Maharashtra Live Updates : महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचा शनिवारी शपथविधी
Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू राहणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय युक्तिवाद केले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज त्रिपुरा विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्रिपुरातील विधानसभेच्या 60 जागांसाठी 259 उमेदवार उभे आहेत. बीबीसीच्या कार्यालयावरील छापे मारू सुरूच. कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे बीबीसीच्या सूचना. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवन परिवारातर्फे हृद्य निरोप
मुंबई :
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी (दि. १६) राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संताष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला.
राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला.
शुक्रवार दिनांक १७ रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.
-
महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचा शनिवारी शपथविधी
मुंबई :
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता राजभवनात दरबार हॉल येथे होणार आहे.
-
-
हिंडनबर्गचा वार खोलवर
अदानी समूहातील शेअरची पडझड थांबेना
काही शेअर 80 टक्क्यांपर्यंत घसरले
शेअर ओव्हरव्हॅल्यू असल्याचा अहवालात दावा
परदेशी गुंतवणूकदारांनीही घेतला आखडता हात
बाजारात सुचीबद्ध सात कंपन्यांवर गंभीर आरोप, वाचा बातमी
-
टाटा समूहाच्या या शेअरने केले मालामाल
रेखा झुनझुनवाला यांना हजार कोटींचा फायदा
या कंपनीचा शेअर केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सूसाट
दोन आठवड्यात कंपनीचा शेअर 225 रुपयांनी वधारला
कंपनीचा शेअर अजून रॉकेट भरारी घेण्याची शक्यता
या लिंकवर वाचा बातमी : Rekha Jhunjhunwala : या शेअरमुळे हजार कोटींची कमाई! राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नीला मोठा फायदा
-
Air India ची मेगा डील
एअरबस आणि बोईंगला दिली मोठी ऑर्डर
आता होतील आणखी मोठे बदल
कंपनीने दिली 840 विमानांची ऑर्डर
जागतिक दर्जाची विमान कंपनी करण्याचा मानस, वाचा सविस्तर
-
-
आजही बीबीसीचे सर्वेक्षण सुरुच
आयकर अधिकारी बीबीसी कार्यालयात तळ ठोकून
बीबीसीवरली कारवाईचा अर्थ तरी काय
धाड, सर्वेक्षण की शोध, यापैकी कोणती कारवाई
या शब्दांचा अर्थ काय, प्राप्तिकर खाते केव्हा करते वापर, वाचा बातमी
-
शिर्डीसह साई भक्तांसाठी आनंदाची बातमी
शिर्डी : शिर्डीत नाईट लँडिंगची परवानगी देण्यात आली,
त्यामुळे काकड आरतीची इच्छाही पूर्ण होऊ शकेल,
देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश.
-
जालना
आंबदास दानवे यांचा बंजारा महिलांसोबत लेंगी डान्स
जालना तालुक्यातील मानेगाव तांडा येथे संत सेवालाल महाराज जयंती निमित्त कार्यक्रमात केला डान्स
-
अंबरनाथ
मुख्यमंत्र्यांच्या सभेत पाकीटमारांचा सुळसुळाट!
राजकीय कार्यकर्त्यांसह पत्रकारांचीही पाकीटं मारली!
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल
-
अंबरनाथ
अंबरनाथमध्ये बापानेच केली मुलाची गळा चिरून हत्या
मृतदेह नाल्यात फेकत असताना नागरिकांनी पकडलं
पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करत बेड्या
-
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा महत्त्वाचा निर्णय
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान रात्रभर राहणार खुले
18 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 पासून, 19 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर राहणार खुले
गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरता गर्भ ग्रह दर्शन राहील बंद
महाशिवरात्रीनिमित्त मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात येणार
-
Pune Live- कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वारगेट पोलिसांना आढळली पाच ते सहा लाखांची रोकड
– स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये निवडणूक अधिकारी करत आहेत चौकशी
– पोलिसांनी चौकशी केली सुरुवात,
– गाडी चालकाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने निवडणुकीसाठीच कॅश आणली असल्याचा संशय
-
सासऱ्याला जाळणारा आरोपी अटकेत
गोंदिया जिल्ह्यात किशोर शेंडे याने सासऱ्यावर पेट्रोल टाकून जाळले
पत्नी आरती व मुलगा जयवरही पेट्रोल टाकून त्यांना जाळले
सासरे देवानंद मेश्राम यांचा मृत्यू झाला
पत्नी आणि मुलावर रुग्णालयात उपचार सुरू
आरोपी किशोर शेंडे याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-
VIDEO : दक्षिण आफ्रिकेत महिला टीम इंडियासमोर घडली काळीज हेलावून सोडणारी घटना
भारतीय महिला टीमच्या खेळाडूंवर चिंता स्पष्ट दिसत होती. वाचा सविस्तर….
-
IND vs AUS Test : दोन मोठ्या कारणांमुळे शेवटच्या क्षणी टीम इंडियाच दिल्लीतील हॉटेल बदललं
IND vs AUS Test : टीम इंडिया आधी दिल्लीत कुठल्या हॉटेलमध्ये थांबायची? आता कुठल्या हॉटेलमध्ये थांबलीय? वाचा सविस्तर….
-
Urvashi rautela ने पाकिस्तानी क्रिकेटरला दिल्या बर्थ डे च्या शुभेच्छा, समोरुन आलं खूपच प्रेमळ उत्तर
नसीम शाहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन टीममधील सहकारी शादाब खानला निकाहच्या शुभेच्छा दिल्या. वाचा सविस्तर….
-
joe root : कॉन्फिडन्स नसेल, तर असा शॉट खेळूच नये, बघा जो रुटच काय झालं VIDEO
जो रुटच अशा प्रकारे OUT होणं सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलय. वाचा सविस्तर…
-
Prithvi Shaw : मुंबईत पृथ्वी शॉ बसलेल्या गाडीवर हल्ला, नेमकं काय घडलं?
कधी आणि कुठे झालं हे? त्यावेळी पृथ्वी शॉ सोबत कोण होतं? वाचा सविस्तर….
-
दिल्ली हज कमिटीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी
भाजप उमेदवार कौसर जहाँ ठरले विजयी
-
‘कांतारा’ चित्रपटातील ‘वराहरुपम’ गाण्याच्या कॉपीराइट्सचा वाद
प्रसिद्ध मल्याळम अभिनेता, निर्माता पृथ्वीराज सुकुमारनविरुद्धच्या FIR ला स्थगिती
केरळ उच्च न्यायालयाची स्थगिती
पृथ्वीराज केरळमध्ये ‘कांतारा’ता चित्रपटाचा वितरक
-
Entertainment News Live | शाहरुखचा ‘पठाण’ ठरला मोठा विक्रम रचणारा पहिला बॉलिवूड चित्रपट
‘पठाण’ चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी
अवघ्या 21 दिवसांत ‘पठाण’ने जमवला 498.85 कोटी रुपयांचा गल्ला
22 व्या दिवशी हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट, वाचा सविस्तर
-
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन
पुण्यात उद्या सकाळी 8 वाजल्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार
पुण्यातील अलका टॉकीज चौकात MPSC विद्यार्थी करणार आंदोलन
विद्यार्थ्यांकडून बेमुदत आंदोलन पुकारण्यात येणार
-
महेश आहेर मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या 4 सहकार्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी
महेश आहेर मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या 4 सहकार्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी
4 जणांना एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली
कलम 307, 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय
न्यायाधीश जीएस बोरा यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते
-
अहमदनगरला सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने निषेध मुक मोर्चाचे आयोजन
अहमदनगर : ख्रिश्चन धर्मगुरू, फादर्स आणि चर्च वर होणारे हल्ले तसेच धर्मांतरांचे खोटे आरोपा विरोधात मूक मोर्चा,
जिल्हाभरातील सुमारे २० हाजार सकल ख्रिस्ती बांधव मोर्चामध्ये सहभागी होणार,
क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल मैदानातुन या मोर्चाला सुरवात होणार असून जुने कलेक्टर ऑफिस येथे सांगता होणार.
-
खासदार अमोल कोल्हे यांना किल्ले शिवनेरीवर कार्यक्रमाचं आमंत्रण
खासदार अमोल कोल्हे यांनाही किल्ले शिवनेरीवर कार्यक्रमाचं आमंत्रण
शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा अमोल कोल्हेंचा पवित्रा
शिवनेरी किल्याखाली साजरी शिवजयंती करणार
अमोल कोल्हे यांची माहिती
-
खासदार गिरीश बापट आजपासून कसब्याच्या मैदानात उतरणार
गिरीश बापट आजपासून कसब्याच्या प्रचारात उतरणार,
कसब्यातील भाजप कार्यकर्त्याना बापट आज संध्याकाळी मार्गदर्शन करणार,
आजारी असताना गिरीश बापट भाजप उमेदवाराचा प्रचार करणार
-
चंद्रपूर: अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाडीपट्टीतील गद्दार नाटकाचे पुस्तक प्रकाशन
विदर्भातील झाडीपट्टी नाटकात सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची भूमिका,
चंद्रपूरच्या शंकरपूर येथे अनासपुरे यांच्या हस्ते झाडीपट्टीतील गद्दार नाटकाचे पुस्तक प्रकाशन,
झाडीपट्टी रंगभूमीवर लेखी स्वरूपात उपलब्ध झालेल्या मोजक्या पुस्तकात झाला समावेश,
राज्यकर्त्यांनी झाडीपट्टी रंगभूमी बहरावी यासाठी प्रयत्न करण्याची अनासपुरे यांनी व्यक्त केली गरज.
-
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत 40 ते 45 टक्केच मतदान होईल
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत 40 ते 45 टक्केच मतदान होईल
आणि आम्ही 25 ते 28 हजार मतांनी निवडून येऊ
भाजप नेते संजय काकडे यांचे विधान
मी नाराज नव्हतो मी आजपासून प्रचारात सक्रिय होणार आहे माझ्या वैयक्तिक कामामुळे मी बाहेर होतो
कालच्या बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली
आमच्या पक्षात कुठलेही नाराजी नाट्य नाही
आम्ही आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून आणू
-
नाराज संजय काकडे यांची देवेंद्र फडणविस यांच्याकडून मनधरणी
संजय काकडे आजपासून निवडणूकीच्या प्रचारासाठी सक्रीय होणार
देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाने कसब्यातील नाराजी नाट्यावर पडदा
आजारी असल्याने गिरीश बापट प्रचारामध्ये सहभागी होणार नाही
व्हिडीओद्वारे करणार मतदारांना आवाहन
-
National News Live | झारखंडमधील पलामू पंकी परिसरात दुसऱ्या दिवशीही कलम 144 लागू
महाशिवरात्रीपूर्वी मशिदीसमोर तोरणद्वार बसवण्यावरून दोन गटांमध्ये झाली हाणामारी
दोन गटातील शाब्दिक वाद वाढला, परिसरात झाली दगडफेक आणि जाळपोळ
-
कांद्याच्या कोसळत्या दरावरून आमदार रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा, पाहा काय म्हणाले
Rohit Pawar : सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असा टोला रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला, बातमी वाचा
-
National News Live | गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील वाराहीजवळ भीषण अपघात
अपघातात सात जण ठार
जीप ट्रकला धडकल्याने झाला अपघात
याप्रकरणी गुन्हा दाखल, तपास सुरू
-
Entertainment News Live | बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅनने मोडला विराट कोहलीचा विक्रम
बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला फोटो
स्टॅनच्या पोस्टने मोडला विक्रम, वाचा सविस्तर..
-
नाराजी नंतर भाजप नेते संजय काकडे आजपासून प्रचारात होणार सहभागी
काल देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर संजय काकडे आजपासून ॲक्टिव्ह
-
वेस्ट इंडिज टीमचा क्रिकेटमध्ये एक मोठा प्रयोग, नवीन पायंडा यशस्वी होईल का?
क्रिकेटमध्ये असा प्रयोग करणारी वेस्ट इंडिज पहिली टीम ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजपासून या प्रयोगाची सुरुवात होईल. वाचा सविस्तर….
-
चंद्रशेखर बावनकुळे पुण्यातील प्रचाराबाबत मोठं विधान
पुणे : कसबा आणि चिंचवडमध्ये आमचा प्रचार प्रसार सुरू आहे,
निवडणुक जशी पुढे येईल तसा प्रचार वाढेल आणि नेते येतील,
भारतीय जनता पार्टी कुठेही कमी पडणार नाही, 51 टक्क्याची ही लढाई आहे,
निवडणूक म्हंटलं की कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते कामाला लागत असतात,
सर्व्हे करणं माझं काम नाही पण निवडणूक काळात प्रचार प्रसार करणे हे माझं काम,
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नंतर आधी कार्यकर्ता आहे असं बावनकुळे यांनी म्हंटलं आहे
-
Virat Kohli : दिल्ली टेस्टमध्ये विराट ज्या बॅटने खेळणार, त्याची किंमत ऐकून तुम्ही व्हाल अवाक
Virat Kohli : या बॅटसाठी विराटला थोडेथोडके नव्हे, मिळतात इतके कोटी रुपये. वाचा सविस्तर….
-
रिलायन्सने ही सेवा केली गुपचूप बंद
तोट्यातील सेवेला रिलायन्सने लावले कुलूप
गेल्यावर्षी केली होती जलद सेवा सुरु
आता वेगळा पर्याय शोधला, पण जलद सेवेला लावला ब्रेक, वाचा सविस्तर
-
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी झाले स्वस्त
डॉलर मजबूत, इंधन दराचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम
देशात सोन्याच्या भावात होणार का वाढ, की येईल स्वस्ताई
गुंतवणूकदारांना होईल फायदा की कमाईसाठी वाट पहावी, वाचा बातमी
-
नाशिकमधील निओ मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती
महापालिका आयुक्त आणि महामेट्रोकडून पीएमओ कार्यालयाला अहवाल सादर
पीएमओ कार्यालयाकडून अहवालाचा अभ्यास करून त्रुटींमध्ये केली जाणार सुधारणा
महापालिका निवडणुकीपूर्वी निओ मेट्रो प्रकल्प मंजूर होणार असल्याची सूत्रांची माहिती
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निओ मेट्रोची कोंडी फुटणार असल्याचे केले होते जाहीर
अवघ्या चार दिवसात निओ मेट्रो प्रकल्पाविषयी उच्चस्तरावर झाल्या हालचाली
-
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी
सलग तिसऱ्या दिवशी आज होणार सुनावणी
आज शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करणार
10.30 वाजता सुनावणीला होणार सुरुवात
सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण जाणार का? याचा फैसला आज होण्याची शक्यता
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापुरात अमित शाह यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी
अमित शाह दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला करणार अभिवादन
दौऱ्याच्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याशेजारी उभारले विशेष स्टेज
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारला विशेष स्टेज
नागाळा पार्कातील मैदानावर अमित शाह यांची जाहीर सभा देखील होणार
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन
जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी
-
Jyotiraditya Scindia यांच्या कडक शॉटमुळे मैदानात घडला दुर्देवी अपघात
मैदानात नेमकं काय घडलं? भाजपा कार्यकर्त्याला न्याव लागलं हॉस्पिटलमध्ये. वाचा सविस्तर….
-
Virat Kohli दिल्लीच्या स्टेडियममध्ये ज्या कारने पोहोचला त्याची किंमत ऐकून विस्फारतील डोळे
‘या’ प्रसिद्ध स्पोर्ट्स कार कुठल्या ब्रांडची आहे? वेग किती? जाणून घ्या. वाचा सविस्तर….
-
पेट्रोल-डिझेल लवकरच होणार स्वस्त?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केली सूचना
आरबीआयचा सल्ला केंद्र सरकार घेणार का मनावर
महागाई कमी करण्यासाठी हा तोडगा येईल कामी
कच्चा तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिर
बातमी वाचा या लिंकवर : Today Petrol Diesel price : पेट्रोल-डिझेल GST च्या परीघात? महागाईवर रामबाण उपाय शोधणार केंद्र सरकार
-
अमरावतीकरांनी थकविला 30 कोटींचा मालमत्ता कर
अमरावती : पुढील दीड महिन्यात 30 कोटी रुपयांच्या कर वसुलीचे मनपा समोर मोठे आव्हान,
राजपेठ, भाजी बाजार विभाग अव्वल, 10 फेब्रुवारी पर्यत 31 कोटी 82 लाख वसूली,
पाचही विभागातील वसुली होणे आहे अद्यापही बाकी,
लवकरच मनपा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत.
-
किल्ले राजगडावर रात्रीच्या मुक्कामास आता बंदी
रात्रीचा मुक्काम करण्यासाठी पर्यटकांना घालण्यात आली आहे बंदी
राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडून नोटीस जारी
नियमाचे उल्लंघन केल्यास तीन महिने कैद किंवा पाच हजार रुपयांचा भरावा लागणार दंड
पुरातत्त्व विभागाचे आदेश
लवकरच आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून नेमण्यात येणार पथक
-
तीन सरकारच्या काळात मराठवाड्यात 7444 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
तीन सरकारच्या काळात मराठवाड्यात 7444 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मागील आठ वर्षात 7444 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
सावकारी त्रास,सातत्याने अतिवृष्टीमुळे आणि पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
सरकार कुठलेही असो मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास सरकारला अपयशच
सरकारने योग्य ती पावले उचलून रोखायला हव्यात आत्महत्या
-
बिग बॉस सिजन 16 चा उपविजेता शिव ठाकरेच अमरावतीत जल्लोषात
मला खूप आनंद होतोय की ज्या गोष्टीसाठी मी बिग बॉ मध्ये गेलो ती गोष्ट घेऊन आलोय
मराठी माणूस काय असतो, वाट लावून दाखवतो तेही दाखवून आलो
अमरावतीत आल्यानंतर शिव ठाकरेची प्रतिक्रिया
आगामी काळात अमरावतीच नाव खूप मोठं करणार, शिव ठाकरेचा विश्वास
मला इथपर्यंत पोहचवणाऱ्याचे मी आभार मानतो, शेवटच्या दिवसापर्यत मी घरात होतो: शिव ठाकरे
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण येयहील भगवा तलाव आणि प्रबोधनकर ठाकरे उद्यानाचे उद्घाटन
मुख्यमंत्री यांच्या सोबत खासदार श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याणमधील मुख्य पदाधिकारी उपस्थित
कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी अंतर्गत 19 कोटी रुपये खर्च करून करण्यात आले सुशोभीकरणाचे काम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फ्लोटिंग कारंज्याचे देखील उद्घाटन
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या 17 फेब्रुवारी रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर
रत्नागिरीच्या प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेत होणार सहभागी
खासदार संजय राऊत हे पत्रकार दिवंगत शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांची उद्याच भेट घेणार
एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधी गटातील दोन प्रमुख नेत्यांचा दौरा असल्याने प्रशासन चांगलेच कामाला लागले
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा जगताप कुटुंबियांची भेट घेतली
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची काल जयंती होती
त्याच पार्श्वभूमीवर रात्री उशिरा त्यांनी ही भेट घेतली
मनसेचा पाठिंबा सशर्त नाही
बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या उमेदवारीत हात नाही
विरोधी पक्षाने त्यांचे घर सांभाळावे, असा टोला फडणवीस यांनी लगावला
निवडणुकीत एक उमेदवार असो किंवा दोन उमेदवार असो त्याचा फरक पडत नाही
जगताप यांचे कार्य मोठे असल्याचं सांगताना चिंचवडमध्ये विजयाचा दावा फडणवीस यांनी केला
Published On - Feb 16,2023 6:18 AM