Maharashtra News LIVE Update | अपुऱ्या निधीअभावी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलं, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हायकोर्टात कबूली

| Updated on: Sep 14, 2021 | 12:07 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | अपुऱ्या निधीअभावी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलं, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हायकोर्टात कबूली
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Sep 2021 09:21 PM (IST)

    अपुऱ्या निधीअभावी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलं, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हायकोर्टात कबूली

    अपुऱ्या निधीअभावी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलं’

    तातडीनं 200 कोटी उपलब्ध झाले तर 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल काम

    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हायकोर्टात कबूली

    पनवेल ते इंदापूर दरम्यानचे खड्डे बुजवण्यासाठी हवेत अतिरिक्त 67 कोटी

  • 13 Sep 2021 07:21 PM (IST)

    महिला सुरक्षेसाठी आगामी अधिवेशनात ठराव मंजूर करणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

    “राज्यातील महिला सुरक्षेबाबत बैठक झाली. पोलीस अधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक झाली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या सूचना आल्या आहेत. गुन्हे घडताना दिसत आहेत. त्याचे चित्र बदलले पाहिजेत. जे गुन्हे घडले आहेत त्यामध्ये परिचित व्यक्तींमध्ये गुन्हे घडल्याचं समोर आली आहे. महिला सुरक्षेसाठी येत्या अधिवेशनात ठराव मांडला जाईल”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

  • 13 Sep 2021 06:51 PM (IST)

    एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, 4 डिसेंबरला राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार

    एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी,

    राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर,

    4 डिसेंबरला राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार

    तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचीही तारीख जाहीर,

    18 डिसेंबरला होणार परीक्षा,

    मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्याची आयोगाकडे विद्यार्थी करत होते मागणी,

    अखेर परिपत्रक काढत आयोगानं दोन्ही ही परीक्षांच्या मुख्य तारखा केल्या जाहीर…

    औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर ,नाशिक, पुणे

    या जिल्ह्यातील केंद्रावर होणार परीक्षा

  • 13 Sep 2021 06:48 PM (IST)

    इन्कम टॅक्सने याआधी माझी सगळी चौकशी केली आहे : मंत्री हसन मुश्रीफ

    कोल्हापूर :

    मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया :

    इन्कम टॅक्सने याआधी माझी सगळी चौकशी केली आहे

    आता दुसऱ्या यंत्रणेला चौकशी करता येत नाही

    ईडीने चौकशीचा प्रयत्न केला, कारखान्याशी संबंधित 40 ते 50 हजार सभासद शेतकरी जबाब नोंदवून घ्या म्हणून ईडीकडे जातील

    माझ्याकडे व्हाइट मनी आहे की नाही याची चिंता चंद्रकांत दादांनी करु नये

    गरज लागली तर त्यांच्याकडूनच पैसे मागून घेईन, त्यांच्याकडे खूप पैसे आहेत

  • 13 Sep 2021 05:38 PM (IST)

    500 कोटींचा दावा दाखल करा, आम्ही धमक्यांना घाबरत नाही : चंद्रकांत पाटील

    मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा समोर आणला. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. ते माझे मित्र आहेत.  माझे नाव घेणं ही त्यांच्यासाठी झोपेची गोळी आहे. मित्राला माझं नाव घेतल्यावर चांगली झोप लागत असेल तर हरकत नाही. ते शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत, त्या ऐवजी 500 कोटीचा दावा दाखल करावा. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करताना स्टँप ड्युटी भरावी लागते, त्यासाठी व्हाईट मनी आहे का ? धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • 13 Sep 2021 04:34 PM (IST)

    पुणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात, 15 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

    पुणे :

    पुणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात

    सकाळपासून होते ढगाळ वातावरण

    15 तारखेपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने वर्तवलाय अंदाज

  • 13 Sep 2021 04:33 PM (IST)

    साकीनाका प्रकरणी तपासात कुठलीही ढिलाई नसल्याबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे समाधान

    मुंबई : साकीनाका येथे महिलेवर बलात्कार होऊन त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. राज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये असे देखील स्पष्ट केले. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने स्वत: चर्चेसाठी बोलावून या घटनेकडे राज्य शासन गांभिर्याने पहात असून पिडीतेच्या कुटुंबास योग्य तो मोबदला देण्यात येवून तिच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल असे आयोगास सांगितले.

  • 13 Sep 2021 04:10 PM (IST)

    Maharashtra News LIVE Update | राज्यातील 5 जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, 5 ऑक्टोबरला मतदान

    राज्यातील 5 जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर, 5 ऑक्टोबरला मतदान होणार, 6 ऑक्टोबरला मतमोजनी केली जाईल. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहेतसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

  • 13 Sep 2021 03:17 PM (IST)

    साकीनाका बलात्कार प्रकरणी तपास कुठपर्यंत आला? मुंबईच्या आयुक्तांनी सांगितली माहिती

    साकीनाका बलात्कार प्रकरणी तपास कुठपर्यंत आला, मुंबईच्या आयुक्तांनी सांगितली माहिती

    पोलीस आयुक्त हेमंत नगराळे नेमकं काय म्हणाले?

    दोन दिवसांपूर्वी साकीनाका बलात्कार प्रकरणाबाबत माहिती दिली होती. या प्रकरणी जो तपास समोर आला आहे. त्याबाबत माहिती देणार आहोत. याप्रकरणी सोशल मीडियावर चुकीचा मेसेज पसरवला जातोय. त्यामुळे खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माहिती देतोय.

    पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एससी एसटी अॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. त्याअनुषंगाने तपास सुरु आहे. आपण आरोपीला अटक केली असून 21 तारखेपर्यंत कस्टडीत आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सर्व घटनेची माहिती मिळवली आहे. घटनास्थळावर पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला, त्यानंतर आरोपी कसा पळून गेला, या सगळ्याची पुराव्यासकट माहिती मिळाली आहे. आरोपीकडे असणारं प्रमुख हत्यारंही आपण जप्त केलं आहे. या संवेदनशील गुन्ह्यासाठी स्पेशल वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत

    नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे वॉईस चेअरमन यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. आज दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार, मुख्य सचिव, अपर उपसचिव आणि इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर चर्चा केली. पोलिसांच्या तपासावर कौतुक करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत आहे तेवढी मदत केली जाईल.

  • 13 Sep 2021 03:06 PM (IST)

    नारायण राणे अलिबागमध्ये दाखल, गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा जबाब नोंदवून घेणार

    केंद्रीय मंत्री नारायण राणे अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा जबाब नोंदवून घेणार आहेत. गुन्हे शाखेबाहेर पोलिसांचा मोठा बंदोस्त तैनात आहे. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच संदर्भातला जबाब नोंदवण्यासाठी अलिबागमध्ये पोहोचले आहेत.

  • 13 Sep 2021 02:10 PM (IST)

    किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींची अब्रुनुकसानीचा फौजदारीचा दावा ठोकणार, त्यांनी कोल्हापुरात यावं, हसन मुश्रीफाचं आव्हान

    माझ्या पक्षाच्या विरुद्ध आणि माझे नेते शरद पवार यांच्या विरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात होता. त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया देत असल्यानं माझ्यावरही अशी वेळ येईल, अशी कल्पना होती. किरीट सोमय्या यांचा मनापासून निषेध करतो. किरीट सोमय्यांच्या सीए पदवीवरच संशय येतो. सरकारी वेबसाईट आणि निवडणुकीच्या शपथपत्रातील माहिती सोमय्यांनी सांगितली आहे.

    विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्या घरावर, कारखान्यावर धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी यंत्रणांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव सापडले. किरीट सोमय्यांनी कागल आणि कोल्हापूरला यायला हवं होतं. किरीट सोमय्यांना सांगू इच्छितो की यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी पैसे गुंतवलेले आहेत. छत्रपती शाहू कारखाना उभारणीत योगदान होतं. मतभेद झाल्यामुळे आपल्याला आणि सरकारी कारखान्यांना परवानगी देत नसल्यानं खासगी कारखाना काढावा लागला.

    एका दिवसात 17 कोटी रुपयांचं भागभाडंवल उभं झालं. त्यावेळी सुद्धा इन्कमटॅक्स विभागानं चौकशी केली होती. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे 9 हंगाम झाले आहेत.यापूर्वी माझ्यावर आरोप झाले होते त्यावेळी 50 कोटी रुपयांचे दावे केले आहेत. गेली 17 वर्ष मंत्री आहे, माझ्यावर एकही आरोप झाला नाही. मी येत्या दोन आठवड्यांमध्ये किरिट सोमय्यांवर 100 कोटींचा फौजदारी स्वरुपाचा अब्रुनुकसानाचीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. कोल्हापूरमध्ये भाजपला पुढील 10 वर्षे सत्ता मिळणार नाही, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. समरजितसिंह घाडगेंचा पयरा फेडू, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

  • 13 Sep 2021 01:53 PM (IST)

    जालन्यातील पीक नुकसानीसाठी मनसेचं जलसमाधी आंदोलन

    जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेती आणि शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, आणि ती ही कुठलेही पाहणी पंचनामे न करता देण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यानी गल्हाटी तलावात जलसमाधी आंदोलन केले. या वेळी आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढले.

  • 13 Sep 2021 01:32 PM (IST)

    दुसऱ्यांच्या पोरांवर आरोप करण्यापूर्वी स्वत:च्या पोरांचे उद्योग पाहावे, नवाब मलिकांचं सोमय्यांना प्रत्युत्तर

    महाराष्ट्र सदन घोटाळ्याबाबतीत हजारो कोटीचा घोटाळा म्हणून ते आरोप करत होते. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना कोर्टानं दोषमुक्त केलं आहे. राजकीय दृष्ट्या आरोप करायचे हे किरीट सोमय्याचं काम सुरु आहे. सोमय्या गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाले आहेत. किरीट सोमय्यांना कोणताही धोका नसताना केंद्र सरकारनं त्यांना चाळीस लोकांची सुरक्षा दिली आहे. किरीट सोमय्या डर्टी इलेव्हन म्हणून ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

    आज त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहेत. आमच्या पक्षातील नेते स्वत:चे उद्योग करत आहेत. त्यांच्या उद्योगांची नोंद आहे, आयकर विभागात, कॉर्पोरेट विभागात नोंद करत आहेत. केंद्रीय यंत्रणा त्यांच्या नियमांप्रमाणं कारवाई करु शकतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यावर, घरावर छापेमारी करण्यात आली होती. त्या छापेमारीला दोन वर्ष झाल्यानंतरी हसन मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. किरीट सोमय्या यांना आता कोणही गांभीर्यानं घेत नाही. इतरांच्या पोरांवर बोट दाखवत असताना स्वत:ची पोरं काय करतात हे किरीट सोमय्यांनी पाहावे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. किरीट सोमय्यांनी नारायण राणेंच्यावर आरोप केले होते, त्याचं काय झालं असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

  • 13 Sep 2021 01:32 PM (IST)

    वसई विरारमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात

    वसई विरार मध्ये दुपारी साडे बारा नंतर रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. आज सकाळ पासूनच अभाळ पुर्णपणे भरलेले आहे. हवामान खात्याच्या अँदाजाप्रमाणे आज आणी उध्या दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याप्रमाणे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  रिमझिम पावसासह अधुन मधुन जोरदार पाउस सुरु आहे.

  • 13 Sep 2021 01:11 PM (IST)

    किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर हसन मुश्रीफ, शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

    हसन मुश्रीफ परिवारानं शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. त्याचे पुरावे मी आयकर विभागाला सादर केले आहेत. सीआरएम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडमधून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं कर्ज घेतलं असल्याचं दाखवलं आहे. सीआरएम सिस्टीम मधून कर्ज घेणाऱ्यांवर कारवाई सुरु झाली आहे. नाविद मुश्रीफच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख आहे.

    सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात ताहेरा हसन यांच्या नावानं शेअर्स असल्याचं समोर आलं आहे. 2017 मध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाचा छापा पडला. त्यात 127 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

  • 13 Sep 2021 12:33 PM (IST)

    भागवत कराड यांची 12 बँकांच्या प्रमुखांशी चर्चा

    केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली देशातील 12 राष्ट्रीय बँकांच्या अध्यक्षांची राष्ट्रीय बैठक औरंगाबादला होणार आहे. या बैठकीत औरंगाबादच्या डिएमआयसीत येणाऱ्या उद्योगांना सुलभ कर्ज पुरवठा होण्यासाठी चर्चा होईल अशी माहिती आहे.  पीककर्ज आणि मुद्रा लोन बाबत येणाऱ्या अडचणींवर चर्चा होणार आहे. 16 सप्टेंबर रोजी ही बैठक हॉटेल रामा येथे होणार आहे.

  • 13 Sep 2021 12:27 PM (IST)

    ऊस गाळप धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक

    – ऊस गाळप धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्री समितीची महत्वपूर्ण बैठक,

    – ऊस गाळप हंगामाची तारीख निश्चितीसह अन्य महत्वपूर्ण निर्णय बैठकीत अपेक्षित,

    – सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी साडे बारा वाजता बैठकीचे आयोजन,

    – या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, साखर संघ प्रतिनिधी, साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित राहणार.

  • 13 Sep 2021 11:25 AM (IST)

    बीडमध्ये 11 सशस्त्र दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद, ग्रामीण भागात दहशत

    बीडमध्ये 11 सशस्त्र दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद

    केज तालुक्यातील नांदूरघाटमध्ये भीतीचे वातावरण

    दरोडेखोर रस्त्याने धावताना सीसीटीव्हीत कैद

    ऐन गणेशोत्सवाच्या काळात दरोडेखोर गावात दिसल्याने ग्रामस्थांत दहशत

    घटनेची माहिती मिळताच केज पोलीस घटनास्थळी दाखल

  • 13 Sep 2021 11:00 AM (IST)

    नालासोपाऱ्यात अचानक जोरदार पावसाची हजेरी

    नालासोपाऱ्यात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.. 15 मिनिटं जोरदार पाऊस पडून तो थांबलाही आहे.. वसई विरार नालासोपाऱ्यात आज सकाळ पासूनच पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे.. दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.. पण नालासोपाऱ्यात अचानक वाऱ्या सह पडलेल्या पावसाने काही वेळासाठी सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.

  • 13 Sep 2021 10:59 AM (IST)

    वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची पुणे पोलिसांची मागणी

    वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण,

    – प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवण्यासाठी पुणे पोलिसांची सरकारकडे मागणी,

    – यासंदर्भात येत्या एक ते दोन दिवसात सरकारकडून निर्णय अपेक्षित,

    – या केससंदर्भात सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचं काम सध्या पुणे पोलिसांकडून सुरुय.

  • 13 Sep 2021 10:02 AM (IST)

    कोयना धरणातून पाणी विसर्ग आणखी वाढवणार, 6 दरवाजे 4 फुटानं उचलणार

    कोयना धरणातून पाणी विसर्ग आणखी वाढवणार

    धरण पाणी साठा नियमनासाठी पाणी विसर्ग

    11 वाजता धरणाचे सही वक्री दरवाजे चार फुटांवर उचलणार

    एकुण 40000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात केला जाणार

    105 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या धरणात 104.49 टीएमसी पाणीसाठा झाला

    पाऊसाची उघडिप मात्र क्षेत्रातुन धरणात 30154 कयुसेक पाणी आवक सुरु

    नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 13 Sep 2021 09:47 AM (IST)

    सोलापूर शहरातील लसीकरण मोहीम ठप्प, लसीअभावी लसीकरण मोहीम ठप्प

    सोलापूर शहरातील लसीकरण मोहीम ठप्प

    लसीअभावी लसीकरण मोहीम ठप्प

    ग्रामीण मध्ये एकीकडे विक्रमी लसीकरण होत असताना

    शहरात लसीकरण मोहिम ठप्प

    परीणाम म्हणून लसीकरण केंद्राला कुलूप

  • 13 Sep 2021 09:27 AM (IST)

    पुण्याच्या रिंग रोड संदर्भात आज लोकप्रतिनिधींची महत्वाची बैठक

    पुण्याच्या रिंग रोड संदर्भात आज लोकप्रतिनिधींची महत्वाची बैठक

    सह्याद्री अतिथीगृहावर 4 वाजता होणार बैठक

    अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री व सहा तालुक्यातील आमदार खासदारांच्या उपस्थितीत होणार बैठक

    दुपारी रिंग रोड संदर्भात होणाऱ्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

    बागायती जमीन बाधित होत असल्याने रिंग रोडला शेतकऱ्यांचा मोठा विरोध

    बैठकीत काय होणार निर्णय हे पाहणे महत्त्वाचं

  • 13 Sep 2021 09:06 AM (IST)

    ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज संस्था प्रभाग रचनेवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

    स्थानिक स्वराजय संस्थांच्या निवडणुका, प्रभागवर रचना आणि ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे.  दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

  • 13 Sep 2021 08:40 AM (IST)

    पुणे महापालिकेकडून मास्क न घालणाऱ्या व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई

    मास्क न घालणाऱ्या व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेकडून कारवाई,

    – गणेशोत्सवानिमित्त रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी होत असून या पार्श्वभूमीवर पालिकेची कारवाई,

    – यासाठी महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक पथक नेमले आहे,

    – या अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून एका दिवसाला सुमारे ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

  • 13 Sep 2021 08:34 AM (IST)

    गडचिरोलीला मुसळधार पावसाचा फटका

    गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे तीन वाजेपासून पाच वाजेपर्यंत दोन तास मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. या मुसळधार पावसामुळे गडचिरोली आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वरील गोविंदराव नाल्यावरील वाहतूक  बंद झाली आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना कच्चा रस्ता बाजूनी तयार करण्यात आला होता या नाल्यावरून दीड ते दोन फूट पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आले

  • 13 Sep 2021 07:52 AM (IST)

    सोलापूरमध्ये म्युकर मायकोसिसचे आढळले 3 नवे रुग्ण

    सोलापूरमध्ये म्युकर मायकोसिसचे आढळले 3 नवे रुग्ण

    आजवर जिल्ह्यात आढळले आहेत 674 म्युकरमायकोसिसचे रुग्ण

    आत्तापर्यंत 95 जणांचा झाला आहे म्युकरमायकोसिसने मृत्यू

    558 जण उपचारांअंती झाले आहेत बरे

  • 13 Sep 2021 07:43 AM (IST)

    नाशिक दिंडोरीत चोरांचा धुमाकूळ, वृत्तपत्र कार्यालयासह एकाचं रात्रीत फोडली 7 दुकानं

    नाशिक दिंडोरीत चोरांचा धुमाकूळ..

    वृत्तपत्र कार्यालयासह एकाचं रात्रीत फोडली 7 दुकान..

    दुकानांचे शटर वाकवून केली चोरी..

    चारच दिवसांपूर्वी अशा पद्धतीने फोडले होते 10 दुकानं..

    स्थानिक पोलिसांच्या गस्ती बाबत स्थानकांमध्ये नाराजी

    परिसरातील टवाळखोर,भिकारी यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी..

  • 13 Sep 2021 07:29 AM (IST)

    ग्रामपंचायतीमधील सार्वजनिक नळ आणि पथदिव्यांची वीज खंडीत केल्याने भाजप आक्रमक

    – ग्रामपंचायतीमधील सार्वजनिक नळ आणि पथदिव्यांची वीज खंडीत केल्याने भाजप आक्रमक

    – आमदार समिर मेघेंच्या नेतृत्त्वात महावितरण कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन

    – ग्रामविकास विभागाच्या त्या ‘जीआर’ची होळी करुन केला सरकारचा निषेध

    – वीज खंडीत केल्याने सनासुदीच्या दिवसांत अनेक गावं अंधारात

    – ऊर्जामंत्री लक्ष देत नसल्याचा भाजप आ. समिर मेघेंचा आरोप

  • 13 Sep 2021 07:23 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

    नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

    सिन्नर आणि निफाड तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली

    सिन्नर तालुक्यात 22 तर, निफाड मध्ये 15 नविन रुग्ण आढळल्याने खळबळ

    तर जिल्ह्यात कोरोनाच्या 98 नवीन रुगणांची नोंद झाली आहे..

    सणासुदीच्या काळात रुग्णसंख्या आणखी वाढण्याचीनभीती

  • 13 Sep 2021 07:20 AM (IST)

    यंदाही अकरावीच्या प्रवेशाच्या जवळपास 20 हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता

    – यंदाही अकरावीच्या प्रवेशाच्या जवळपास वीस हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता,

    – अकरावी प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३१६ कनिष्ठ महाविद्यालयातील एक लाख १२ हजार ९६५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध,

    – प्रवेशासाठी केवळ ८५ हजार ५१८ विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी,

    – त्यातील केवळ ७७ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत

  • 13 Sep 2021 07:18 AM (IST)

    टायगर कॅपीटल म्हणून ओळख असलेलं नागपूर व्याघ्र अवयव तस्करीचा अड्डा

    टायगर कॅपीटल म्हणून ओळख असलेलं नागपूर व्याघ्र अवयव तस्करीचा अड्डा

    – शिकार करुन वाघांचे नखे, मिशा, हाडांची विक्री

    – दोन महिन्याभरात ३० आरोपींना कोठडी

    – दोन महिन्यात वन विभागाने ट्रॅप लावून आठ ठिकाणी टाकल्या धाडी

    – कोरोनात रोजगार गेल्यावे वन्य प्राण्यांच्या अवयवाची तस्करी वाढल्याची शक्यता

  • 13 Sep 2021 07:17 AM (IST)

    कोल्हापुरात लांडग्यांच्या कळपाने पाडला आठ बकऱ्यांच्या पिलांचा फडश्या

    लांडग्यांच्या कळपाने पाडला आठ बकऱ्यांच्या पिलांचा फडश्या

    कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील दानोळी इथली घटना

    दानोळी – कुंभोज रोडवरील रोकडे मळ्यात घडला प्रकार

    गेल्या चार महिन्यांतील ही तिसरी घटना

    लांडग्याच्या वारंवार हल्ल्यामुळे मेंढपाळांच होतय नुकसान

    मेंढपाळ भीतीच्या छायेत

    वनविभागाने लांडग्यांचा बंदोबस्त करावा, मेंढपाळांची मागणी

  • 13 Sep 2021 07:06 AM (IST)

    नाशिक शहर आणि परिसरात रात्रभर पावसाची संततधार

    नाशिक – शहर आणि परिसरात रात्रभर पावसाची संततधार..

    धरण पाणलोट क्षेत्रात देखील रात्रभर झाला पाऊस

    नाशिकच्या गंगापूर धरणातून आज पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता

    काल गंगापूर धरणातून करण्यात आला 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग

    गोदा घाटच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

  • 13 Sep 2021 07:05 AM (IST)

    नाशिकमधील  सामनगावच्या अश्विनी कॉलनी परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन..

    नाशिकमधील  सामनगावच्या अश्विनी कॉलनी परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन..

    घराच्या अंगणातच बिबट्याला समोरा समोर पाहून नागरिकांना भरली धडकी..

    बिबट्याचा व्हिडियो आला समोर..

    गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची याच परिसरात दहशत..

    आतापर्यंत अनेक कोंबड्या,शेळ्या केल्या फस्त..

    बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप तरी यश नाहीच..

  • 13 Sep 2021 07:04 AM (IST)

    किटअभावी रखडलं नागपूर जिल्ह्यातील दुसरं ‘सिरो’ सर्वेक्षण

    – किटअभावी रखडलं नागपूर जिल्ह्यातील दुसरं ‘सिरो’ सर्वेक्षण

    – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी ‘सिरो’ सर्वेक्षण सुरु होणार होतं

    – नागपुरात ६१०० नागरीकांची ॲंटिबॅाडी तपासणार

    – सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार होते सर्वेक्षण

    – कीटअभावी सर्वेक्षणाचं काम रखडलं

    – ‘सिरो’ सर्वेक्षणात पहिल्यांदाच लहान मुलांचाही आहे समावेश

  • 13 Sep 2021 06:54 AM (IST)

    नागपूर शेजारी असलेला गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो

    – नागपूर शेजारी असलेला गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो

    – चार दिवसांतल्या मुसळधार पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो

    – ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचं चार गेटपैकी एक गेट उघडलं

    – गोरेवाडा तलावाचं गेट अघडल्याने बेझनबाग परिसरातील साचलं पाणी

  • 13 Sep 2021 06:54 AM (IST)

    टाळेबंदी शिथिल होऊ लागताच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या

    टाळेबंदी शिथिल होऊ लागताच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईत बलात्काराचे 550 गुन्हे दाखल झाले आहेत. – तर विनयभंगाचे सुमारे 1100 गुन्ह्यांची नोंद झाली. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे… – गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या महिन्यादरम्यान मुंबईत बलात्काराच्या 377 घटना घडल्या होत्या. त्यातील 299 घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली. – यंदा गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून मुंबईत बलात्काराचे 550 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत… – यातील 445 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विनयभंगाचे गुन्हेही वाढले आहेत. – गेल्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत विनयभंगाचे 985 गुन्हे दाखल करण्यात आले होते. यंदा 1100 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. – यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे. 2020 मध्ये पूर्ण वर्षात मुंबईत बलात्काराच्या 767 घटना घडल्या, तर विनयभंगाचे 1945 गुन्हे दाखल झाले होते.

  • 13 Sep 2021 06:42 AM (IST)

    सातारा शहरात पहाटेपासून पावसाला सुरुवात

    बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अंदाजानुसार साताऱ्यात आज पहाटेपासून पावसाला सुुरवात झाली आहे.

  • 13 Sep 2021 06:41 AM (IST)

    गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांचा आज शपथविधी

    गुजतरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आज शपथ घेणार आहेत. विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • 13 Sep 2021 06:37 AM (IST)

    पुण्यात बिग बास्केटला आग, लाखो रुपयांचं नुकसान

    पुण्यात रात्री साडेअकरा वाजता बावधान बुद्रुक येथील बिग बास्केटच्या गोडाऊनला आग लागली. आगीमधे धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झालं आहे. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए व एमआयडीसी येथील एकूण 12 फायरगाड्या व जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यात आली.

Published On - Sep 13,2021 6:31 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.