Maharashtra Rain Landslides LIVE | सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप, तरीही कृष्णेची पातळी 53 फुटावर

| Updated on: Jul 25, 2021 | 12:59 AM

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. कोल्हापूर सांगली साताऱ्यासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलंय...

Maharashtra Rain Landslides LIVE | सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप, तरीही कृष्णेची पातळी 53 फुटावर
rain

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. अशा तऱ्हेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे.

रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून काल भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला.

कुठे किती मृत्यू?

चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू तळीये, महाड – 40 मृतदेह हाती आंबेघर, सातारा – 13 जणांचा मृत्यू पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू

पोसरे, रत्नागिरी – 17 जणांचा मृत्यू

कणकवली – दिगवळे, सिंधुदुर्ग – 1 महिलेचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत 91 जणांचा मृत्यू

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Jul 2021 09:51 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप, तरीही कृष्णेची पातळी 53 फुटावर

    सांगली :

    जिल्ह्यासह कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातील पावसाची उघडीप

    मात्र कृष्णेची पातळी 53 फुटावर

    शहरातील स्टेशन चौक, गांव भाग, पटेल चौक या ठिकाणी पाणी आले आहे

  • 24 Jul 2021 08:41 PM (IST)

    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भुस्खलनामुळे 7 गावांचा संपर्क तुटला, परिस्थिती नियंत्रणात

    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भुस्खलनामुळे 7 गावांचा संपर्क तुटला,

    पुण्यात मदतकार्यासाठी कोलकाता या ठिकाणाहून एन डी आर एफची मदत मागवली,

    4 टिम कोलकातामधून पुण्याकडे रवाना,

    उद्या मदतकार्याला होणार सुरुवात,

    परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती

  • 24 Jul 2021 07:13 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूणच्या दौऱ्यावर, पूर परिस्थितीचा आढावा घेणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूणला जाणार, मुख्यमंत्री चिपळूणच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतील, चिपळूणमध्ये सध्या पाणी ओसरलं असलं तरी नुकसान प्रचंड झालं आहे. त्याच परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला जाणार आहे.

    मुख्यमंत्र्यांचा दौरा असा असेल :

    सकाळी 10 वाजता मुंबईहून निघणार

    11.30 वाजता चिपळूणमध्ये दाखल होणार

    आपत्तीग्रस्त चिपळूणची पाहाणी करणार

    जिल्हा प्रशासनाबरोबर आढावा बैठक

    चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाचा करणार पाहणी दौरा

    चिपळूणनंतर साताऱ्याला जाणार

  • 24 Jul 2021 05:51 PM (IST)

    मुसळधार पावसात मेंढपाळ जंगलात अडकला

    चंद्रपूर : जिल्ह्यातील देवाडा गावातील घटना, मुसळधार पावसात मेंढपाळ जंगलात अडकला, तब्बल दोन रात्र काढल्या जंगलात, भुकेपोटी शेळीच्या दुधावर भागवला काळ, मेंढ्या आणि बकऱ्यांना घेऊन जंगलात गेला होता ब्रम्हय्या उडतलवार, हिंमत न हारता धीराने गाठले गाव, 2 दिवस 50 ग्रामस्थ करत होते शोधाशोध

  • 24 Jul 2021 04:36 PM (IST)

    कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रात पावसाने घेतली उसंत, पंचगंगा नदीची पाणीपातळी दीड फुटांनी घटली

    कोल्हापूर :

    कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रात पावसाने घेतली उसंत

    कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा

    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही होतेय घट

    पंचगंगा नदीची पाणीपातळी 54 फूट 7 इंचावर

    सकाळ पासून पाणी दीड फुटांनी घटल

    सखल भागात साचलेले पाणी ओसरायला सुरुवात

  • 24 Jul 2021 04:10 PM (IST)

    मिरजेत कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून विषारी साप, नागरीक भयभीत

    सांगली : मिरजेत कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून विषारी साप येऊ लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

  • 24 Jul 2021 03:14 PM (IST)

    सिंधुदुर्गात भुईबावडा घाटात रस्त्याला मोठमोठ्या भेगा

    सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटात रस्त्याला पडल्या मोठ मोठ्या भेगा. कालपासून भेगा पडण्यास सुरवात, मात्र आज भेगा रुंदावल्या. घाट मार्ग खचण्याची शक्यता. घाटातील वाहतूक पूर्वीच बंद करण्यात आली होती. १२ तारखेपासून कोल्हापूरला जोडणारा करूळ घाट बंद असल्यामुळे भुईबावडा घाटातून वाहतूक वळविण्यात आली होती. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक झाल्याने रस्त्याला पडल्या भेगा. कोणत्याही क्षणी भूस्स्खलन होण्याची शक्यता.

  • 24 Jul 2021 02:51 PM (IST)

    सांगलीत पोल्ट्रीमध्ये पाणी शिरले, तब्बल 16 हजार कोंबड्या मृत्यूमुखी

    सांगली –

    वाळवा तालुक्यातील कामेरी येथे पोल्ट्री मध्ये पाणी शिरले

    यावेळी पोल्ट्री मधील तब्बल 16 हजार कोंबड्या मृत्यू मुखी पडल्या

  • 24 Jul 2021 02:50 PM (IST)

    सांगलीत सिटी हायस्कूल रोडवर पाणी, मनपा अधिकाऱ्यांचे ऑन स्पॉट मदतकार्य

    सांगली –

    शहरात सिटी हायस्कूल रोडवर आले पाणी,

    महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांची टीम दाखल,

    नागरिकांना बाहेर काढणेचे काम सुरू ,

    पाण्यात जाऊन महापालिका आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा अधिकाऱ्यांचे ऑन स्पॉट मदतकार्य

  • 24 Jul 2021 02:49 PM (IST)

    काळजी करु नका, सरकार मदत करेल, उद्धव ठाकरेंचे आश्वासन 

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी

    मदत कार्यात लष्काराची मदत मिळत आहे भविष्यात दुर्घटना घडू नये याची काळजी घेतली जाईल आवश्यक असेल तिथे नागरिकांचे स्थलांतर करणार जलआराखडा तयार केला जाईल काळजी करु नका, सरकार मदत करेल कागदपत्रं गहाण झालं असेल तर त्याचा विचार करु नका, उद्धव ठाकरेंचे आश्वासन

  • 24 Jul 2021 02:36 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी आर्मीचे जवान सज्ज, 65 जवानांची टीम दाखल

    कोल्हापूर :

    आर्मीचे एक युनिट कोल्हापूर जिल्ह्यात पाचारण

    65 जवानांची टीम कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ भागात काम करणार

    जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी आर्मीचे जवान सज्ज

    एनडीआरएफ जवानांच्या 4 टीम कोल्हापूरमध्ये आले आहेत

    कोल्हापूर विमानतळावर एनडीआरएफच्या आणखी एक टीम दाखल या टीम कोल्हापूर सांगली आणि पुणे जिल्ह्यासाठी असणार आहेत

    जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असली तरी खबरदारी म्हणून प्रशासनाची तयारी

  • 24 Jul 2021 02:26 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात दाखल,

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी

    रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, खासदार सुनील तटकरे, मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर उपस्थित

  • 24 Jul 2021 01:43 PM (IST)

    पुणे खडकवासला धरणातील विसर्ग कमी झाल्यावर भिडे पुलावरच पाणी ओसरले

    पुणे

    खडकवासला धरणातला विसर्ग कमी झाल्यावर भिडे पुलावरच पाणी ओसरले

    भिडे पुलावर जमा झालेला जलपर्णीचा ढिग पूर्णपणे बाजूला काढला

    पाणी ओसरल असलं तरी भिडे पुलावरील वाहतूक बंदच

    पुण्यात सकाळपासून पावसाची उघडीप

    पावसाने उघडीप दिल्यानंतर पडलं कडक ऊन

  • 24 Jul 2021 01:27 PM (IST)

    सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 59 फुटांवर, मिरज अर्जुनवाड रस्त्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला

    सांगली  –

    मिरज अर्जुनवाड रस्त्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला अर्जुन वाड पुलाला पाणी टेकले,

    तर मिरजेत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 59 फुटांवर,

  • 24 Jul 2021 12:32 PM (IST)

    सर्व ठिकाणी यंत्रणा पोहोचल्या, काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात : जयंत पाटील

    जयंत पाटील यांची प्रतिक्रिया –

    – सर्व ठिकाणी यंत्रणा पोहचल्या आहेत,

    – आज पाऊस थांबल्यामुळे संध्याकाळपर्यंत काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात येईल,

    – धरणांचा साठा आणि डीचार्ज यावर आमचं लक्ष आहे,

    – शरद पवार स्वता कालपासून लक्ष ठेवून आहेत,

    – विरोधक गैरसमज पसरवण्यासाठी आरोप करतायत, आता राजकारण करण्याची वेळ नसून मदत करण्याची वेळ आहे

    याठिकाणी पूरग्रस्त लोकांना रेस्क्यू करून ठेवण्यात आले आहे

    जेवणाचे पॅकेट देत आहेत

  • 24 Jul 2021 11:58 AM (IST)

    कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार, पुरामुळे 12 हजार कुटुंबातील 60 हजार जणांचे स्थलांतर

    कोल्हापूर :

    कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामूळे जवळपास 12 हजार कुटुंबातील 60 हजार जणांचे स्थलांतर

    कोल्हापूर परिसरातील पूर बाधित लोकांचं शाहू मार्केट यार्डच्या शाहू सभागृहात स्थलांतर

    जवळपास 250 लोकांचं सभागृहात स्थलांतर

    स्थलांतरित लोकांना महानगरपालिके कडून केली जेवण आणि नाश्त्याची सोय

    तर आरोग्य विभागाकडून लोकांची आरोग्य तपासणी

  • 24 Jul 2021 11:57 AM (IST)

    रायगड तळीये दुर्घटनेत 44 जणांचा मृत्यू, 53 बेपत्ता, सूत्रांची माहिती

    रायगड तळीये दुर्घटना

    आतापर्यंत पुरग्रस्त भागात 44 मृत्यू, 53 बेपत्ता, सूत्रांची माहिती

    शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत 32 मृतदेह बाहेर काढले आहेत, तर 52 बेपत्ता आहेत.

  • 24 Jul 2021 11:46 AM (IST)

    सांगलीकरांनो आणखी पाणी पातळी वाढणार, 10 हजार लोक स्थलांतर

    सांगलीकरांनो आणखी पाणी पातळी वाढणार.

    सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हा.

    महापालिका क्षेत्रातील 10 हजार लोक स्थलांतर.

    एनडीआरएफ टीम शहरात सज्ज, शहरात घेतला आढावा

  • 24 Jul 2021 11:43 AM (IST)

    सिंधुदुर्गात आणखी एक दुर्घटना, गोव्याला जाणाऱ्या रस्त्याचा डोंगर खचला

    सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गात आणखी एक दुर्घटना,निसर्गाचा प्रकोप सुरूच.

    बांदा नजीकच्या गोव्याला जाणाऱ्या गाळेल गावातील रस्त्यावर डोंगर खचला.

    रस्त्यावर २० ते २५ फूट मातीचा ढिगारा

    या मातीत दुचाकीस्वार दबला गेल्याची शक्यता

    त्यामुळे युद्धपातळीवर माती हटविण्याचे काम सुरू

    काल सकाळी साडे आठची घटना

    ओरिसाहून आलेल्या NDRF पथकाला केले पाचारण

    काहीच वेळात NDRF चे पथक दाखल होईल.

  • 24 Jul 2021 11:02 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दुर्घटनाग्रस्त गावाचा पाहणी दौरा, 12 वाजता विमानाने रवाना होणार

    मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील

  • 24 Jul 2021 10:46 AM (IST)

    कोल्हापुरातील महापुरात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना नागरी अन्नपुरवठा विभागाकडून मदत मिळणार – हसन मुश्रीफ

    कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या कुटुंबांना नागरी अन्नपुरवठा विभागाकडून मदत मिळणार – हसन मुश्रीफ

    मंत्री छगन भुजबळ आजच आदेश काढणार असल्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती

    जिल्ह्यातील बारा हजार कुटुंबातील जवळपास 60 हजार लोकांच झालय स्थलांतर

    स्थलांतरित कुटुंबांना शिधा मिळणार

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील महापूराची माहिती घेतली

  • 24 Jul 2021 10:44 AM (IST)

    सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम

    सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम….

    महाबळेश्वर पाटण कांदाटी खोरे पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस….

    मागील 24 तासात महाबळेश्वर मध्ये 321 mm पावसाची नोंद….

    कोयना पाणलोट क्षेत्रात 62,053 cusecs पाण्याची आवक

  • 24 Jul 2021 10:31 AM (IST)

    अमरावती विभागात सरासरी 130 टक्के पाऊस, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?

    – अमरावती विभागात सरासरी १३० % पाऊस – ९९१३.७५ हेक्टरवर नुकसान – अकोला जिल्ह्याला सर्वाधिक फटका – २१ ते २३जुले दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे झाले नुकसान – प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडून सरकारला सादर

    कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस १) बुलढाणा – ३५४.९ मिमी १२५.९%

    २) अकोला – ३४१.२ मिमी ११२.८%

    ३) वाशीम – ४९८.४ मिमी १४३.६%

    ४) अमरावती – ३९०.९ मिमी १११.२%

    ५) यवतमाळ – ५१०.६ मिमी १४५.८%

    कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान १. अकोला – ५ तालुके ६२०० हेक्टर २. वाशीम – ६ तालुके २६७१.८ हेक्टर ३. यवतमाळ – ५ तालुके ७८०.३० हेक्टर ४. अमरावती – ३ तालुके २६१.६० हेक्टर

  • 24 Jul 2021 10:30 AM (IST)

    गडचिरोली गोदावरी आणि प्राणीहिता नद्यांना पूर, नदीकाठाच्या गावांना अलर्ट

    गडचिरोली गोदावरी व प्राणीहिता नद्यांना पूर आलेला आहे

    तेलंगाना राज्यात असलेल्या मेडीगट्टा धरणाचे पाणी सतत सोडत असल्यामुळे प्राणहिता गोदावरी इंद्रावती या नद्यांच्या पाण्यात वाढ होऊन नद्यांना पूर आलेला आहे

    नदी काठावरील गावांना अलर्ट करण्यात आलेला आहे भामरागड सिरोंचा अहेरी अशा तीन तालुक्यातील नदी काठा गावांना अलर्ट करण्यात आला

    मेडीगट्टा धरणातून 85 पैकी सध्या 79 दरवाजे सोडण्यात आले असून या धरणातून 11,61,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे

    तीन दिवसानंतर गडचिरोली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे

  • 24 Jul 2021 09:48 AM (IST)

    अकोला जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका, अमरावतीत सरासरी 130 टक्के पाऊस

    अमरावती:

    – अमरावती विभागात सरासरी १३० % पाऊस – ९९१३.७५ हेक्टरवर नुकसान – अकोला जिल्ह्याला सर्वाधिक फटका – २१ ते २३ जुले दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे झाले नुकसान – प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडून सरकारला सादर

    कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस १) बुलढाणा – ३५४.९ मिमी १२५.९%

    २) अकोला – ३४१.२ मिमी ११२.८%

    ३) वाशीम – ४९८.४ मिमी १४३.६%

    ४) अमरावती – ३९०.९ मिमी १११.२%

    ५) यवतमाळ – ५१०.६ मिमी १४५.८%

    कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान १. अकोला – ५ तालुके ६२०० हेक्टर २. वाशीम – ६ तालुके २६७१.८ हेक्टर ३. यवतमाळ – ५ तालुके ७८०.३० हेक्टर ४. अमरावती – ३ तालुके २६१.६० हेक्टर

  • 24 Jul 2021 08:55 AM (IST)

    पुणे – बंगळुरु महामार्ग अजूनही बंद, 20 किमी वाहनाच्या रांगा

    – पुणे – बंगळुरु महामार्ग अजूनही बंद,

    – किनी टोलनाक्यापासून वाहतूक ठप्प,

    – काल संध्याकाळपासून वाहतूक बंद करण्यात आलीय,

    – यामध्ये दुधाचे टँकर, धान्याचे ट्रक अडकून पडले आहेत,

    – जवळपास 20 किमी वाहनाच्या रांगा

  • 24 Jul 2021 08:49 AM (IST)

    राज्यात ताम्हिणी घाटासह 13 ठिकाणी ढगफुटी, रडार यंत्रणा नसल्यानं पावसाचं मोजमाप अशक्य

    पुणे

    राज्यात ताम्हिणी घाटासह 13 ठिकाणी ढगफुटी

    ग्रामीण भागात रडार यंत्रणा नसल्यानं पावसाचं मोजमाप अशक्य,

    त्यामुळे राज्यात 13 ढगफुटी आय आय टीएम चे हवामानतज्ञ डॉ. किरणकुमार जोहरे यांचा दावा,

    ताम्हिणी घाटात 468 मी.मी पावसाची झाली नोंद,

    तर चिपळूण 400 आणि महाबळेश्वरमधे 480 मी.मी पावसाची नोंद …

    एका तासात 100 मी.मी पाऊस झाला तर त्याला जागतिक हवामान संघटनेच्या मापकानुसार ढगफुटी घोषित करण्यात येते,

  • 24 Jul 2021 08:47 AM (IST)

    पवना धरणात पावसाचा जोर ओसरला, 71.74 टक्के पाणीसाठा उपलब्ध

    मावळ,पुणे

    -पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात देखील पाऊसच जोर ओसरला

    -गेल्या चोवीस तासात 4.99 टक्के तर गेल्या 72 तासात एकूण 31.66 टक्के पाणी साठ्यात वाढ झालीये

    -सध्या धरणात 71.74 टक्के साठा उपलब्ध आहे

    -गेल्या वर्षी आजच्या तारखेला केवळ 34.96 टक्के साठा शिल्लक होता

    -गेल्या तीन दिवसात 579 मिमी पावसाची नोंद झाल्याने अशी सुखद परिस्थिती निर्माण झाली.

  • 24 Jul 2021 08:45 AM (IST)

    कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

    कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

    कोयना धरणाचे दरवाजे 10 फुटावर

    परिसरातील नागरिकांना दिलासा

  • 24 Jul 2021 08:45 AM (IST)

    लोणावळ्यात गेल्या 24 तासात 140 मिमी पावसाची नोंद

    लोणावळा

    -लोणावळ्यात गेल्या 24 तासात 140 मिमी पावसाची नोंद झाली

    -तर गेल्या 72 तासात 852 मिमी पाऊस कोसळला

    -परिणामी लोणावळा शहर आणि परिसरातुन वाहणारी इंद्रायणी नदी पात्र सोडून वाहत होती

    -काही ठिकाणी सखल भागात पाणी ही साचले होते

    – काल पासून पाऊसाचा जोर कमी

  • 24 Jul 2021 08:23 AM (IST)

    पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग 24 तास सुरु राहणार

    पुणे

    राज्यातील पुरपरिस्थिती पाहता पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग 24 तास सुरू,

    24 तास कर्मचारी करणार विभागात काम,

    आपत्ती व्यवस्थापन विभागाला अलर्ट राहण्याच्या महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार यांच्या सूचना,

    ग्रामीण भागाबरोबरचं शहरात पावसाचा जोर,

    आपत्कालीन यंत्रणा सज्ज, महापालिका अलर्ट मोडवर,

    सध्या तरी शहरात कोणत्या भागात घरात पाणी शिरल्याची घटना घडली नसल्याचा महापालिकेचा दावा …

  • 24 Jul 2021 08:03 AM (IST)

    भुसावळच्या हातनूर धरणाचे 41 दरवाजे सलग दुसऱ्या दिवशीही उघडेच

    भुसावळच्या हातनूर धरणाचे आज सलग दुसऱ्या दिवशीही 41 दरवाजे उघडेच…

    धरणातून 89488 क्युसेस प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू तापी नदीत होत आहे

  • 24 Jul 2021 08:02 AM (IST)

    पुण्यात पावसाची विश्रांती, भिडे पुलावरील वाहतूक बंद

    पुणे

    पुण्यात पावसाची विश्रांती

    खडकवासला धरणातून होणारा विसर्ग केला कमी

    भिडे पूल पाण्याखाली, भिडे पुलावरील वाहतुक बंद

    नदीपात्रातून जाणारे रस्तेही वाहतुकीसाठी बंद

  • 24 Jul 2021 08:00 AM (IST)

    नाशिक शहर आणि जिल्ह्यात पावसाची विश्रांती, पाणी कपातीचं संकट टळण्याची शक्यता

    नाशिक – शहर आणि जिल्ह्यात पावसाची विश्रांती..

    मध्यरात्री पासून पावसाने घेतली उसंत..

    गंगापूर धरण समूहात पाणीसाठा वाढला..

    शहरावरच पाणी कपातीचं संकट टळण्याची शक्यता..

    पाणी कपात रद्दचा निर्णय येत्या दोन दिवसात अपेक्षित

  • 24 Jul 2021 07:31 AM (IST)

    महाबळेश्वरच्या इतिहासात प्रथमच 24 तासात 594 मिमी पावसाची नोंद

    सातारा — महाबळेश्वरच्या इतिहासात प्रथमच 24 तासात 594 मिलिमीटर पावसाची नोंद

    पावसामुळे धावरी गावातील दरड कोसळून अंकुश मारुती सपकाळ या तरुणाचा मृत्यू

    महाबळेश्वर तालुक्यातील 28 पेक्षा अधिक गावांमध्ये दरड ,झाडे  ,खांब पडून मोठ्या प्रमाणात नुकसान

    75 पेक्षा अधिक गावाचा संपर्क तुटला

  • 24 Jul 2021 07:24 AM (IST)

    साताऱ्यातील कोयना धरणातून 54541 क्यूसेसने विसर्ग सुरू

    सातारा – कोयना धरणातून 54541 क्यूसेसने  विसर्ग सुरू

    धोम प्रकल्पातून 8711क्यूसेसने विसर्ग सुरू

    कणेर प्रकल्पातून 7219 विसर्ग

    उरमोडी प्रकल्पातून 5 हजार 934 क्यूसेसने विसर्ग

    तारळी धरणातून 12 हजार 255 क्यूसेसने विसर्ग सुरू

    बलकवडी प्रकल्पातून 4 हजार 619 क्यूसेसने विसर्ग सुरू

    (संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आकडेवारी)

  • 24 Jul 2021 07:21 AM (IST)

    कोयना नदी परिसरात पावसाचा जोर कायम, मोरगिरी पूल पाण्याखाली

    कोयना नदीवरील मोरगिरी पुल पाण्याखाली

    मोरणा विभागाचा संपर्क तुटला

    आंबेघर कडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली

  • 24 Jul 2021 07:19 AM (IST)

    साताऱ्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु

    साताऱ्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु

    पावसाचा वेग वाढला

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 24 Jul 2021 07:06 AM (IST)

    कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगा नदीची पाणीपातळी 56 फुटांवर

    कोल्हापूर:

    पंचगंगा नदीन केला पाणी पातळीचा नवा विक्रम

    नदीची पाणीपातळी पोहोचली 56 फुटांवर

    2019 चा महापूर वेळी पाणी पातळी गेली होती 55 फूट सहा इंचांपर्यंत

    यावर्षी आणखी पातळी वाढली

    शहर आणि परिसरात पावसाची उसंत

    धरण क्षेत्रात ही जोर ओसरला काहीसा दिलासा

  • 24 Jul 2021 07:02 AM (IST)

    मुंबईत पावसाची विश्रांती, काही ठिकाणी ढगाळ वातावरण

    मुंबईत पावसाची विश्रांती मुंबईच्या पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरात सध्या तरी पाऊस नाही काही ठिकाणी ढगाळ वातावरण हवामान विभागाच्या माहितीनुसार रायगड घाट परिसर, पुणे आणि सातारा या ठिकाणी तीव्र ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

Published On - Jul 24,2021 6:51 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.