Maharashtra Live Updates : मनसेचे नेते राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पोटनिवडणुकीतील प्रचारावर घेणार निर्णय
Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. निवडणूक आयोगाने दूध का दूध पानी का पानी केल्याचं केलं वक्तव्य. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबुक लाइव्हवरून संवाद साधण्याची शक्यता. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
मी भाजपला सोडलय, हिंदुत्वाला सोडलं नाही; उद्धव ठाकरे
मुंबई
उत्तर भारतीयांसोबत उद्धव ठाकरे यांचा संवाद
महाविकास आघाडीचे युती
शिवजयंतीच्या मुहूर्तावर युती, सोबत राहाल तर सर्व देऊ
तुम्ही मर्द असाल, तुमच्यात हिम्मत असेल तर मैदानात या
धनुष्यबाण चोरलं पण प्रभू रामचंद्र आमच्यासोबत
मी भाजपला सोडलय, हिंदुत्वाला सोडलं नाही
-
पुण्यात शिवसेना युवासेनेचे सहसचिव किरण साळी यांची फ्लेक्सबाजी
एकनाथ शिंदेंना श्रीराम धनुष्यबाण देतायेत
अशा आशयाचं शहरातील प्रमुख चौकात लावले पोस्टर
-
-
पुणे : बाळासाहेब थोरात आजपासून प्रचारात
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आजपासून कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार
संध्याकाळी 6 वाजता तरवडे हॉटेलमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक
काँग्रेस भवन सोडून बाळासाहेब थोरातांची बैठक तरवडे हॉटेलमध्ये
या आधी बाळासाहेब थोरातांनी अनेकवेळा काँग्रेस भवनमध्ये जाणं टाळलं आहे
-
IND vs AUS Test : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिल्ली कसोटीत चिरडलं, दिमाखदार विजय
IND vs AUS Test : भारताच्या त्रिमुर्तींनी केला कागारुंचा गेम. वाचा सविस्तर…..
-
IND vs AUS Test : आता कोण वाचवणार? ‘या’ प्लेयरचा टीम इंडियातील खेळ संपल्यात जमा
IND vs AUS Test : आता त्याच्या बचावासाठी कोणी पुढे येईल, असं वाटत नाही. वाचा सविस्तर…..
-
-
IND vs AUS 2nd Test : सर जाडेजाची कमाल, ऑस्ट्रेलियाची वाट लावली, भारतासमोर विजयासाठी सोपं लक्ष्य
IND vs AUS 2nd Test : जाडेजा-अश्विनच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाची सपशेल शरणागती. दोघांसमोर अक्षरक्ष: ऑस्ट्रेलियन टीम हतबल. वाचा सविस्तर…..
-
NZ vs ENG Test : ब्रॉड-अँडरसनच्या वादाळात न्यूझीलंड उद्धवस्त, इंग्लंडने 4 दिवसात संपवली पहिली टेस्ट मॅच
NZ vs ENG Test: थोड्या थोडक्या नव्हे, खूप मोठ्या फरकाने इंग्लंडने न्यूझीलंडला धूळ चारली. वाचा सविस्तर…..
-
PSL मधील टीम लाहोर कलंदर्सने जाणूनबुजून भारतीयांना भडकवलं, फॅन्सनी करुन दिली कंगालीची आठवण
लाहोर कलंदर्सला ‘त्या’ फोटोला असं कॅप्शन देण्याची अजिबात गरज नव्हती. वाचा सविस्तर….
-
महिला टी20 विश्व कप: कोण आहे रेणुका सिंह? जिने हरलेल्या मॅचमध्ये भारतासाठी केली कमाल
इंग्लंड विरुद्धच्या सामन्याच टीम इंडियाची वेगवान गोलंदाज रेणुका सिंहने कमालीची बॉलिंग केली. वाचा सविस्तर….
-
एटीएमकार्डवर मिळवा विमाही
एटीएमकार्डवर विम्याचे संरक्षणही मिळते
एटीएम कार्डवर पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण
खातेदाराच्या मृत्यूनंतर वारसांना मिळते रक्कम
दावा दाखल करण्यासाठी करावी लागते विहित प्रक्रिया पूर्ण, वाचा सविस्तर
-
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा दक्षिण दरवाजा दुपारी बारा ते तीन या वेळेत बंद राहणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा दक्षिण दरवाजा दुपारी बारा ते तीन या वेळेत बंद राहणार
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
अमित शहा दुपारी अंबाबाई दर्शनासाठी येणार
अंबाबाई मंदिर परिसरात सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त
मंदिराच्या आतील सर्व दुकान सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली
मंदिराचा परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात
मंदिर परिसराची डॉग स्कॉडकडून ही तपासणी
-
नंदुरबार : बिबट्या मृतावस्थेत आढळला
नंदुरबार : बिबट्या मृतावस्थेत आढळला
दोन बिबट्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला
तळोदा तालुक्यातील पाडळपूर रस्त्यावरील घटना
शवविच्छेदानानंतर वनविभागाने बिबट्यावर केले अंत्यसंस्कार
-
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव स्थिर
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा काय आहे दर
कराचा बोजा होईल का कमी, जनतेला मिळेल का दिलासा
कर कपात झाल्यास देशात स्वस्तात इंधन मिळण्याची आशा
इंधन कंपन्या दर दिवशी सकाळी सहा वाजता करतात भाव अपडेट, वाचा बातमी
-
राजधानी नवी दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह
राजधानी नवी दिल्लीत शिवजयंतीचा उत्साहमहाराष्ट्र सदनात होणार शिवजयंती साजरीकोल्हापूर संस्थांनमधील शहाजीराजे छत्रपती उपस्थित राहणारशिवजयंती निमित्त महाराष्ट्र सदनला आकर्षक सजावटराजधानी दिल्लीतील मराठी शिवप्रेमी उपस्थित राहणार -
IND vs ENG T20 WC : स्मृती मांधनाचा झुंजार खेळ, जिंकलेली मॅच टीम इंडिया कशी हरली?, ‘या’ 5 चुका महाग पडल्या
T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विजयाची हॅट्रिक करेल, असं वाटत होतं, पण….वाचा सविस्तर….
-
IND vs AUS Test : KL Rahul चा फिल्डिंग करताना डोळा लागला? हा घ्या पुरावा, VIDEO
IND vs AUS Test : ग्राऊंडवर फिल्डिंग करताना KL Rahul ने मोठी चूक केली. वाचा सविस्तर….
-
नाशिक : मंगला एक्सप्रेसमध्ये तरुणीवर हल्ला
किरकोळ कारणावरून वेंडरने तरुणीवर केला हल्ला
तरुणी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल
रेल्वेप्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले
-
पुण्यातील पाषाण आणि वारजे परिसरातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार
– पुण्यातील पाषाण आणि वारजे परिसरातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार
– फ्लो मीटर बसवणे आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार,
– मंगळवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
– त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
-
अमरावती, बडनेरावरून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या हाउसफुल
अमरावती, बडनेरावरून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या हाउसफुल
उन्हाळी सुट्ट्यांचे प्रवाशांकडून आतापासूनच नियोजन
पुणे, मुंबई मार्गावरील रेल्वे गाड्यांचे तिकीट मिळेना
दहावी बारावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर लग्नाचा हंगाम असल्याने ही प्रवाशांकडून रेल्वेला पसंती
एप्रिल , मे महिन्याचं रेल्वेचे बुकिंग फुल
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर
कसबा, चिंचवड पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याला महत्त्व
भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर राज ठाकरे आज पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार
कसब्यात प्रचारात सक्रिय होण्यासंदर्भात राज ठाकरे आज निर्णय घेण्याची शक्यता
मनसेने प्रचारात सक्रिय होण्याबाबत भाजपने केलीय विनंती
-
आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार
हा योग कित्येक दशकांनंतर महाराष्ट्र सरकार आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आल्यानं राज्यभरात आनंदाचं वातावरण
शिवाजी चौक परिसरात फुलांची सजावट करण्यात आली, छत्रपती शिवरायांचे होर्डिंग्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत
आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आलाय
शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण याठीकाणी दिमाखात फडकत आहे
शिवजन्मोत्सव, पोवाडे सादरीकरण, नाटक सादरीकरण, सँड आर्ट, आतषबाजी केली जाणार
आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे मानले आभार
-
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रकाश जावडेकर आज कसब्याच्या प्रचारात उतरणार
कसब्यात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आणि बैठक
प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत केसरीवाड्यात प्रबुद्ध नागरिकांचा मेळावा
प्रचाराला काही दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून बड्या नेत्यांना निमंत्रण
-
आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
शिवजयंती सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही विशेष उपस्थिती
आग्र्यात पहिल्यांदाच साजरी होतेय शिवजयंती
-
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज बारामती दौरा
दौऱ्याची सुरुवात छत्रपती शिवाजीमहाराजांना अभिवादन करून
बारामती शहरातील कसबा येथे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला केले अभिवादन
पहाटे 6 वाजताच अजितदादांकडून शिवजयंतीनिमित्त अभिवादन
-
बम बम भोलेच्या गजरात गोंदियाच्या प्रतापगडावर हर…हर महादेवाचा गजर
सात लाख भाविकांची उपस्थिती
शिवरात्रीनिमित्त कालपासून पाच दिवशीय प्रतापगड यात्रेला सुरूवात
भाविकांची मांदियाळी, हिंदू- मुस्लीम एकतेचे प्रतिक
महाराष्ट्रभरातून भाविक प्रतापगडावर दाखल
-
डोंबिवली रेल्वे स्थानकात दोन महिलांमध्ये हाणामारी
महिलांच्या या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हाणामारीचं कारण अस्पष्ट डोंबिवली लोहमार्ग पोलीसाचा तपास सुरू
-
वसईत वॉशिंग मशीनमध्ये स्फोट, कोणतीही हानी नाही
स्फोटात मशीन पूर्णपणे जळून खाक झाली
वसई पश्चिमेच्या साई नगर, गौतमी बिल्डिंगमधील कुबेरा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत्या घरात काल मध्यरात्री पावणे एक वाजता ही घटना घडली
वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन आग विझवली असल्याने मोठा अनर्थ टळला
Published On - Feb 19,2023 6:11 AM