Maharashtra Marathi Breaking News Live | मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात कारला अचानक आग

| Updated on: Sep 25, 2023 | 10:56 PM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Marathi Breaking News Live | मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात कारला अचानक आग

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : शिवसेना अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. आज दुपारी 3 वाजता होणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील गणपती मंडळांना ते भेटी देणार आहेत. मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यातील गणपती मंडळांना भेटी देणार. अभिनेता शाहरुख खान, जॅकी श्रॉफ आणि सलमान खान यांनी घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानातील बाप्पाचं दर्शन. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Sep 2023 09:26 PM (IST)

    मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात कारला भीषण आग

    इगतपुरी | मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात झिरो पॉईंट जवळ वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी केली. त्यानंतर तो गाडीतून लगेच बाहेर पडल्याने बचावला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी, इगतपुरी नगरपरिषद अग्निशमन दल, टोल प्लाझाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी जुन्या घाटातील वाहतूक काही काळासाठी बंद केली.

  • 25 Sep 2023 09:01 PM (IST)

    Team India Rajkot | टीम इंडिया राजकोटमध्ये दाखल

    राजकोट | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी राजकोटमध्ये पोहचली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचा व्हीडिओ शेअर केला आहे.  टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.

    टीम इंडिया राजकोटमध्ये

  • 25 Sep 2023 08:38 PM (IST)

    J P Nadda Pune Tour | भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मंगळवारी पुणे दौऱ्यावर

    पुणे | भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मंगळवारी 26 सप्टेंब रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. नड्डा या दौऱ्यादरम्यान दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर नड्डा मुंबईत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन दर्शन घेणार आहेत.

  • 25 Sep 2023 08:25 PM (IST)

    Praful Patel | नागालँडच्या 7 पैकी 7 आमदारांचा आम्हाला पाठिंबा : प्रफुल्ल पटेल

    मुंबई | नागालँडच्या 7 पैकी 7 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असं प्रुफल्ल पटेल यांनी म्हटलंय. तर शरद पवार यांनी भाजपला समर्थन दिलेलं नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.आम्ही नागालँडचे मुख्यमंत्री रिओ यांना पाठिंबा दिलेला, असंही आव्हाड यांनी म्हटलंय. प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने खोटं बोलू नये, असंही आव्हाड म्हणाले.

  • 25 Sep 2023 08:16 PM (IST)

    Brijesh Dixit MSIDC | एमएसआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ब्रिजेश दीक्षित यांची नियुक्ती

    मुंबई | ब्रिजेश दीक्षित यांच्याकडे राज्य सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ब्रिजेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा जीआर काढला आहे. दीक्षित यांची नियुक्ती ही मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

  • 25 Sep 2023 07:38 PM (IST)

    मोठी बातमी : चौंडी येथील उपोषणाकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन

    अहमदनगर : धनगर समाजाच्या चौंडी येथील उपोषणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना फोन केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. सरकार सकारात्मक आहे, आपण उपोषण सोडावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली अशी माहिती बाळासाहेब दोडतले यांनी दिली. उद्या मंत्री गिरीश महाजन आपणास भेटायला येतील असेही मुख्यमंत्र्यांनी फोनवरून सांगितलं.

  • 25 Sep 2023 07:23 PM (IST)

    बाकीच्या कारखान्यांना मदत मिळाली, पण मला नाही… पंकजा मुंडे यांचा केंद्रावर आरोप

    बीड : जीएसटी विभागाची दोन तीन महिन्यांपूर्वी पण नोटीस आली होती. आता परत आली आहे. तो उद्योग सध्या नुकसानीत आहे. बँकेकडे गहाण आहे. आकडे फक्त व्याजाचे आहेत. कारखाना चालला नाही त्यामुळे केंद्रात मदतीसाठी गेले होते. बाकी जणांसोबत या ही कारखान्याचे नाव होते. पण, बाकीच्या कारखान्यांना मदत मिळाली. माझ्या कारखान्याला मदत मिळाली नाही, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली.

  • 25 Sep 2023 07:09 PM (IST)

    निवडणुकीत कळेल कोणाची ताकद किती? अनिल देशमुख यांचा टोला

    नागपूर : सुनिल तटकरे यांनी यांनी 6 सहा तारखेला कळेल कोणाची ताकद किती आहे. आमच्याकडे किती आमदार आणि पवार साहेबांकडे किती आमदार, खासदार असणार हे त्यांना कळेल असे आव्हान दिले होते. त्यावर शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘तटकरे आमचे जुने सहकारी आहेत. आताच न बघता 2024 च्या निवडणूकमध्ये त्यांना कोणाकडे किती आमदार असतील हे कळेल असा टोला लगावलाय.

  • 25 Sep 2023 06:55 PM (IST)

    पंकजा मुंडेंवर त्यांचाच पक्ष अन्याय करतोय- अनिल देशमुख

    पंकजा मुंडेंवर त्यांचाच पक्ष अन्याय करतोय, अशी टीका शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे.  भाजपला महाराष्ट्रात मोठं गोपीनाथ मुंडेंनी केलं, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. मुंडेंच्या कन्येवर अन्याय झाल्याचं सांगत त्यांनी योग्य भूमिका घ्यावी, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

  • 25 Sep 2023 06:45 PM (IST)

    Rain Alert : मंगळवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार

    मंगळवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील दोन दिवसांपासून प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात असलेला पावसाचा जोर रविवारी ओसरला. मंगळवारपासून (26 सप्टेंबर) पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

  • 25 Sep 2023 06:30 PM (IST)

    शरद पवारांचं मतपरिवर्तन होऊ दे यासाठी रोज प्रार्थना करतो-प्रफुल पटेल

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन गट पडले आहेत. एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे शरद पवार आहेत. आता अजित ठाकरे गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांचं मतपरिवर्तन होण्यासाठी रोज प्रार्थना करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • 25 Sep 2023 06:15 PM (IST)

    मला अजितदादांचा फोन आला होता, पण मी जाणार नाही- एकनाथ खडसे

    अमोल मिटकरींतर्फे अजितदादांचा मला फोन, पण मी शरद पवारांचा पक्का शिलेदार, त्यांच्यासोबत जाणार नाही, असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय. तर मी खडसेंना फोन केला नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय…

  • 25 Sep 2023 06:04 PM (IST)

    वैद्यनाथ कारखान्याला 19 कोटींचा कर बुडवल्याप्रकरणी नोटीस, राजकारण तापलं

    वैद्यनाथ कारखान्याला 19 कोटींचा कर बुडवल्याप्रकरणी जीएसटी विभागानं नोटीस बजावलीय. अशी माहिती सूत्रांची दिली आहे… पंकजा मुंडेंच्या महाराष्ट्र यात्रेमुळेच त्यांच्यावर कारवाई केली असावी, असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय… तर पंकजा मुंडे भाजप नेत्यांच्या गुडबूकमध्ये नसतील म्हणून कारवाई केल्याचं पटोले म्हणालेत…

  • 25 Sep 2023 05:50 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी कॅनडाचा प्रश्न सोडवावा, पंजाबच्या अर्थमंत्र्यांची मागणी

    कॅनडासोबत सुरू असलेल्या वादाप्रकरणी पंजाबचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांशी बोलून हे प्रकरण सोडवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा वाद आणखी चिघळू नये. कारण फक्त पंजाबच नाही तर देशभरातून विद्यार्थी कॅनडाला गेले आहेत.

  • 25 Sep 2023 05:30 PM (IST)

    महिला आरक्षण ही तुमच्या एका मताची ताकद : पंतप्रधान मोदी

    जयपूरमध्ये परिवर्तन यात्रेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, महिलांना आरक्षण कोणी दिले? मी हे केले नाही, ही तुमच्या एका मताची ताकद आहे. मी तुमचा विश्वास पूर्ण केला आहे. मी राजस्थानला अनेकदा आलो आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी मला आशीर्वाद देताना कधीच पाहिल्या नाहीत.

  • 25 Sep 2023 03:49 PM (IST)

    Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या मुंबईत कांदा प्रश्नावर बोलवली बैठक

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या मुंबईत कांदा प्रश्नावर बोलवली बैठक . आमदार, बाजार समिती संचालक, व्यापारी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राहणार उपस्थित. गेल्या ६ दिवसापासून जिल्ह्यात कांद्याचे लिलाव आहेत बंद. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील उद्या आयोजित केली बैठक. उद्या मुंबईत होणाऱ्या या दोनही बैठकीत तोडगा निघणार का, याकडे लक्ष

  • 25 Sep 2023 03:36 PM (IST)

    Eknath Khadse | राष्ट्रवादीचे तिकीट मिळत असेल तर राष्ट्रवादीत जावं, एकनाथ खडसेंचा अनिल पाटलांना सल्ला

    अनिल पाटील हे माझ्या घरी येऊन गेले आहेत. अनिल पाटील हे माझे ज्युनिअर आहेत त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याशी शेअर करत असतो. त्यांना मी मागेही सांगितलं होतं की भाजपमध्ये तुम्हाला न्याय मिळणार नाही तुम्हाला राष्ट्रवादीचे तिकीट मिळत असेल तर तुम्ही राष्ट्रवादीत जावं – एकनाथ खडसे

  • 25 Sep 2023 12:36 PM (IST)

    कॉंग्रेसचा अतिरिक्त्त मालमत्ताकराविरोधात अमरावती पालीकेवर मोर्चा

    अमरावती पालिकेवर कॉंग्रेस पक्षाने मोर्चा काढला आहे. यंदा 5 ते 7 टक्के जादा मालमत्ता कर आकाराल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे.

  • 25 Sep 2023 11:58 AM (IST)

    Shivsena MLA News : शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी

    शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. आज दुपारी 3 वाजता विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये सुनावणी पार पडणार आहे. यामध्ये एकून 34 याचीकांची प्रक्रिया निश्चीत होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत.

  • 25 Sep 2023 11:51 AM (IST)

    Chandrashekhar Bawankule Viral Audio Clip : व्हायरल ऑडिओ क्लिपवर बावनकुळे यांची प्रतिक्रीया

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने विरोधकांकडून त्यांची कोंडी करण्यात येत आहेय यावर आता बावनकुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. मी फक्त पत्रकारांशी चांगले वागा असा सल्ला देत होतो असे ते म्हणाले.

  • 25 Sep 2023 11:47 AM (IST)

    Chandrashekhar Bawankule Viral Audio Clip : व्हायरल ऑडिओ क्लिपवरून नाना पटोले यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाना

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये निवडणूकीच्या काळात आपल्या विरोधात बातम्या छापल्या जावू नये यासाठी पत्रकारांना चहा पाजण्याबद्दल ते कार्यकर्त्यांना सुचना देत असल्याचे संभाषण आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळे यांच्यावर निशाना साधना आहे. बावनकुळेंची विद्वत्ता पुढे आली असल्याचे ते म्हणाले.

  • 25 Sep 2023 11:36 AM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. विरोधात लिहू नये म्हणून पत्रकारांना चहाला बोलवा असे बावनकुळे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे.

  • 25 Sep 2023 10:57 AM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर आहेत.  नाशिकच्या सिद्ध पिंपरी गावात बावनकुळे यांचं स्वागत करण्यात आलं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तनुजा घोलप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं.  तनुजा घोलप ठाकरे गटाचे नाराज उपनेते बबन घोलप यांच्या कन्या आहेत.  तनुजा घोलप यांनी काही दिवसांपूर्वी  भाजपमध्ये प्रवेश केला होता. तनुजा घोलप देवळाली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.

  • 25 Sep 2023 10:45 AM (IST)

    इंदापूरजवळच्या बायपासला होणाऱ्या नव्या उड्डाण पुलामुळे अपघात वाढले

    इंदापूर शहरानजीक बायपासला नव्याने उड्डाण पूल होत आहे. या कामात अनेक त्रुटी असल्याने या ठिकाणी रोज अपघात घडून निष्पाप प्रवाशांचा नाहक बळी जात आहे. या अपघातामुळे वाहतूक संथ गतीने होत आहे. तर काही वेळा दोन दोन तास ट्राफिक जाम होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

  • 25 Sep 2023 10:30 AM (IST)

    इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारला

    इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारला आहे.  पीएमआरडीएनं हा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. केंद्रीय मंजुरीसाठी प्रकल्प राज्य शासनाने केंद्राला पाठवला आहे.  राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाला अंतिम मान्यतेसाठी पाठवला आहे.  यामुळे इंद्रायणी नदीचं पुनरुज्जीवन होणार आहे. हा प्रकल्प 577 कोटींचा आहे.

  • 25 Sep 2023 10:15 AM (IST)

    फक्त सुनावणीच वेळापत्रक ठरवू नका तर निकाल द्या”

    आजच्या सुनावणीत वेळापत्रक ठरवू नका.  तर लवकरात लवकर सुनावणी घेवून निकाल द्या, असा युक्तिवाद आजच्या सुनावणीत ठाकरे गट करणार आहे. सुप्रीम कोर्टान सांगितल्यानंतर सुनावणी घेतली जात आहे. फक्त सुनावणीच वेळापत्रक ठरवू नका तर निकाल द्या. आम्ही आजही युक्तिवादासाठी तयार आहोत. ३ तारखेला होणाऱ्या सुप्रीम कोर्टातील सुनावणी आधी कार्यवाहीची ठाकरे गटाला अपेक्षा आहे.

  • 25 Sep 2023 09:40 AM (IST)

    Live Update | नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा आजचा ६ वा दिवस

    नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा आजचा ६ वा दिवस आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य कांदा उत्पादक संघटनेची आज लासलगाव बाजार समितीची बैठक देखील होणार आहे.

  • 25 Sep 2023 09:36 AM (IST)

    Live Update | मी फक्त विकासाचा विचार करतो… अजित पवार

    मी फक्त विकासाचा विचार करतो.. असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. ‘माझ्या नियोजित कार्यक्रमांबाबत शाहांच्या ऑफिसला कळवलं होतं. मी २३- २४ – २५ अशा तीन दिवसांच्या दौवऱ्यावर आहे. माध्या कार्यक्रमांची माहिती शाहांना दिली होती…’ असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

  • 25 Sep 2023 09:31 AM (IST)

    Live Update | नितेश राणेंकडून संजय राऊत, दानवेंवर विशेषाधिकार भंगाची तक्रार

    आमदार नितेश राणे यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहिलं आहे. पत्रात राणे यांनी संजय राऊत, दानवेंवर विशेषाधिकार भंगाची तक्रार केली आहे. राऊत अंबादास दानवे विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकत असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.

  • 25 Sep 2023 09:03 AM (IST)

    Entertainment Update | लग्नानंतर परिणीती चोप्राचा पती राघव चड्डा यांच्यासोबत पहिला फोटो समोर

    २४ सप्टेंबर २०२२३ हा दिवस अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि APP पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्यासाठी प्रचंड खास असणार आहे. कारण याच दिवशी दोघे विवाहबंधनात अडकले.. लग्नानंतर दोघांचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे… वाचा सविस्तर

  • 25 Sep 2023 08:59 AM (IST)

    Kalyan Accident | भरधाव कारने पाच मजुरांना चिरडलं

    कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुला लगत भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडले आहे. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून एकाचा उपाचरादरम्यान मृत्यू झाला आहे.

  • 25 Sep 2023 08:44 AM (IST)

    Pune News | पुणेकरांसाठी एक चांगली बातमी

    पुणेकरांसाठी एक चांगली बातमी आहे. धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. पावसामुळे नद्या, नाले तुडूंब भरून वाहत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत ही दोन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत. याशिवाय टेमघर धरणातील पाणीसाठा आता 76 टक्क्यांवर आहे.

  • 25 Sep 2023 08:27 AM (IST)

    Asian Games 2023 | एशियन गेम्समध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल

    एशियन गेम्स 2023 मध्ये भारताने सुवर्णपदकाच खात उघडलय. भारताने आपलं पहिलं गोल्ड मेडल जिंकलं. भारताने शूटिंगच्या खेळात हे पहिलं गोल्ड मेडल मिळवलय.

  • 25 Sep 2023 08:22 AM (IST)

    Ganesh Utsav 2023 | नाशिकमध्ये ध्वनिक्षेपकासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

    नाशिकमध्ये आजपासून चार दिवस भाविकांना रात्री 12 वाजेपर्यंत आरास पाहण्याची संधी. गणेश मंडळांना देखील रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक मर्यादित आवाजात सुरू ठेवण्यास परवानगी. शासनाच्या निर्णयाचे भाविकांनी आणि गणेश मंडळांनी केले स्वागत. शहरातील काही मार्गांवर सायंकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत प्रवेश बंद.

  • 25 Sep 2023 08:00 AM (IST)

    PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर, कसा आहे दौरा?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशातील भोपाळच्या दौऱ्यावर येत आहेत. गेल्या 45 दिवसातील मोदींचा हा मध्यप्रदेशातील तिसरा दौरा आहे. पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता भोपाळच्या जंबूरी मैदानात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तसेच भाजपने काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेतही सामील होणार आहेत.

  • 25 Sep 2023 07:46 AM (IST)

    onion traders : कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरूच, संपाचा आज सहावा दिवस

    नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा आज सहावा दिवस आहे. व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे देखील नुकसान होत आहे. तर दुसरीकडे राज्य कांदा उत्पादक संघटनेची आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक बोलावली आहे.

    कांद्यावरील निर्यात शुल्क, व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद या पार्श्वभूमीवर रूपरेषा ठरवण्यासाठी ही बैठक होत आहे. व्यापाऱ्यांच्या बंदच्या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकरी बैठकीत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 25 Sep 2023 07:30 AM (IST)

    ganesh festival : अजित पवार आणि अमित ठाकरे आज पुण्यात, गणेश मंडळांना देणार भेटी

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजितदादा आज पुण्यातील गणेश मंडळांना भेटी देणार आहे. पाच मानाच्या गणपतीसह दगडूशेठ गणपतीचेही ते दर्शन घेणार आहेत. तर मनसे नेते अमित ठाकरे हे सुद्धा आज पुणे दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे आज सकाळी 11 वाजता हडपसर येथील हडपसर भाजी मंडई गणेश मंडळाला भेट देणार असून इतर गणेश मंडळांनाही भेट देणार आहेत.

  • 25 Sep 2023 07:20 AM (IST)

    Shivsena : त्या आमदारांचं काय होणार, आज सुनावणी; कुणाची बाजू वरचढ?

    शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पहिल्यांदा ही सुनावणी होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार असून त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आजच्या सुनावणीत काय होणार? कुणाची बाजू वरचढ राहणार हे आज स्पष्ट होणार आहे.

Published On - Sep 25,2023 7:17 AM

Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.