Maharashtra Breaking News Live : इचलकरंजीत आनंदा मस्के या दुकानदारावर अज्ञात युवकांचा चाकू हल्ला
Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : ठाकरे गटाकडून आज ठाण्यात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. एका तरुणीला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा पोलीस आयुक्तालयावर काढण्यात येणार आहे. नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकेट वाढले. दर शनिवारी पाणीपुरवठा बंद करण्याचे संकेत. दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस. जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल. गुलाल खोबऱ्याची उधळण आणि भाजप नेते नारायण राणे यांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना राणे देणार उत्तर. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
चांदीचा भाव गगनाला, यापूर्वीचे रेकॉर्ड इतिहासजमा
2 फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चांदीच्या किंमतीत वाढ
गुंतवणूकदारांची झाली चांदीच चांदी
जानेवारी ते मार्च महिन्यात सोन्यापेक्षा अधिक दिला होता परतावा
गुडरिटर्न्सचा काय आहे दावा, किती वाढले चांदीचे दाम, वाचा सविस्तर
-
कोर चोरीची आता नाही भीती
कार चोरीची बिलकूल करु नका चिंता
चोरट्यांचा आता लागेल लगेच थांगपत्ता
तुमची कारही झटपट शोधून काढणार
केंद्र सरकारचा काय आहे प्लॅन, वाचा बातमी
-
-
आम्हाला निवडून द्या, तुम्हाला छळमुक्त करणार- आदित्य ठाकरे
हिंमत असेल तर समोरून वार करा- आदित्य ठाकरे
‘माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे’
सामने आओ, तुम्हे तुम्हारा नाम भुला देंगे- आदित्य ठाकरेंचं आव्हान
प्रत्येक जिल्ह्यात नारी सन्मान यात्रा निघाली पाहिजे- आदित्य ठाकरे
-
ठाणे आयुक्तालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात..
महाविकास आघाडीचे नेते ठाणे पोलीस आयुक्त यांची घेणार भेट..
या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलीस बंदोबस्त तैनात..
जन प्रकशोभ मोर्चा माध्यमातून आयुक्तालय या ठोकण्यात येणार ठाळे…
-
आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल
ठाण्यातील महामोर्चात आदित्य ठाकरेंचं भाषण
अशा लोकांना पुन्हा कधी येऊ द्यायचं नाही- आदित्य ठाकरे
-
-
चोरांचा पक्ष नसतो टोळी असते- आदित्य ठाकरे
मिंधेंच्या लोकांनी महिलेला लाथा मारल्या, फक्त एका पोस्टसाठी- आदित्य ठाकरे
राज्यात मोगलाई सुरू- आदित्य ठाकरे
हे सरकार काही तासांचं आहे- आदित्य ठाकरे
-
रोशनी शिंदे आई होऊ नये म्हणून पोटावर मारलं- जितेंद्र आव्हाड
एका स्त्रिला आई होण्यापासून रोखणं हे जगातलं सर्वात मोठं पाप- आव्हाड
रोशनी शिंदेंच्या पोस्टमध्ये आक्षेपार्ह काही नाही- जितेंद्र आव्हाड
रोशनीच्या वर्षभरातल्या सगळ्या पोस्ट मी वाचल्या- आव्हाड
-
रोशनी शिंदे यांना अटक करण्यासाठी लिलावती रुग्णालयाबाहेर पोलीस- राजन विचारे
-
२०१६ पासून घरात घुसलेली बाई त्यावर बंदोबस्त करा- सुषमा अंधारे यांचा गृहमंत्र्यांना इशारा
अगर आप काडतूस है.. तर ठाकरे बाणा ही तोफ आहे- सुषमा अंधारे
इथला प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करून नेत्यासाठी तयार आहे- अंधारे
-
बावनकुळे साहेब, हिंमत असेल तर 48 तासात मातोश्रीत या- सुषमा अंधारे यांचं चॅलेंज
लढणं आम्हालाही कळतं- सुषमा अंधारे
बावनकुळे भाऊ, तुमची एवढी ताकद असेल तर तर २०१९ मध्ये फडणवीसांनी तिकिट का कापलं?
ठाण्यात महाविकास आघाडीच्या महामोर्चात सुषमा अंधारे यांचं जोरदार भाषण
-
तुमचा फडतूस आमदार वाईट बोलतो, त्याविरोधात तक्रार का घेतली नाही?- अंधारे
रोशनी शिंदेची तक्रार घेतली नाहीच, तिच्यावरच गुन्हे दाखल केले गेले- सुषमा अंधारे
-
ठाण्याच्या महामोर्चात सुषमा अंधारे यांचे सरकारला सवाल
रोशनी शिंदे यांनी माफीचा व्हिडिओ करूनही तिच्या पोटात लाथा बुक्क्या मारल्या- अंधारे
एखादी महिला गरोदर नाही तर तिला मारहाण करण्याची परवानगी मिळते का?
उद्धव ठाकरे भेटीसाठी गेल्यानंतर पोलीस आयुक्त गायब होतात, पीआय दिसत नाहीत, आम्ही कुणाकडे दाद मागायची?- अंधारे
-
कच्चा तेलाचा भडका, प्रत्येक देशात महागाईचा बॉम्ब
कच्चा तेलाचे भाव वाढीची कारणे काय
उत्पादन घटविण्याचा ओपेक संघटनेचा निर्णय
निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वधारणार
रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्तातील इंधनावर काय होईल परिणाम, वाचा इन डेप्थ स्टोरी
-
ठाण्यात मोर्चेकऱ्यांकडून आनंद दीघे यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात पोलिस आणि सरकारविरोधात महाविकास आघाडीचा मोर्चा
तलावपाळी ते पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा
महाविकास आघाडीचे नेते जनसभेला संबोधित करणार
-
ठाण्यात गुंडागर्दीचं वातावरण- सुषमा अंधारे
मुख्यमंत्री सूडबुद्धीचं राजकारण करतात- अंधारे
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पदाचं अवमूल्यन करू नये- अंधारे
ठाण्यातल्या जनप्रक्षोभ मोर्चात सुषमा अंधारे यांचा सहभाग
-
ठाण्यात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा शक्तिस्थळाकडे रवाना
रोशनी शिंदे यांच्या मारहाणीविरोधात शिवसेना आक्रमक
महामोर्चात जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, सुषमा अंधारे, विनायक राऊत यांचाही समावेश
ठाणे येथील शक्तिस्थळाकडे मोर्चा निघाला
शिंदे सरकार आणि ठाणे पोलीस आयुक्तांविरोधात महाविकास आघाडीचा मोर्चा
-
ठाण्यात महाविकास आघाडीचा महामोर्चा
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात टाळं ठोका मोर्चा
ठाणे पोलीसांच्या निषेधात उबाठा शिवसैनिक रस्त्यावर
ठाणे पोलीस आयुक्तालयाला टाळं ठोकणार आंदोलक
-
राज्यात जवळपास ८०० शाळा बोगस
राज्यात जवळपास ८०० शाळा बोगस
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची माहिती
शिक्षण विभागाच्या तपासणीत अनेक शाळांची कागदपत्रे आढळली बोगस
१०० हून अधिक शाळांवर शिक्षण विभागाची कारवाई
पालकांनी प्रवेश घेताना शाळा अधिकृत आल्याची पडताळणी करा
शिक्षण आयुक्तांचे पालकांना आवाहन
-
Pune – पुणे शहरात दुपारपासून ढगाळ वातावरण
शहरात हलक्या पावसाची शक्यता
पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा
काही भागात हलक्या सरी पडायला सुरुवात
-
औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याला याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात विरोध
उच्च न्यायालयात खटला असल्याने यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने केलं स्पष्ट
शहरांची, रस्त्यांची नावं बदलणं हे निवडून आलेल्या सरकारचं काम- सर्वोच्च न्यायालय
-
हनुमान जयंती निमित्त केंद्रीय गृह खात्याने जारी केल्या सूचना
नवी दिल्ली : कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती नीट ठेवण्याची खबरदारी घ्यावी,
सामाजिक शांतता भंग करणाऱ्या तत्व लक्ष ठेवावे खबरदारी घ्यावी,
देशातील सर्व राज्यांना सूचना.
-
नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 28 एप्रिलला मतदान
3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती
आज नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली
त्यात 217 नामनिर्देशन पत्रापैकी 14 नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरले असून 203 नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत
निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी दिली माहिती
-
निफाड तालुक्यातील थकबाकीदार शेतकरी आक्रमक
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्तीच्या कर्ज वसुली विरोधात जोरदार घोषणाबाजी
उपबाजारावर निफाड ते तहसील कार्यालयापर्यंत काढला मोर्चा
दोन किलोमीटर तप्त उन्हामध्ये मोर्चा काढून सक्तीच्या कर्ज वसुली विरोधात जोरदार घोषणाबाजी
निफाड तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करते शेतकऱ्यांचा धरणे आंदोलन सुरु
शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास उद्यापासून धरणे आंदोलनाची रूपांतर आमरण उपोषणात
-
सावरकर गौरव यात्रा नसून महाराष्ट्रात शिवद्रोही गौरव यात्रा – संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड
छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी बदनामी केली- संतोष शिंदे
-
पुण्यात आता हप्त्यावर आंबा EMI करा अन् आंब्याची पेटी घेऊन जा!
पुण्यातील अंबा विक्रेता व्यवसायिकाची भन्नाट कल्पना
पुण्यातील गौरव सणस या अवलियाने आंबा चक्क EMI वर विकायला सुरुवात केली आहे
सामान्य माणूस महागडे आंबे खरेदी करु शकत नाही, त्यामुळे ही कल्पना एका गौरवने पुढे आणली आहे
तुम्ही आंबे खरेदी केल्यानंतर तुमच्या पूर्ण रकमेचे हप्ते पाडून तुम्ही तुमच्या आंब्याची पेमेंट पूर्ण करू शकता
-
नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम आणि पोस्टकार्ड अभियान आंदोलन
नाशिक शहर युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आली मोहीम
नाशिकच्या कॉलेज रोडवरील भोसला सर्कल येथे मोहीम
युवक काँग्रेस पाठवणार पाच हजार पोस्टकार्ड
महागाई, बेरोजगारी या विषयांवर पाठवणार मोदींना पत्र
-
हनुमान जयंतीला नवनीत राणांचा वाढदिवस येणं हा चमत्कार- रवी राणा
आमदार रवी राणा यांची अजब प्रतिक्रीया
नवनीत राणा यांच्यावर हनुमानाचा आशीर्वाद- आमदार रवी राणा
असा योग जुळून येणे म्हणजे बजरंगबलीची विशेष कृपा- आमदार रवी राणा
-
हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दुपारनंतर निर्णयाची शक्यता
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल न लागल्यास पुढची तारीख दिली जाणार
निकाल लागेपर्यंत हसन मुश्रीफ यांना अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी
-
नागपुरात महाविकास आघाडीच्या होणाऱ्या वज्रमूठ सभेला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध
16 तारखेला दर्शन कॉलोनी मैदानात होणार वज्रमूठ सभा
उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीतील नेते राहणार उपस्थित
भर वस्तीत आणि खेळाचे मैदान असल्याने स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा आणि खेळाडूंचा विरोध
विद्यार्थ्यांच्या परीक्षा, मैदानात होणारे खड्डे आणि वाहतुकीचा प्रश्न उदभवणार असल्याने विरोध
सभेला परवानगी देऊ नये यासाठी भाजप चे स्थानिक पदाधिकारी एनआयटीला पत्र देणार
एनआयटीने महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी दिलीय
-
महाविकास आघाडीची 16 एप्रिलला नागपुरात सभा
नागपुरातील दर्शन कॉलोनी मैदानात वज्रमुठ सभा
सभेला स्थानिक खेळाडू, भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध
सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी करणार, महाविकास आघाडी मात्र सभा घेण्यावर ठाम
-
कोल्हापुरातील कलेक्टर कार्यालयावर जप्तीची वेळ
कोल्हापुरातील कलेक्टर कार्यालयावर जप्तीची वेळ
कुरुंदवाड मधील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा वाद
कुरुंदवाड मधील वसंत संकपाळ यांची रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती जमीन
जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने 1984 पासून चालू होता खटला
-
गेल्या नऊ महिन्यात आपल्या राज्यामध्ये कलाकारांची कमी राहिली नाही
पुणे : फडणीस यांनी केलेल्या ट्विट वरून रोहित पवारांची टीका,
पक्ष फोडण्यात कलाकार कोण होतं हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितल आहे,
नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवारांची टिका,
भाजप खालच्या लेवलचं राजकारण करत आहे,
भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीला तडा आणत आहे,
रोहित पवारांच भाजपवर शर संधान.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताच नैतिक अधिकार नाही- रवी राणा
जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच त्यांनी तो नैतिक अधिकार गमावला- रवी राणा
पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान काम केलं- राणा यांची टीका
उद्धव ठाकरे अडीच वर्ष मातोश्री मधील लपून बसले होते स्वतःच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडलं होता.
-
जगातील श्रीमंतांच्या यादीत कोणाचा लागला नंबर
मुकेश अंबानी आशियातील पहिल्या क्रमांकावर
जगातील इतक्या उद्योजकांना टाकले मागे
मग या यादीत गौतम अदानी यांचा क्रमांक कितवा
हिंडनबर्ग अहवालाने अदानी समूहाचे नुकसान, वाचा बातमी
-
रोहित पवार याची भाजपवर टीका
सावरकर गौरव यात्रेला आमचा विरोध नाही. पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले असतील यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर त्यांची गौरव यात्रा का काढली नाही, असा सवाल रोहित पवार यांनी भाजप व शिंदे गटाला विचारला आहे.
-
महिलेला झालेल्या मारहाणीवरून देवेंद्र फडणवीसांना राजीनामा मागणे चुकीचे- उमेश पाटील
उद्धव ठाकरे यांचा दुतोंडीपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही- भाजपा खासदार उमेश पाटील
साधू संतांना मारहाण होत असताना तुम्ही गप्प का होता? उमेश पाटील
कोरोना काळात रस्त्यावर न उतरता उध्दव ठाकरे घरात होते – उमेश पाटील
-
रोहित पवारांचं भाजपवर शरसंधान
गेल्या नऊ महिन्यात आपल्या राज्यामध्ये कलाकारांची कमी राहिली नाही
फडणीस यांनी केलेल्या ट्विटवरून रोहित पवारांची टीका
पक्ष फोडण्यात कलाकार कोण होतं हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे
नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवारांची टिका
भाजप खालच्या लेवलच राजकारण करत आहे
भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीला तडा आणत आहे
रोहित पवारांचं भाजपवर शरसंधान
-
नवी दिल्ली | संसदेच्या अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस
तिरंगी झेंड्यासह विरोधी पक्ष लाँग मार्च काढणार
संसदेपासून विजय चौकापर्यंत लॉंग मार्च
कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणार विरोधी पक्षाची पत्रकार परिषद
-
नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला झटका
केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली लोकांना हक्क नाकारत आहे
केंद्राचा पवित्रा कायद्याच्या राज्यासाठी असंगत- सुप्रीम कोर्ट
मिडीया वन या मल्याळम चॅनेलला लायसन्स पुन्हा बहाल
-
आम्ही झुका म्हंटलेलं नाही- संजय राऊत
डॉक्टर मिंधेंच्या टोळीतील गुंडांकडून रोशनी शिंदेंवर हल्ला- संजय राऊत
सरकारमधील सगळे मि. झुके- संजय राऊत यांचा शाब्दिक हल्ला
फडतूसचा अर्थ नागपूरात वेगळा निघत असेल- संजय राऊत
-
रेखा झुनझुनवाला यांनी कमाईत रचला इतिहास
रेखा झुनझनवाला यांची महिन्याची कमाई किती
अनेक दिग्गज समूहाचे शेअर्स पोर्टफोलिओत
या शेअर्समधून महिन्याकाठी होते मोठी कमाई
या दोन शेअर्समधून तर घेतली कोटीची उड्डाणे, वाचा सविस्तर
-
ठाण्यात वेगवान घडामोडी, रोशनी शिंदे लिलावती रुग्णालयात
रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात हलवलं
ठाण्यात शिवसेनेच्या मोर्चाला परवानगी मिळाली
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा भव्य मोर्चा
रोशनी शिंदे मारहाणीवरून शिवसेना संतप्त, पोलीस आय़ुक्तालयावर मोर्चा नेणार
-
नागपुरात दोन खून
नागपुरात एकाच रात्री खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील यशोधरा नगर आणि पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे खून झाले आहेत
-
9 तारखेला पुण्यात राष्ट्रवादीचा मेळावा
पुण्यात 9 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा
मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार लावणार हजेरी
माजी सैनिक सेलच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप कार्यक्रम
वानवडीच्या महात्मा फुले सांस्कृतिक भवनात होणार मेळावा
-
500 रुपये घेऊन उत्तरपत्रिका लिहायला देणाऱ्या कॉलेजची केली जाणार चौकशी
परीक्षा केंद्राच्या चौकशीसाठी वरिष्ठ प्राध्यापकांच्या तीन सदस्यीय समिती स्थापन
500 रुपये घेऊन उत्तरपत्रिका लिहायला देणाऱ्या कॉलेजची केली जाणार चौकशी
24 तासात समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश
प्राचार्यांना दिली जाणार कारणे दाखवा नोटीस
प्रसंगी गुन्हा दाखल करण्याचा प्राचार्यांचा इशारा
-
केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसची संयुक्त कारवाई
रत्नागिरी केरळमधील कोझिकोडी ट्रेन जळीत प्रकरणात मुख्य आरोपीला रत्नागिरीतून अटक
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या
केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसची संयुक्त कारवाई
लवकरच संबंधित यंत्रणा आरोपीचा ताबा (Custidy) घेणार
केरळ पोलीस देखील रत्नागिरीत दाखल
आरोपीचे नाव शाहरुख सैफ
नाट्यमयरित्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर अटकेची कारवाई
-
मोठ्या समूहावर कर्जाचा डोंगर
अनेक दिग्गज कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली
कोट्यवधींच्या कर्जामुळे अनेक योजना रखडल्या
केवळ गौतम अदानीच नाही तर देशातील इतरांवरही कर्ज
भारतातील मोठ्या उद्योजकांचे पण हात दगडाखाली, वाचा सविस्तर
-
काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी
पुणे : गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी,
व्हॉटस् अप मेसेज करत दिली धमकी,
याप्रकरणी समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
-
आज चांदी सर्व रेकॉर्ड मोडणार
2 फेब्रुवारी रोजी होता 74,700 रुपये प्रति किलोचा भाव
आज चांदी रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत
सोन्याची भावात मोठी झेप, किंमतीत झाली वाढ
सकाळच्या सत्रात दोन्ही धातूमध्ये मोठी वाढ, वाचा सविस्तर
-
कच्चे तेल तुमचे गणित बिघडवणार
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भडका
तीन महिन्यानंतर भावात जोरदार उसळी
पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच जाहीर केले भाव
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत काय, वाचा सविस्तर
-
हसन मुश्नीफ प्रकरणात ईडीनं चंद्रकांत गायकवाडांची आज इडी चौकशी
संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज साखर कारखान्या संदर्भात झालेल्या गैर व्यवहार प्रकरणी होणार गायकवाड यांची चौकशी
चंद्रकांत गायकवाड हे हसन मुश्रीफ यांचे व्यवसायिक भागीदार
-
गोमूत्रांचे टँकर मागवून ठेवा, तुटवडा पडण्याची शक्यता- अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगरातील सभेनंतर भाजपने गोमूत्र शिंपडले
उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर शिवसेना नेते आक्रमक
उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरणार, नंतर गोमूत्र शिंपडत बसा- अंबादास दानवे यांचं प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप आरोप प्रत्यारोप सुरूच
-
अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात तुफान दगडफेक, 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल
एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल, 10 ते 12 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दगडफेकीत चार ते पाचजण जखमी, जखमी तरुण नगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल
छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगर येथे घडली घटना
दगडफेकीत दोन मोटरसायकलसह एका स्विफ्ट कारच मोठ्या प्रमाणात नुकसान
मुकुंद नगर परिसरात देखील झाली दगडफेक
शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त
अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता राखण्याच पोलिसांचं आवाहन
-
अंबरनाथच्या कचऱ्याचा वाद पेटण्याची चिन्हं
चिखलोलीत कचरा न टाकण्याचे हरित लवादाचे आदेश
बदलापूरच्या डम्पिंगला कचरा टाकण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
तर बदलापूरकरांचा अंबरनाथच्या कचऱ्याला विरोध
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नागपुरातील रामायण केंद्राचे उद्घाटन
27 एप्रिलला पंतप्रधान नागपुरात येण्याची शक्यता
पंतप्रधानांच्या हस्ते होणार रामायण सेंटरचं उद्घाटन
कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरात भव्य रामायण सेंटर उभारण्यात आलंय
108 चित्रांच्या माध्यमातून संपूर्ण रामायण एका छताखाली, घडणार सचित्रं रामायणाचं दर्शन
राजमहालाप्रमाणे रामायण केंद्राची सजावट, कोराडी महालक्ष्मी मंदिर अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रयत्नांना यश
-
नागपूरात निवृत्त सेनाधिकाऱ्याचे हातपाय बांधून 32 लाखांची लुट
नागपूरच्या इंद्रप्रस्थ ले-आऊटमधील घटना
82 वर्षीय सुरेश सदानंद पोटदुखे हे घरी एकटे असताना पहाटे 4 वाजता ग्रीलच्या दाराचे लॉक तोडून चोरटे घरात घुसले
मुलगा आणि पत्नी अमेरिकेला गेल्यामुळे सुरेश पोटदुखे घरी एकटेच होते
चोरट्यांनी पोटदुखे यांची हातपाय बांधत त्यांच्यावर केले चाकूने वार
25 लाख रोख, 15 तोळे सोन्याचे दागिने आणि दोन किलो चांदीचे दागिने असा एकूण 32 लाखांचा मुद्देमाल चोरला
नागपूरात गुन्हेगारांना पोलिसांचे भय उरले नाही
-
पुण्यात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार, पोलिसांची मोठी कारवाई, चौघांना अटक
घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरणाऱ्या चार आरोपींना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
घरगुती वापराच्या सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या काढून व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरण्याचा धक्कादायक प्रकार उघड
पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुकमध्ये चालायचं मोठे रॅकेट
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारं रॅकेट उघडकीस
चार आरोपींना अटक तर 114 गॅस सिलेंडर पुणे पोलिसांकडून जप्त
-
ठाकरे गटाचा आज ठाण्यात महामोर्चा, पोलीस आयुक्तालयावर मोर्चा निघणार
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीला मारहाण झाल्यानंतर आज पोलीस आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे
हा मोर्चा आज उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला असून याला काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे.
आज दुपारी 3 वाजता हा मोर्चा ठाण्यातील तलावपाळी येथील शिवाजी मैदान येथे सुरू होऊन पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे
या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे
यावेळी पोलीस आयुक्तालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येणार आहे
Published On - Apr 05,2023 8:14 AM