोटा
विदर्भातील अनेक जिल्ह्यात 100 टक्के पाऊस
सरासरीच्या तीन टक्के अधिक झाला पाऊस
पण काही जिल्ह्यात काही प्रमाणात तूट
पुढील काळात आणखी पावसाची शक्यता
विदर्भातील पाणी समस्या मिटण्याची शक्यता
-
राज्यपाल पुन्हा पुणे दौऱ्यावर
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी 6 तारखेला पुणे दौऱ्यावर,
डेक्कन कॉलेजला मिळणार टपाल तिकीट, टपाल तिकीटाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी
राज्यपालांच्या हस्ते होणार टपाल.तिकीटाचं उद्घाटन तर केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवीसिंग चौहान लावणार ऑनलाइन हजेरी,
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेचा ( अभिमत विद्यापीठ ) द्वीशताब्दी सांगता सोहळ्याची राज्यपालांच्या हस्ते होणार सांगता
-
मदत द्यायची असेल तर द्या अन्यथा शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी
पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा का करताय
मदत द्यायची असेल तर द्या अन्यथा शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही
मंगळवारी केंद्रीय पथक येत पार्श्वभूमीवर राजू शेट्टींचा इशारा
महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीचा पाहण्यासाठी येथे केंद्रीय पथक
राजू शेट्टी यांनी हसुर इथल्या महेश पाटील या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन परिस्थिती दाखवण्याचा केला प्रयत्न
महापुरात उध्वस्थ झालेल पीक काढुन शेतकऱ्यांनी दुसर पीक घेतलं
आता नुकसान दिसणार कसं
राजू शेट्टींचा सवाल
-
पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा
पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा,
तर मध्य महराष्ट्र, कोकण ,गोवा ,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा,
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती,
मात्र घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस इशारा देण्यात आलाय,
पुणे हवामान वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय
-
यंदा नागपूरच्या दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही!
यावर्षी नागपूर च्या दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत.
त्यामुळे दरवर्षी दसर्याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नाही.
या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.
दसऱ्याच्या दिवशी होत असतो हा मोठा सोहळा
लाखो अनुयायी लावतात या सोहळ्याला हजेरी
-
बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा समोर
या रेव्ह पार्टीत बॉलीवूडशी संबंधित काहीजण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे.
-
रेव्ह पार्टी कुठे सुरु होती? पदार्फाश कसा झाला?
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. शनिवारी ही बोट गोव्याच्या दिशेने निघाली होती. सोमवारी ही बोट पुन्हा मुंबईत परतणार होती. या क्रुझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार अंमली नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच क्रुझवर प्रवेश मिळवला होता. क्रुझ गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली. यावेळी समीर वानखेडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकला.
-
रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, बॉलिवूडच्या बड्या सुपरस्टार्सचा मुलगा ताब्यात
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केल्याचे समजते. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी सुरु आहे. यामध्ये एका बड्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Published On - Oct 03,2021 6:38 AM